भगवे झेंडे घेतलेल्या जमावाकडून दगडफेक-कोरेगाव भीमा हिंसाचार
मुंबई/दि/ कोरेगाव भीमा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा निष्कर्ष
काढणार्या पुण्याच्या सत्यशोधन समितीचे सदस्य भीमराव बनसोड यांनी गुरुवारी चौकशी आयोगापुढे
साक्ष नोंदविली. ‘१ जानेवारीला भगवे झेंडे घेऊन हजारोंचा जमाव कोरेगाव भीमा येथे दाखल
झाला. हे लोक स्थानिक नव्हते. या जमावाने विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या
जमावावर दगडफेक केली,’ असा निष्कर्ष त्यांनी या अहवालात काढला आहे.
सत्यशोधन
समितीने सादर केलेल्या अहवालानुसार, वढूच्या रहिवाशांना १ जानेवारीला काहीतरी अघटित
घडणार याची चाहूल लागली होती. कारण गोविंद गोपाळ समाधीच्या शेडची तोडफोड करण्यात आली.
तेथील फलकही काढला होता. संभाजी महाराजांच्या समाधीजवळ काहीतरी अघटित घडणार, अशी अफवाही
पसरली होती.
&nbs...