शिवसेना मला बघून घेणार म्हणजे, माझा मर्डर करणार आहे का?’
मुंबई/दि/छत्रपती घराण्याविरोधात बोलल्यास तुम्हाला बघून घेऊ, असे शिवसेनेच्या मुखपत्रातून सांगितले जाते. मला बघून घेणार, म्हणजे नक्की काय करणार? ते माझा खून करणार आहेत का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केला.ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ‘सामना’तून करण्यात आलेल्या टीकेवरुन सेनेवर पलटवार केला. मुळात ‘सामना’ या सगळ्या प्रकरणात का भूमिका घेत आहे, तेच मला समजत नाही. मला सामनाला एवढंच विचारायचं आहे की, तुम्ही बघून घेणार म्हणजे नेमकं काय करणार? मारणार, मर्डर करणार?, त्याचा खुलासा करुन टाका. तसे असेल तर कुठे यायचं ते सांगा, मी येतो, असे जाहीर आव्हान बाळासाहेब आंबेडकर यांनी शिवसेनेला दिले.
तसेच बाळासाहेब आंबेडकर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होण्याचे भाकीतही वर्तवले. सध्या केंद्र आणि राज्य सर...