Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत साडेसहा लाखाची घरफोडी,गुन्हे युनिट दोन ने केले सराईत चोरांना जेरबंद

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
स्वारगेट व सहकार नगर पोलीस ठाणे हद्दीत युनिट 02 कडील अधिकारी व अंमलदार दि. 20 ऑगस्ट रोजी गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार गजानन सोनुने व संजय जाधव यांना त्यांचे गुप्त बातमी दराकडून बातमी मिळाली की, घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जयवंत उर्फ जयड्या गायकवाड हा मीनाताई ठाकरे वसाहत येथे पांढऱ्या रंगाची आपाची गाडीसह उभा असून त्याच्याजवळ घरफोडी चोरीतिल सोनं विक्री करण्यासाठी आलेला आहे, अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेतले असता, त्याच्याजवळ 107 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, एक दुचाकी गाडी, दागिने वजन करण्याचे इलेक्ट्रॉनिक मशीन व घरफोडी चोरी करण्यासाठी वापरलेले हत्यार असा सर्व एकूण 6 लाख 30 हजार 750/- रु चा मुद्देमाल मिळून आला आहे.

 त्याबाबत खात्री केली असता समर्थ पोलीस स्टेशन गु.र.क्र.186/2023 भादवी 380, 454, 457 प्रमाणे गुन्हा दाखल असून खात्री करून पुढील कारवाई कामी समर्थ पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले समर्थ आहे. ही कारवाई गुन्हे युनिट दोनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.