Friday, April 4 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

पुण्यातील पोलीसांच्या क्रीडा स्पर्धा उद्घाटनाला मुख्यमंत्री गैरहजर, पोलीस दल व खेळाडूंचा हिरमोड, कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलीसांकडून स्पेशल स्कॉडची स्थापना

पुण्यातील पोलीसांच्या क्रीडा स्पर्धा उद्घाटनाला मुख्यमंत्री गैरहजर, पोलीस दल व खेळाडूंचा हिरमोड, कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलीसांकडून स्पेशल स्कॉडची स्थापना

पोलीस क्राइम
Eknath shinde cm पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/पुण्यातील रामटेकडी येथील एसआरपीएफ ग्राऊंडवर पोलीस क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 7 जानेवारी पासून करण्यात आले असून आज त्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार होते. तथापी काही कारणास्तव पोलीस क्रीडा स्पर्धा उद्घाटनास मुख्यमंत्री हजर राहिले नाहीत. त्यामुळे पोलीस दल व खेळाडूंचा हिरमोड झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान कोरोना साथीनंतर तब्बल तीन वर्षानंतर ह्या क्रीडा स्पर्धा होत आहेत. असे असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न आल्यामुळे सर्वांचा हिरमोड झाला असल्याचे पत्रकार परिषदेत दिसून आले आहे. दरम्यान या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह पुण्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिका...
आज दि. 11 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा

आज दि. 11 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा

पोलीस क्राइम
national forum Daily Crime Report 11-01-2023 आजचे पोलीस स्टेशन = कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन, विमानतळ पोलीस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, कोथरूड पोलीस स्टेशन, बिबवेवाडी पोलीस स्टेशन सामाजिक सुरक्षा विभागाचा कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत पुनः छापा,रात्री 10 नंतर कर्णकर्कश्य आवाजात सुरू असलेल्या रेस्टोबार वर कारवाई, पावणेदोन लाखाचा साऊंड सिस्टीम जप्त-कोरेगाव पार्क/ पुणे/ सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस कर्मचारी ऑल आऊट मोहिमे दरम्यान कोरेगाव पार्क भागात गस्त घालत असतांना, कोरेगाव पार्क येथील लेन नं. 7 वरील पब्लिक रेस्टोबार मध्ये कर्ण कर्कश्य आवाजात साऊंड सिस्टिमवर संगित सुरू असल्याचे दिसून आले. या हॉटेलवर कारवाई करून त्यांच्याकडील 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे साऊंड सिस्टिम जप्त करून हॉटेल मॅनेजर विरूद्ध पर्यावरण संरक्षण कायदयाअंतर्गत ध्...
श्री सम्मेद शिखर जी, पालीताना आणि गिरनार जी यांना तीर्थ स्थान घोषित करावे : जैन समाजाची मागणी

श्री सम्मेद शिखर जी, पालीताना आणि गिरनार जी यांना तीर्थ स्थान घोषित करावे : जैन समाजाची मागणी

सामाजिक
पुणे/दि/ नॅशनल फोरम/झारखंडमधील पारसनाथ येथे असलेल्या जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरबाबत केंद्र सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. याच निर्णयाप्रमाणे श्री सम्मेद शिखर जी तीर्थ स्थान घोषित करावे अशी मागणी करीत आणखी एक जैन समाजाचे पवित्र स्थान असलेल्या गुजरातमधील पालीताना तीर्थ आणि गिरनार तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात आले आहे, त्यामुळे हेही तीर्थ स्थान म्हणून घोषित करावे अशी मागणी आज आयोजित पत्रकार परिषदेत जैन समाजासाठी कार्यरत राष्ट्रीय पार्श्व भैरव भक्त परिवार संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोदराज सांकला यांनी केली. पत्रकार परिषदेस अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलनचे नितीन अग्रवाल, अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अन्ड एज्युकेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल उपस्थित होते . यांनीही या मागणीस समर्थन दिले. पुढे विनोदराज सांकला म्हणाले, आमची राष्ट्रीय पार्श...
कोयते,तलवारी, बंदूकांनतर आणि ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक

कोयते,तलवारी, बंदूकांनतर आणि ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक

पोलीस क्राइम
पुणे शहर पोलीसांनी ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन केलं,कोयते, तलवारी, बंदूका पकडल्या, आता गुन्हे करण्यासाठीचे उत्तेजित ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक पुणे/दि/ नॅशनल फोरम/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुण्यातील गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांनी, कायदयाचा आणि पोलीसांचा धाक, पुण्याच्या मुळा-मुठा नदीत विसर्जित केल्यासारखे, संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. दिवस असो की रात्र, हातात कोयते घेवून नागरीकांना धमकाविणे, हॉटलचालक, टपरीचालकांवर कोयता उगारणे, थांबलेल्या व जात असलेल्या वाहनांवर कोयते मारून वाहनांचे नुकसान करणे सारख्या घटना कधी नव्हे ते पुणे शहरात होत आहेत. पकडण्यात आलेले बहुतांश आरोपी हे अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही उत्तेजना नेमकी कशामुळे आली आहे…. कोयते उगारत असतांना त्यांची शारिरीक व मानसिक उत्तेजना याचा विचार करता, देशी विदेशी मदय तसेच गांजा, मेफेड्र...
पुणे शहर पोलीसांच्या रेकॉर्डवर 3 हजार 765 गुन्हेगार,<br>23 जानेवारी पर्यंत पुणे शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी…

पुणे शहर पोलीसांच्या रेकॉर्डवर 3 हजार 765 गुन्हेगार,
23 जानेवारी पर्यंत पुणे शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी…

पोलीस क्राइम
national forum pune गुन्हेगारांचा सर्वाधिक वावर हॉटेल, लॉज, ढाबे, रेल्वे स्टेशन, एस.टी व बस स्थानकांवर… ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेच्या पथकांनी 110 हॉटेल, लॉज तर पोलीस स्टेशनच्या पथकाने 427 हॉटेल, लॉज तपासुन सुमारे 3 हजार 765 गुन्हेगारांपैकी 698 गुन्हेगारांची धरपकड पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या स्तरावरून सोमवार व मंगळवार या दोन दिवशी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले असून, यामध्ये सर्व गुन्हे शाखा व सर्व पोलीस स्टेशनने सहभाग नोंदविला आहे. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेच्या पथकांनी 110 हॉटेल, लॉज तर पोलीस स्टेशनच्या पथकाने 427 हॉटेल, लॉज तपासुन सुमारे 3 हजार 765 गुन्हेगारांपैकी 698 गुन्हेगार मिळून आले आहेत.तसेच सराईत गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलीस उपआयुक्त विशेष शाखा यांनी दि. 23 जानेवारी 2023 ...
फरासखाना पोलीस हद्दीतील बोहरी आळीवर यंदा गुन्हे शाखेची संक्रांत

फरासखाना पोलीस हद्दीतील बोहरी आळीवर यंदा गुन्हे शाखेची संक्रांत

पोलीस क्राइम
सामाजिक सुरक्षा विभागाने बंदी असलेला पंतगाचा मांजा जप्त केला, तर गुन्हे युनिट क्र. 1 यांची कोयत्यावर संक्रांत पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumकोणत्याही जाती व धर्माचा सण उत्सव असो, घर सजावटीचे सर्व साहित्य बोहरी आळीत मिळणार म्हणजे हमखास मिळणार हे पुणेकरांना पक्के ठाऊक आहे. दिवाळी,दसरा असो की, ईद, ख्रिसमस, गणपती उत्सव की डॉ. आंबेडकर जयंती… पुणेकर नागरीक महात्मा फुले मंडई, लक्ष्मी रोड वर आला नाही असे कधी होतच नाही. मंडई, लक्ष्मी रोड नंतर सर्वांचे पाय बोहरी आळीकडे वळतात असा अनुभव आहे. परंतु यंदा याच बोहरी आळीवर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील गुन्हे शाखेची संक्रांत आली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाकडून प्रतिबंधित मांजा जप्त -पुण्यातील रविवार पेठेतील बोहरी आळी येथे प्रतिबंधित मांजा साठवणूक करून विक्री करीत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेला प्राप्त झाली. या अनुषंगाने सामाजि...
कोयता विक्री करणाऱ्यांवर क्राईम ब्रँच युनिट क्र. 1 ची छापेमारी,<br>निलेश साबळे, अजय थोरात यांची धडक कारवाई,

कोयता विक्री करणाऱ्यांवर क्राईम ब्रँच युनिट क्र. 1 ची छापेमारी,
निलेश साबळे, अजय थोरात यांची धडक कारवाई,

पोलीस क्राइम
Crime Branch unite no.1 पुणे/दि/नॅशनल फोरम/भारती विद्यापीठच्या यंगस्टार पोलीसांनी कोयत्याची दशहत माजविणाऱ्यांना साऊथच्या चित्रपटासारखे ऑन द स्पॉट कायदयाचा बडगा उगारल्यानंतर, आता गुन्हे शाखा युनिट क्र. 1 कडील निलेश साबळे व अजय थोरात यांनी देखील, ज्या कोयत्यांच्या बळावर शहरात, कोयत्याची दहशत माजविली जात आहे, ते कोयते नेमके येतात तरी कुठून याच्या शोधार्थ पेट्रोलिंग करीत असतांना, जुन्या बाजारासह संपूर्ण शहर पालथे घालते. शेवटी फरासखाना हद्दीतील बोहरी आळीत कोयता विक्री करीत असल्याचे आढळुन आल्यानंतर, दे दणादण कारवाई करण्यात आली. बोहरी आळी येथे सुमारे 105 कोयते जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान जप्त करण्यात आलेले कोयते आणि छापेमारी करून पकडण्यात आलेले कोयत्यात साम्य आढळले असल्याचे दिसून येत आहे. मागील एक महिन्यात संपूर्ण पुणे शहरात कोयत्याची एवढी दहशत माजविली आहे की, हा विषय विरोधी पक्ष नेते श्...
आज दि. 9 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा

आज दि. 9 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा

पोलीस क्राइम
national forum pune पोलीस स्टेशन - कोंढवा पोलीस स्टेशन, सहकारनगर पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, क्राईम युनिट क्र. 2, सामाजिक सुरक्षा विभाग, पुणे शहर पोलीस आयुक्तालय 1.कोंढव्यातील लुल्ला नगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत लहान मोठ्या गुन्हेगारी कारवायांचा चढता आलेख,चिक्या भाईला का शिव्या देतो- मध्ये कोणी आला तर खल्लास करून टाकेन…3.लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत-ट्रॅक्टर एक्सचेंज करण्याच्या बहाण्याने मोबाईल फोन पळविला4.चतुशृंगी पोलीस स्टेशन येथे स्टील पाईपची चोरी5.कोंढव्यात साडेचार लाख रुपयांची घरफोडीबातम्या विस्ताराने- कोंढव्यातील लुल्ला नगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा विभागाचा छापापुणे/दि/कोंढव्यातील लुल्लानगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली ...
कोयता गँग विरूद्ध पुणे पोलीस आक्रमक होणार तरी कधी…

कोयता गँग विरूद्ध पुणे पोलीस आक्रमक होणार तरी कधी…

सर्व साधारण
पप्पुभाई, पिंटूभाई, बब्लुभाईचे लाड आता पुरे झाले,5/6 पोलीस स्टेशन नंतर आता मध्यवर्ती पुणे शहरातील लष्कर, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गँगचा धुडगुस, अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे एवढे आकर्षण कसे वाढले… शहरात कोयते उगारून दशहत माजविण्यामागचा उद्देश काय…पप्पुभाईच्या नादाला लागाल तर एकेकाला खल्लास करून टाकेन… पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumपुण्यातील बत्तीस पोलीस स्टेशन पैकी मुंढवा, वानवडी लोणी परिसरात कोयता गँगने दहशत माजविल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात पुनः कात्रज, भारती सिंहगड मधील अल्पवयीनांनी धुडगूस घातला. आता तर मध्यवर्ती पुणे शहरातील लष्कर परिसरात राडा केल्यानंतर, पुन्हा त्याच दिवशी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील जंगली महाराज खाऊ गल्लीत कोयताखोरांनी दहशत माजविली आहे. जिकडे तिकडे कोयता, पालघन आणि हॉकीस्टीक घेवून अल्पवयीनांचा ...
बेरोजगारीचे भीषण वास्तव! पोलीस शिपाई होण्यासाठी डॉक्टर, अभियंते, वकील, एमबीए, पदव्युत्तरही रांगेत

बेरोजगारीचे भीषण वास्तव! पोलीस शिपाई होण्यासाठी डॉक्टर, अभियंते, वकील, एमबीए, पदव्युत्तरही रांगेत

शासन यंत्रणा
बेरोजगारी व महागाई या विषयावर राजकीय पक्ष आणि पत्रकारांची तोंडे कोणत्या कारणाने बंद झाली आहेत तेवढं तरी सांगा, पुणे/दि/ नॅशनल फोरम/दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या, सर्वांना उच्च शिक्षण, शिक्षण व नोकरीतील आरक्षणाला संरक्षण, महागाई कमी केली जाईल, सर्वांना स्वतःचे घर, देशातील एकही नागरीक उपाशी राहणार नाही अशा प्रकारच्या लोकप्रिय घोषणांनी प्रत्येक निवडणूका चांगल्याच गाजल्या. परंतु मागील 70 वर्षात देशाच्या मालकीच्या सर्व सरकारी कंपन्यांची विक्री केल्यामुळे सरकारी कंपन्यातील आरक्षण आपोआप संपुष्टात आले. सरकारी कार्यालयातही घटनात्मक आरक्षणाची पदे न भरता, ती पदे पीपीपी तत्वावर भरली गेल्यामुळे आपोआपच घटनात्मक आरक्षण संपुष्टात आले आहे. लहान व मध्यम स्वरूपाचे लहान उद्योगांवर सर्वच प्रकारचे कर लादल्यामुळे होते नव्हते ते सर्व उदयोग बंद पडले.याचा सर्व परिणाम असा झाला की, पुण्यासह संपूर्ण देशात बेरोजगार...