Thursday, May 2 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: बाळासाहेब आंबेडकर

बाळासाहेब आंबेडकर यांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र ! मोदींची हुकूमशाही रोखायला एकत्र या!

बाळासाहेब आंबेडकर यांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र ! मोदींची हुकूमशाही रोखायला एकत्र या!

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना पत्र पाठवले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जून खरगे यांना त्यांनी पत्र पाठवल्याचे त्यांनी ट्विट करत सांगितले. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या 3 घटक पक्षांमधील जागा वाटपाबाबत महाराष्ट्रात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. या अटकळींचा कितीही गोंगाट सुरू असला, तरी देशातील सर्वाधिक जागा निवडून देणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यातील, महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीकडून कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नसल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. पंतप्रधान मोदींना सत्तेतून बेदखल करण्यासाठी 48 जागांचे महत्त्व लक्षात घेता तसेच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार अशा महत्त्वाच्या राज्यांमध्...
बाळासाहेब आंबेडकर यांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले ‘आता मंत्रिमंडळही काँट्रॅक्टवर भरा’

बाळासाहेब आंबेडकर यांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले ‘आता मंत्रिमंडळही काँट्रॅक्टवर भरा’

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कोविड नसता तर आतापर्यंत भीमा कोरेगाव प्रकरणाची सुनावणी झाली असती. पण ही सुनावणी एका बाजूनेच सुरू आहे. माझी उलट तपासणी झाली. संभाजी महाराज यांची समाधी, त्याची तपासणी झाली. पण, जशी हवी तशी तपासणी होत नाही. योग्य रीतीने कामकाज होत नाही असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केली. भीमा कोरेगाव प्रकरणाची सुनावणी होत आहे. परंतु आयोगाच्या हातात काहीही नाही. पुढील सुनावणी 19 ऑक्टोबरला होणार आहे. मात्र, महत्वाच्या व्यक्तींची साक्ष झाल्याशिवाय ही सुनावणी पूर्ण होणार नाही. पूर्वीच्या अनेक गोष्टी परत नव्याने काढल्या जात आहे असे ते म्हणाले. मराठवाड्यातील दुष्काळाकडे सरकार काळजीपूर्वक बघत नाही. कल्पकता असल्याशिवाय इथला दुष्काळ संपणार नाही. पाणी वळवले तर दुष्काळ संपेल अशी येथील परिस्थिती आहे. इंडिया आघाडीवर बहिष्कार घातला. कारण, ...
बाळासाहेब आंबेडकर यांचे ‘जवाब देना पडेगा’ म्हणत राहुल गांधींना ते 7 प्रश्न! काँग्रेस काय देणार उत्तर

बाळासाहेब आंबेडकर यांचे ‘जवाब देना पडेगा’ म्हणत राहुल गांधींना ते 7 प्रश्न! काँग्रेस काय देणार उत्तर

राजकीय
नॅशनल फोरम/मुंबई/दि/प्रतिनिधी/वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना सात प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आंबेडकर यांनी ट्विटच्या माध्यमातून हे सात प्रश्न राहुल गांधी यांना विचारले आहेत. राहुल गांधी यांना न्यायालयाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. लोकसभेत त्यांची वापसी झाली आहे त्यामुळे ते सेलिब्रेट करण्याच्या मूडमध्ये आहेत. त्यात व्यस्त आहेत. तरीही 2 वेळा माजी खासदार म्हणून मला त्यांच्यासह सहयोगी पक्षांचे मूलभूत मुद्यांकडे लक्ष वळवायचे आहे' असे म्हणत त्यांनी 7 प्रश्न ट्विट केले आहेत. कोणते आहेत ते सात प्रश्न1.दलित, आदिवासी, मुस्लीम आणि ओबीसी यांच्या खऱ्या प्रश्नांवर काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष कधी बोलणार...
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना चौकशीला बोलवा, बाळासाहेब आंबेडकरांची आयोगाकडे मागणी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले –

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना चौकशीला बोलवा, बाळासाहेब आंबेडकरांची आयोगाकडे मागणी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले –

राजकीय
मुंबई/दि/ प्रतिनिधी/national forum/पुण्यातील भीमा कोरेगाव येथी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात झालेल्या भीषण दंगली प्रकरणी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, चौकशीसाठी बोलवावे अशी मागणी भीमा कोरेगाव चौकशी आयोगापुढे बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे, त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, याबाबत लोकांनी यापूर्वीही अर्ज केले आहेत. त्यावर आयोगाला जो निर्णय घ्यायचा होता, तो घेतला आहे. आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे. दरम्यान बाळासाहेब आंबेडकर हे एक निष्णात वकील आहेत. आयोगासमोर कोणाला बोलावावे व कोणास बोलवू नये हे आयोग ठरविते असे त्यांनी नमूद केले आहे. ...
राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, ते सरड्यासारखे रंग बदलतील : बाळासाहेब आंबेडकर

राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, ते सरड्यासारखे रंग बदलतील : बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
नॅशनल फोरम/बदलापुर/दि/ प्रतिनिधी/राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, ते सरड्यासारखे रंग बदलतील असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. दरम्यान या देशात बदल अपेक्षित असून कर्नाटक मार्ग दाखवून देईल. तसेच 2024 मध्ये बऱ्याच घटना घडतील असंही त्यांनी बदलापुर येथील सभेत वक्तव्य केले आहे.यावेळी ते म्हणाले की, मी कित्येकवेळा सांगितले आहे की, या राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, हे सरड्यासारखे कधी कलर बदलतील हे सांगता येणार नाही. फुले, शाहू, आंबेडकरांचे नावे हे केवळ एक कलर दाखविण्यासाठी आहे. परंतु यांचा असणारा खरा कलर आत्ता दिसायला लागला आहे. आज जातील की उद्या जातील, की परवा जातील अशी चर्चा आपणांस दिसते. 2024 च्या अगोदर बऱ्याच घटना याच्या अगोदर घडणार आहेत. कदाचित कर्नाटक हा मार्ग दाखवु शकतो. या देशाला बदल अपेक्षित आहे. फक्त बदलाचे शब्द ठरेल आणि त्याचा हुंकार हा पण झाल...
अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी केसेस काढून घेण्यासाठीच : बाळासाहेब आंबेडकर

अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी केसेस काढून घेण्यासाठीच : बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
नॅशनल फोरम/बदलापुर/दि/ प्रतिनिधी/स्वतःवरील केसेस काढून घेण्यासाठी अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. बदलापूरमधील एका कार्यक्रमात बाळासाहेब आंबेडकर बोलत होते. यावेही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप, आरएसएसवर जोरदार टीका केली. सोबतच महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसह बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरही वंचित बहुजन आघाडीची भूमिका जाहीर केली आहे. यावेळी अजित पवारांविषयी बोलताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, अजित पवार यांचं कौतुक केलं की त्यांनी त्यांच्यावरच्या केसेस काढून घेण्यासाठी शपथविधी करुन घेतला. आपल्या केसेस विड्रॉ केल्या. केसेस काढून घेतल्यानंतर सरकारमधून बाहेर पडले आणि पुन्हा एनसीपीमध्ये गेले. राष्ट्रवादीने फसवणूक केली, सरड्यासारखा रंग बदलते -यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टी...