Saturday, May 4 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: national forum

ठाकरे सरकारच्या सामाजिक न्यायास सुसंगत असलेल्या पदोन्नती आदेशाला पुणे महापालिकेतील कपटखोरांनी केराची टोपली दाखविण्याचे काम करू नये – अनिरूद्ध चव्हाण

ठाकरे सरकारच्या सामाजिक न्यायास सुसंगत असलेल्या पदोन्नती आदेशाला पुणे महापालिकेतील कपटखोरांनी केराची टोपली दाखविण्याचे काम करू नये – अनिरूद्ध चव्हाण

शासन यंत्रणा
शासनाच्या २० एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयावर तातडीने निर्णय घेवून २००४ च्या स्थितीनुसार तातडीने निर्णय घेवून, मागासप्रवर्गातील सेवाज्येष्ठांना पदोन्नतीचे आदेश होणे आवश्यक आहे. २०२१ च्या अखेरपर्यंत अनेक सेवाज्येष्ठ अधिकारी पदोन्नतीविना सेवानिवृत्त होत आहेत. मे, जुन २०२१ मध्येही सेवानिवृत्तांची मोठी यादी आहे. आता कोणतीही संधिग्धता नाही, संभ्रम नाही. त्यामुळे न्यायनिर्णय तातडीने होणे आवश्यक आहे. पुणे/दि/ प्रतिनिधी/राज्यातील ठाकरे सरकारने सामाजिक न्यायाशी सुसंगत असलेला धाडसी निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील पदोन्नतीतील आरक्षणाची पदे रिक्त ठेवून, २००४ च्या आरक्षण स्थितीनुसार सरसकट पदोन्नतीची पदभरती करण्याचे आदेश जारी केले आहेत. या शासन निर्णयाबाबत विचार करण्यासाठी विनाकारण वेळ न दडविता तातडीने पुणे महापालिकेत सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीची अंमबलजावणी करण्याची मागणी रिपब्लिकन फेडरेशन म...
शासनातील पदोन्नतीची पदे सेवाज्येष्ठतेप्रमाणे भरण्याचा मार्ग मोकळा

शासनातील पदोन्नतीची पदे सेवाज्येष्ठतेप्रमाणे भरण्याचा मार्ग मोकळा

सर्व साधारण
गृह (पोलीस/ तुरूंग), सा.बां., पाटबंधारे, कृषी, महसुल, वने, या सहित जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, जिल्हापरिषद या कार्यालयातील पदोन्नतीच्या मार्गातील सर्व काटे दूर झाले असून, ३३ टक्के पदे रिक्त ठेवून, सरसकट सेवाज्येष्ठतेप्रमाणे पदोन्नतीची पदे भरण्याचा निर्णय शासनाने २० एप्रिल रोजी काढण्यात आला आहे. पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/महाराष्ट्र राज्यातील ११ कोटी पैकी ६ ते ७ कोटी नागरीक मूळचे भूमिपुत्र व मूळनिवासी असून, केंद्र व राज्य शासनाने या मोठ्या समुहाला केवळ ३३ टक्के आरक्षण देवून त्यांची बोळवणूक केली. त्यातच केंद्र व राज्य शासनाने शासनातील नवीन पदभरती बंद करून, मूळच्या भूमिपुत्र असलेल्या जाती-जनमाती समुहांना शासनाची दारे बंद करण्यात आली. ही सर्व पदे आता बाह्ययंत्रणेमार्फत कंत्राटी तत्वावर भरली जात आहेत. यापूर्वी शासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांना देखी...
शासन आदेशानुसार मागासवर्गीय कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्याबाबत पुणे महापालिकेचा जातीयवादी चेहर उघड झाला

शासन आदेशानुसार मागासवर्गीय कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्याबाबत पुणे महापालिकेचा जातीयवादी चेहर उघड झाला

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/राज्यात २०१७ पासून पदोन्नती प्रकरणांबाबत न्यायालयीन प्रक्रियेमुळे खिळ बसली होती. खुल्या व मागास प्रवर्गातील हजारो कर्मचारी पदोन्नती प्रक्रियेच्या विळख्यात अडकुन पडले होते. परंतु राज्यातील ठाकरे सरकारने महत्वपूर्ण निर्णय जाहीर करून खुल्या व मागास प्रवर्गातील अधिकारी व कर्मचार्‍यांना कोणत्याही आरक्षणाचा विचार न करता सरसकट पदोन्नती देण्याचा आदेश १८ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर केलेला होता. परंतु १८ फेब्रुवारी ते २० एप्रिल एवढ्या कालावधीत पुणे महापालिकेतील खुल्या व मागासवर्गीय संवर्गातीची पदे भरण्यात आली नसल्याची माहिती खुद्द पुणे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने माहिती अधिकारात देण्यात आली आहे. राज्यातील ठाकरे सरकारने १८ फेब्रुवारी २०२१ रोजी खुल्या व मागास संवर्गातील अधिकारी व कर्मचार्‍यांची पदे कोणत्याही आरक्षणाचा विचार न करता भरण्याचे आदेश देण्यात आले होते. तथ...
राज्यातील मागासवर्गीय अधिकार्‍यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यासाठी ठाकरे सरकारकडून परस्परविरोधी शासन निर्णयांचा भडीमार, पुणे महापालिकेतही सामान्य प्रशासनातील पेशव्यांच्या कपटी कारस्थानांमुळे मागासवर्गीय अधिकारी पदोन्नतीपासून वंचित

राज्यातील मागासवर्गीय अधिकार्‍यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यासाठी ठाकरे सरकारकडून परस्परविरोधी शासन निर्णयांचा भडीमार, पुणे महापालिकेतही सामान्य प्रशासनातील पेशव्यांच्या कपटी कारस्थानांमुळे मागासवर्गीय अधिकारी पदोन्नतीपासून वंचित

सर्व साधारण
पुणे/दि/ प्रतिनिधी/राज्याच्या तिजोरीत शासकीय कर्मचार्‍यांना पगार दयायला पैसे नाहीत, राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे राज्य शासनासहित स्थानिक संस्थेतील मागासवर्गीयांची नवीन पदभरती बंद करण्यात आली आहे. आता बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी तत्वावर पदभरती करण्यात येत आहे. शासनात पूर्वीपासून कर्तव्यावर असलेले बहुसंख्य मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी पदोन्नतीसाठी वंचित ठरले आहेत. शेवटी काय तर मागासवर्गीयांना शासनात येऊ दयायचे नाही, जे आहेत त्यांचा देखील मानसिक छळ करून त्यांना ठार करण्याचे कारस्थान पूर्वीच्या कॉंग्रेस राजवटीत होत होते तर आता ठाकरे सरकारने देखील मागासवर्गीयांच्या जागोजाग छळछावण्या निर्माण करून, मागासवर्गीयांच्या संविधानिक न्यायिक हक्कांवर वरवंटा फिरविला आहे. पाच महिन्यात परस्पपरविरोधी आदेशांचा भडीमार - उच्च न्यायालय मुंबई यांनी रिट याचिका क्र. २७९७/...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संदर्भात ऍड. आंबेडकर यांचे जनतेला आवाहन !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संदर्भात ऍड. आंबेडकर यांचे जनतेला आवाहन !

शासन यंत्रणा
पुणे/दि/ महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने महाराष्ट्र सरकारने मिनी लॉकडाऊन घोषित केला आहे. तो योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे. १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती सर्व स्थरांवर मोठ्या उत्साहात साजरी होते, त्याबाबत शासन काही नियमावली जाहीर करेल असं सांगण्यात येतंय. तेव्हा संपूर्ण जनतेला माझं आवाहन आहे की आपण शासनाच्या नियमांनुसारच जयंती साजरी करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. ...
हॉस्पीटलला मालमाल विकली लॉटरी लागली की काय, १५/२० वर्षात करण्यात आलेली हॉस्पीटलची कर्जे, कामगारांची देणी अवघ्या दीड वर्षात फिटली, डॉक्टर- हॉस्पीटलवाले झाले मालामाल

हॉस्पीटलला मालमाल विकली लॉटरी लागली की काय, १५/२० वर्षात करण्यात आलेली हॉस्पीटलची कर्जे, कामगारांची देणी अवघ्या दीड वर्षात फिटली, डॉक्टर- हॉस्पीटलवाले झाले मालामाल

सामाजिक
पुणे/दि/ प्रतिनिधी/सध्या कोरोना संसर्ग महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. प्रत्येजण पोटासाठी नाही पण आरोग्य थोडक्यात जीवंत राहण्यासाठी सतत धडपडत आहे. त्यामुळे हॉस्पीटल चालक, मेडीकल दुकाने भलतीच मालामाल झाली असल्याचे दिसून येत आहे. नाशिक मधील एका डॉक्टरने तर चक्क १२०० रुपयांचे रेमडेसिव्हीर २५ हजार रुपयांना विकल्याचे समोर आले आहे. पुण्यातही अनेक औषधांचा पूर्वापार काळाबाजार सुरू असून, ज्या ज्या हॉस्पीटलवर वर्षानुवर्ष मोठ मोठाली कर्जे, देणी होती, ती सगळी कर्ज, कामगारांची देणी हे सगळेच्या सगळे कर्ज देणी एकट्या कोरोना महामारीने फेडून टाकले असल्याचे सध्या दिसून येत आहे. त्यामुळे ही नेमकी कोणत्या प्रकारची आरोग्य सेवा आहे याकडे आता लक्ष देणे आवश्यक ठरले आहे. संपूर्ण जगात कोरोना महामारीचा संसर्ग वाढत आहे. मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. सोशलमिडीयातून याबाबत उलट सुलट चर्चा सुरू...
पुणे महापालिकेत मनुवाद्यांचा विखारी थयथयाट, शासनाने खुल्या व मागास प्रवर्गातील पदोन्नतीची १०० टक्के पदभरतीचे आदेश…. कायदयाच्या राज्यात आजही इंदलकरी बेकायदा कृत्य

पुणे महापालिकेत मनुवाद्यांचा विखारी थयथयाट, शासनाने खुल्या व मागास प्रवर्गातील पदोन्नतीची १०० टक्के पदभरतीचे आदेश…. कायदयाच्या राज्यात आजही इंदलकरी बेकायदा कृत्य

सर्व साधारण
पुणे/दि/ प्रतिनिधी/मुघलांच्या जोखडातून रयतेच राज्य कुळवाडी भुषण छत्रपती शिवरायांनी मुक्त केलं. पुण्यावर गाढवाचा नांगर फिरविण्याची भाषा करणार्‍या सनातन्यांना चोख प्रत्त्युत्तर देत, मॉंसाहेब जिजाऊ आणि शिवरायांनी सोनाचा नांगर याच पुण्यात प्रथम रोवला. परकीय मुघलांची राजवट नष्ट केली म्हणून सनातन्यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवरायांविरूद्ध सतत कट कारस्थाने केल्याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. महाराज युद्धात हरावे म्हणून वाईत शतचंडी यज्ञ कुणी केला हे सर्वांना ज्ञात आहेच. अफजलखानाच्या भेटीवेळी कृष्णा भास्कर कुळकर्णी यानेच छत्रपती शिवरायांवर तलवार उगारली होती, त्याच सनातन्यांनी नंतरच्या काळात रयतेच्या राज्याचे दोन तुकडे केले आणि पुण्यात स्वतःला राजे म्हणून घोषित केले. पेशवाव्यांनी पुण्यात स्वतःची राजवट सुरू केली. शिवकाळात राजशिष्ठाचार विभागात कारकुणी काम करणार्‍यांनी स्वतःला राजे म्हणून घोषित कर...
पुणे बार्टीमार्फत ऑनलाईन एमपीएससी मुख्य परीक्षा मार्गदर्शन आयोजन

पुणे बार्टीमार्फत ऑनलाईन एमपीएससी मुख्य परीक्षा मार्गदर्शन आयोजन

सामाजिक
पुणे/दि/डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी माहे जुलै ते सप्टेंबर २०२० या दरम्यान यू ट्युब चॅनलवर इरीींळ जपश्रळपश द्वारे एम. पी. एस. सी. पूर्व परीक्षेचे ऑनलाइन प्रशिक्षण सुरु करण्यात आलेले होते. या प्रशिक्षणादरम्यान एमपीएससी पूर्व परिक्षेतील विषयांचे मार्गदर्शन देण्यात आले होते. १८ मार्च २०२१ पासून एमपीएससी मुख्य (चरळपी) परिक्षेसाठी ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहे. या मार्गदर्शन वर्गामध्ये एमपीएससी मुख्य परिक्षेस आवश्यक उर्वरित अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन दिले जाईल. तरी इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया बार्टी, पुणे च्या ुुु.लरीींळ.ळप या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड तसेच ई- बार्टी मधील च-र्सेींशीपरपलश अर्ंतगत ऑनलाईन एमपीएससी मुख्य (चरळपी) परीक्षा ऑनलाईन कोचिंगसाठी प्रवेश अर्ज या लिंकवर उपलब...
फडणवीसांना हप्तेखोरीचा अनुभव, आरएसएसला किती वाटा दिला? नाना पटोले यांचा सवाल

फडणवीसांना हप्तेखोरीचा अनुभव, आरएसएसला किती वाटा दिला? नाना पटोले यांचा सवाल

राजकीय
मुंबई/दि/गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत कॉंग्रेस का बोलत नाही असा सवाल करणार्‍या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टोला लगावला आहे. फडणवीस यांना मोठा हप्तेखोरीचा अनुभव आहे. त्यांनी पाच वर्षात आरएसएसला किती वाटा दिला? असा सवाल करतानाच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्यावर पलटवार केला. वसुली कशी करतात? वसुलीतील वाटा किती असतो? त्याचे वाटप कसे केले जाते? याचा दांडगा अनुभव फडणवीस यांना असून ते त्यांचा अनुभव कथन करीत आहेत असा टोला पटोले यांनी हाणला. पाच वर्षे सत्तेत असताना मंत्रालयात आरएसएसचे कार्यकर्ते सर्व विभागात कसे घुसवले होते. ते किती वसुली करत होते, त्यातला किती वाटा आरएसएसला जात होता याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमं...
देशातील ८ एजन्सीज माझा फोन टॅप करतायत; बाळासाहेब आंबेडकरांचा खळबळजनक आरोप

देशातील ८ एजन्सीज माझा फोन टॅप करतायत; बाळासाहेब आंबेडकरांचा खळबळजनक आरोप

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/तब्बल आठ एजन्सीकडून माझा फोन टॅप केला जात आहे. माझे त्याबद्दल काहीही आक्षेप नाही. त्यांनी खुशाल माझा फोन टॅप करावा, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. राज्यात सध्या गाजत असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणावर त्यांना प्रश्न विचारला असताना त्यांनी याबद्दलचे उत्तर दिले. माझं फोन टॅपिंग होतो. माझा फोन आता ऑन केला तरीही फोन टॅप होतो हे मी दाखवू शकतो. माझा फोन टॅप करणार्‍या एक एजन्सी नाही. आठ एजन्सी आहेत. त्यांच्याकडून फोन टॅप केला जात आहे, असा खळबळजनक दावा बाळासाहेब आंबेडकरांनी केला आहे. मी खुशाल म्हणतो, माझे फोन टॅप करा. माझे त्याबद्दल काहीही ऑब्जेक्शन नाही. मी कोणत्याही गुन्हेगाराशी बोलत नाही. तसेच कोणालाही फोन करुन पैसे मागत नाही, असेही ते म्हणाले.उद्धव ठाकरे यांना कणा नाहीमहाविकासआघाडी सरकारमध्ये गुन्हेगारी वृत्ती आहे. त्यामुळे...