
पुण्यातील सार्वजनिक बांधकाम खात्यावर पंचरंगी टोळधाडीचा कब्जा
पुण्याच कौन्सिल हॉल शाखा ही एम-२ दौलतिचे जहॉंगिरदारांना बहाल केली आहे. उठ सुट मुखेकर,मुळे. मागील २० वर्षात कौन्सिल हॉल शाखेला तिसरा अभियंता मिळणार आहे की नाही….
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्याचे माजी खासदार कै. विठ्ठलराव गाडगीळ हे केंद्रात नभोवाणीमंत्री आणि नंतर दूरसंचार दळणवळण मंत्री झाले. दुरदर्शन हा त्याचाच एक भाग होता. रेडीओ आणि दुरदर्शन हेच त्याकाळात मनोरंजनाचे साधन होते. त्या काळात दुरदर्शनवर हम पॉंच ही अतिशय लोकप्रिय मालिका गाजली होती. त्याचीच आठवण आता पुण्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभार आणि आस्थापनेकडे पाहिले तर जाणवते. शाखा अभियंता इथच, उपअभियंता आणि नंतर कार्यकारी पदावर देखील पुण्यातच पदस्थापना करून घेण्याचा बहुमान ह्या पाच मंडळींनी करून दाखविला आहे. राज्यात सत्ता कुणाचीही असो ही पॉंच मंडळी स्वतःकडील कुकर्तूत्वाचा ठसा उमटवून आहे त्याच जागेवर कायम राहण्याचा मनसुबा पूर्ण करी...