Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बाई ऽऽ बाई ऽऽऽ… मनमोराचा (स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीत) कसा पिसारा फुलला…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
दिनांक 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीपासून स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील गैरकायदयाच्या कृत्यांबाबत जनजागृतीला सुरूवात केली. स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत अंडरवर्ल्डचे नाव घेवून व लाईन बॉयच्या सुरात स्वारगेट पोलीस स्टेशन लगत जुगाराचा क्लब सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावले यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. आज 13 तारीख आहे. तरी देखील जुगाराचा क्लब अजुनही
बंद झालेला नाही. त्यामुळे 18/22 तास चालणारा जुगाराचा क्लब नेमका कुणाचा आहे याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

स्वारगेट पोलीस स्टेशन लगत असलेला क्लब -डॉनचा की लाईन बॉयचा –
स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सुरू असलेला जुगाराचा क्लब हा सुमारे 18 ते 22 तास सुरू असतो. गणेशोत्सवाच्या काळात तर जुगाऱ्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. दरम्यान स्वारगेट पोलीस स्टेशन लगत सुरू असलेला जुगाराचा क्लब सुरू करणाऱ्यांपैकी, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गुन्हेगाराचा फोटो कसा, तसेच त्या पाच इसमांपैकी एकही पोलीसाचा मुलगा नाही तरी स्टेटसवर लाईनबॉय हे कशासाठी ठेवले आहे, त्यामुळे ह्या सर्व प्रकाराची देखील कसुन चौकशी होणे आवश्यक आहे असेही दि. 2 ऑक्टोंबरच्ा वृत्तांकनामध्ये नमूद केले होते. परंतु आज 13 दिवस उलटले तरी कारवाई नाही हे विशेष आहे.

स्वारगेट पोलीस स्टेशन आणि 15 मटक्यासह 2 जुगाराचे क्बल-
पोलीस कारवाई करून करून, ते कुठपर्यंत करणार…. कुठे कुठे करणार…. त्यातच एका मटका अड्डयावर कारवाई झाली तर इतर 14 धंदे तर सुरूच राहणार आहेत. एका क्लबवर कारवाई केली तरी दुसरा सुरूच राहणार आहे. त्यामुळे एकाच इसमाने सुमारे 15 मटक्याच्या अड्डयासह सुमारे 2 जुगारचे क्लब सुरू केले आहेत. स्वारगेट पोलीस स्टेशनच्या मोक्याच्या ठिकाणी (मेजर लोकेशन) मटका व जुगाराचे क्लब सुरू आहेत. तरी देखील जुगाराच्या मालकावर कारवाई केली जात नाही. एका एका धंदयावर कारवाईची पोलीस नौंटकी होते, मटका जुगार अड्डयावरील पंटर, रायटरवर कारवाई होते. परंतु मुळ मालकावर मात्र कधीच कारवाई होत नाही. मुळ मालकावर कारवाई करणारे एकच सुपर हिरो होते, ते म्हणजे सामाजिक सुरक्षा विभागाचे तत्कालिन वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक….. त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतरही मटका जुगार अड्डयाच्या मुळ मालकावर कारवाई किंवा अटक केली नाही. म्हणजे पोलीस कारवाईची सपशेल नौटंकी होते हेच खरे वास्तव आहे.

संपूर्ण स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत जुगाराचे क्लब सुरू आहेत. तरी देखील आज 13 दिवस झाले तरी कारवाई होत नाहीये. म्हणजे स्वारगेट पोलीसांच्या सौजन्याने हे धंदे सुरू आहेत काय, असाही प्रश्न निर्माण होत आहे. पोलीस आयुक्तालयातील व लष्करात बसलेले वरिष्ठ अधिकारी आतातरी कारवाई करणार आहेत की नाही असाही प्रश्न विचारला जात आहे. ( गुन्हेगारी वाढली म्हणून आरडा ओरड करण्यापेक्षा गुन्हेगारीचे मुळच उखडून का टाकले जात नाही, खमंग पुणेरी बाकरवडीसारखा खुशखुशीत ताजा ताजा अहवाल थोड्याच वेळात...)