आंबेडकरवाद्यांनो सावधान ! ऍड. बाळासाहेब आंबेडकर
पुणे/दि/
‘आम्ही यापुढे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपाबरोबर
जाणार नाही’ असा निर्णय पंढरपूरच्या धनगर मेळाव्यामध्ये धनगर समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी
एकत्र येऊन घेतला. याचे काही कारण आहे आणि त्यामागे एक भूमिका आहे. धनगर समाजातील डोळसपणे
राजकारण करणार्यांना आता असे जाणवत आहे की, गेली ७० वर्ष धनगर समाजाला या पक्षांनी
मतदानासाठी वापरले. पण, समाजाचे प्रश्न हे सोडवू शकले नाहीत किंवा ते सोडवण्याची त्यांची
इच्छासुद्धा नाही. या कारणामुळेच धनगर आणि आदिवासी यांच्यात नाहक भांडण लावून मतभेद
निर्माण केले गेले आणि ते एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. आता या समूहांनी ठरवले आहे
की, आम्ही या पुढे सत्तेचे राजकारण करणार, मागणीचे राजकारण करणार नाहीत. सत्तेमध्ये
येवून आम्हीच आदिवासींशी चर्चा करून ‘धनगर आणि ...