Tuesday, January 7 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राजकीय

… तर विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकणार – बाळासाहेब आंबेडकर

… तर विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकणार – बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
prakash amedkar मुंबई/दि/  विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या नाहीत,  तर  निवडणुकांवर  बहिष्कार टाकणार,  अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी एका खाजगी वृत्तवाहिनी बोलताना  घेतली आहे.  तसेच ईव्हीएममुळेच वंचित बहुजन आघाडीच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला, असा दावा त्यांनी यावेळी केला.       याबाबत बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की,  हे सरकार, निवडणूक आयोग ईव्हीएम वापरण्यात इंटरेस्टेड असेल तर आपण निवडणूक प्रक्रियेतच भाग घेऊ नये. बॅलेट येणार असेल तर आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सहभागी होऊ,  ही भूमिका महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांनी घ्यायला हवी.      बॅलेट आलेच पाहिजे यावर मी ठाम आहे आणि नाही आले, तर विधानसभा नाही लढणार. आता माझे हे मत आमच्या पक्षात कॅरी होईल का हे मी आता ठामपणे सांगू शकत नाह...
ओबीसी आरक्षणाचे तीन तुकडे करणे हे समाजासाठी घातक-भुजबळ

ओबीसी आरक्षणाचे तीन तुकडे करणे हे समाजासाठी घातक-भुजबळ

राजकीय
Samata-Parishad मुंबई/दि/  केंद्र सरकारकडून ओबीसी आरक्षणाबाबत न्या. रोहिणी आयोग नेमून ओबीसी आरक्षणाचे तीन विभागात विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात ओबीसींची जनगणना झाली नसताना कोणत्या आकडेवारीच्या आधारे आरक्षणाचा लाभ मिळत नाही हे ठरविले आहे असा सवाल उपस्थित करत ओबीसींचे तीन तुकडे हे ओबीसींसाठी अत्यंत घातक असल्याचा आरोप ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी करत पुढील काळात ओबीसी  आरक्षणाप्रमाणे इतर आरक्षणाबाबतही असे निर्णय होण्याचे चित्र आहे असे सांगितले. मुंबई येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची आढावा बैठक मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.      यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींचे तीन तुकडे करण्याविरोधात सर्वांनी एकत्र येत लढा उभारण्याची गरज आहे. केंद्र सरकारने न्या.रोहिणी आयोग नेमून आरक्ष...
तुमच्या पक्षाचे मेळावे घ्या, लाखोंची गर्दी जमवून दाखवा, मगच विचार करू

तुमच्या पक्षाचे मेळावे घ्या, लाखोंची गर्दी जमवून दाखवा, मगच विचार करू

राजकीय
सोलापूर : ‘तुम्हाला पाहिजे त्या मतदारसंघात तुमच्या पक्षाचे स्वत:चे मेळावे घ्या, लाखोंची गर्दी जमवून दाखवा, मगच तुम्हाला ते मतदारसंघ सोडण्याचा विचार केला जाईल,’ असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महादेव जानकर व रामदास आठवले यांच्यापुढे ठेवल्याची चर्चा आहे.     सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांच्या संघटनासाठी नेत्यांनी गावोगावी बैठका घेण्यात सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता लाखोंची गर्दी जमवायची कशी, असा पेच जानकर आणि आठवले यांच्यापुढे निर्माण झाल्याची चर्चा आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने रिपब्लिकन पक्षाला दिलेली आश्‍वासने न पाळल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.     जानकर यांनी धनगर आरक्षणासाठी सरकार दरबारी काहीच हालचाली केल्या नसल्य...
वंचित बहुजन आघाडीची ३७ उमेदवारांची यादी जाहीर, सर्वाधिक धनगरांना ६ जागा, बौद्धांसह २१ जातींना उमेदवारी

वंचित बहुजन आघाडीची ३७ उमेदवारांची यादी जाहीर, सर्वाधिक धनगरांना ६ जागा, बौद्धांसह २१ जातींना उमेदवारी

राजकीय
Prakash-Ambedkar मुंबई/दि/ प्रतिनिधी/     मागील सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व शहरात वंचित बहुजन आघाडीच्या रेकॉर्डब्रेक जाहीर सभा झाल्या.लोकसभा निवडणूकीच्या तारीख जाहीर झाल्यानंतर त्यांनी उमेदवार निश्‍चित केले. दरम्यान मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या वेगवेगळ्या समाजाला सत्तेच्या जवळ नेण्याची महत्वकांक्षा बाळगलेल्या बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज आपली पहिली यादी जाहीर केली. जाहीर केलेले उमेदवार हे महाराष्ट्रातील त्या त्या जिल्ह्यात वर्षानुवर्षे राजकीय सामाजिक क्षेत्रात कामे करीत आलेली आहेत. परंतु त्यांना संधी मात्र कोणत्याही पक्षाने दिली नाही. अशाच उमेदवारांना बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी दिली आहे.     तब्बल ३६ उमेदवारांच्या या यादीत सर्वाधिक ६ धनगर उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. एकूण २१  वि...
राहुल गांधींचे आश्वासन हा जुमलाचः मायावती

राहुल गांधींचे आश्वासन हा जुमलाचः मायावती

राजकीय
Mayavati-rahul-Gandhi लखनौ/दि/                   लोकसभा निवडणुकीनंतर केद्रात कॉंग्रेसचे सरकार आल्यास देशातील सर्व गरिबांना किमान उत्पन्नाची हमी देणारी योजना राबवली जाईल, अशी घोषणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी छत्तीसगडमध्ये केली होती. या घोषणेवर बसपाच्या प्रमुख मायावती यांनी सडकून टीका केली. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींच्या १५ लाख रुपयाच्या घोषणेप्रमाणे राहुल गांधीची गरीबी हटाओ योजना ही जुमलाच आहे.           कॉंग्रेस आणि भाजपा दोघेही अपयशी ठरले आहेत. हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असाही आरोप मायावती यांनी केला. सोमवारी राहुल गांधी म्हणाले होते नव्या भारताची उभारणी करणे अशक्य आहे. त्यामुळे केंद्रात सत्तेत आल्यास कॉंग्रे...
भाजप सरकारचा देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्नः आ. शरद रणपिसे

भाजप सरकारचा देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्नः आ. शरद रणपिसे

राजकीय
Congress-vardhapan-din मुंबई/दि/  कॉंग्रेस पक्षाने इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त केले व देशात लोकशाहीची बीजे रोवून ती बळकट केली. पण विद्यमान भाजप सरकार देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला पराभूत करून देशाचे संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी कॉंग्रेस पक्ष कटिबद्ध आहे असे प्रतिपादन विधान परिषदेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे यांनी केले.       कॉंग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापनादिनामित्त आज महाराष्ट्र प्रदेश मुख्यालय टिळक भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. रणपिसे बोलत होते.       ते पुढे म्हणाले की, विद्यमान सरकारच्या काळात देशाची धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे. जाती- जातीत, धर्मा-धर्मात तेढ वाढवून दंगली घडवल्या जात आहेत. राजकीय फायद्यासाठी ध्रुवीकर...
कॉंग्रेसला मुस्लिमांची मते हवी, नेते नको-आंबेडकर

कॉंग्रेसला मुस्लिमांची मते हवी, नेते नको-आंबेडकर

राजकीय
Prakash-Ambedkar अकोला/दि/  मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न कॉंग्रेसने निरंतर प्रलंबित ठेवला आहे. कॉंग्रेसला मुस्लिमांची मते हवी आहेत. मात्र, त्यांना मुस्लिमांचे नेते नको आहेत, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला. अकोला येथे मुस्लीम आरक्षण महामोर्चादरम्यान ते बोलत होते.       कॉंग्रेस मुस्लिमांचा फक्त निवडणुकीसाठी उपयोग करीत आहे. त्यामुळे त्यांना १९ टक्के आरक्षण देण्यासाठी कॉंग्रेसने कुठलीच पावले उचलली नाही. मुस्लीम आरक्षणासाठी लढा उभा केलेला आहे. वंचित आघाडीच्या माध्यमातून मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले. राज्य सरकारने मराठा आरक्षण दिले. मात्र, १९ टक्के असलेल्या मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदरांनी कुठलाच दबाव आणला नसल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी कॉ...
केंद्राचा अजेंडा आरएसएसचाच उपेंद्र कुशवाह यांना सुचले उशिरा शहाणपण

केंद्राचा अजेंडा आरएसएसचाच उपेंद्र कुशवाह यांना सुचले उशिरा शहाणपण

राजकीय
Upendra-Kushwah पुणे: विकासाच्या अजेंड्यावर सरकार असेल, अशी चर्चा केली गेली. मात्र सरकार आल्यावर विकासाऐवजी भाजपने त्यांचा अजेंडा राबविण्यास सुरुवात केली. त्यांचा अजेंडा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे. तो आमच्यासाठी नव्हे, तर देशातील लोकांसाठीही योग्य नाही.त्यामुळे सरकारमधून बाहेर पडलो अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेले बिहारमधील ’राष्ट्रीय लोक समता पार्टी’चे नेते उपेंद्र कुशवाह यांनी केली.       छगन भुजबळ यांच्यासमवेत कुशवाह यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे कुशवाह विरोधकांच्या गोटात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत कुशवाह म्हणाले, पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भेटलो. भुजबळ गेल्या १२ वर्षांपासून माझे मित्र आहेत. भुजबळ यांच्याशी कौटुंबिक संबंध असून, राजकारणात त्यांचे ...
बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, संविधान वाचवणे हेच आपल्यापुढील सर्वात मोठे आव्हान!

बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, संविधान वाचवणे हेच आपल्यापुढील सर्वात मोठे आव्हान!

राजकीय
जयपुर/ राजस्थान/ दि/ आपल्याला केवळ अर्धे स्वातंत्र्य मिळाले असून संविधान वाचवणे, हेच आपल्यापुढील सध्या सगळ्यात मोठे आव्हान आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.                 राजस्थानमधील फलोडी येथे संविधान बचाव, देश बचाव सभेत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सत्तेसोबत राजेशाहीत आपला कोणताही संबंध नव्हता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार देऊन प्रत्येकाचा संबंध हा सत्तेशी जोडला आहे. क्रांतीसोबतच प्रतिक्रांतीही होत असते, हे लक्षात घ्या. महात्मा फुलेंनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हीच बाब सांगितली आहे. आताही प्रतीक्रांतीचा प्रयत्न सुरु आहे. ही प्रतिक्रांती मिटविण्याचे आपल्यापुढे आव्हान आहे. शिक्षण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जो शिक्षण ...
बाळासाहेब आंबेडकरांचा फडणवीसांना सवाल- रास्वसंघाकडे एके ४७ आली कुठून, भागवतांना मोक्का लावणार का?

बाळासाहेब आंबेडकरांचा फडणवीसांना सवाल- रास्वसंघाकडे एके ४७ आली कुठून, भागवतांना मोक्का लावणार का?

राजकीय
मुंबई/दि/ प्रतिनिधी/                 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे (आरएसएस) असलेली शस्त्रास्त्रे सरकारने जप्त करावी. या देशाचा कायदा कोणालाही शस्त्र बाळगण्याची परवानगी देत नाही, मग संघाकडे एके ४७ रायफल कशी आली, असा सवाल करत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनी  देवेंद्र फडणवीस सरकारला सवाल केला आहे, की सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करणार की नाही. संघाकडे असलेली शस्त्रे जप्त केली नाही तर महाराष्ट्रात चक्का जाम करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.                 रास्वसंघ दरवर्षी दसयाला नागपूरमध्ये शस्त्रपूजन करत आले आहे. त्यांच्या या शस्त्रपूजनाला शांतताप्रिय संघटनेने विरोध केला आहे. याविरोधात...