
मुंबई/दि/ प्रतिनिधी/national forum/
पुण्यातील भीमा कोरेगाव येथी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात झालेल्या भीषण दंगली प्रकरणी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, चौकशीसाठी बोलवावे अशी मागणी भीमा कोरेगाव चौकशी आयोगापुढे बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे, त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, याबाबत लोकांनी यापूर्वीही अर्ज केले आहेत. त्यावर आयोगाला जो निर्णय घ्यायचा होता, तो घेतला आहे. आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे. दरम्यान बाळासाहेब आंबेडकर हे एक निष्णात वकील आहेत. आयोगासमोर कोणाला बोलावावे व कोणास बोलवू नये हे आयोग ठरविते असे त्यांनी नमूद केले आहे.