Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची अवैध धंदयावरील कारवाई संस्थगीत ….

सामाजिक सुरक्षा शाखेविरूद्ध स्थानिक पोलीसांचा एल्गार… परिणामी….. पुणे शहर अवैध धंदे मुक्त करण्याचा संकल्प, अवैध कृत्यांपासून पुणे शहराचे शुद्धीकरण मोहिमेला स्थानिक पोलीसांकडून खिळ


पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी पुणे शहर अवैध धंदे मुक्त करण्याचा संकल्प केला असून, अवैध कृत्यांपासून पुणे शहराचे शुद्धीकरण मोहिम सुरू असल्याचे दिसून येत आहे. याच अनुषंगाने मध्यवर्ती पुणे शहरासह, संपूर्ण पुणे शहरात कारवाईचा धडाका सुरू ठेवला होता. तथापी स्थानिक पोलीसांनी, सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईविरूद्ध एल्गार पुकारल्यामुळे आजमितीस ही कारवाई तुर्त संस्थगित झाली असल्याचे दिसून येत आहे. तथापी अवैध धंदयाविरूद्ध कारवाई करतांना, पुणे शहर पोलीस दलातील सामाजिक सुरक्षा विभागाविरूद्ध एल्गार पुकारणे योग्य नसून, सातत्याने कारवाईचा बडगा उगारल्या खेरीज गुन्हेगारी कमी होणार नाही. 100 मोक्का कारवाई केली तरी गुन्हेगारी कमी झाली नाही. त्यामुळे सातत्याने कारवाई हाच गुन्हेगारी नियंत्रणाचा मार्ग असल्याचे दिसून येत आहे.

मध्यवर्ती पुणे शहरातील फरासखाना व खडक पोलीस स्टेशन हद्दीतील तथाथित मान्यताप्राप्त लॉटरीच्या नावाखाली एक आकडी मटका (चिठ्ठी) कल्याण मटका, सोरट, पंती पाकोळी, व्हिडीओ गेम, जुगार, गुडगुडी, 3 पत्ती, अंदर- बाहर, लाल – काला सारखे अवैध धंदे सुरू आहेत. त्याच बरोबर अंमली पदार्थांची मोठी बाजारपेठ पुणे शहरीत निर्माण झाल्याने, गुटख्यासारखे गांजा व एम.डी. सहज उपलब्ध होत आहेत. आज सर्व तरूणांचे लक्ष गांजा आणि एम.डी. वर केंद्रीत झाले आहे. त्यामुळे अवैध धंदयावर कारवाई करतांना अंमलीपदार्थांवर देखील कारवाई होणे आवश्यक आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाने मागील 15 दिवसात पुणे शहराच्या विविध भागात अवैध धंदयावर कारवाई करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच तथापी या कारवाई विरूद्ध स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ते स्वतःच कारवाई करीत नाहीत व पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा कारवाई करीत असतांना त्याविरूद्ध स्थानिक पोलीसांनी एल्गार पुकारलेला आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर कारवाई करावी किंवा नाही अशा प्रश्नांत सध्या सामाजिक सुरक्षा विभाग घेरला गेला आहे.
मध्यवर्ती पुणे शहरातून जाणाऱ्या फरासखाना, खडक, स्वारगेट, मार्केटयार्ड, बिबवेवाडी, पूर्वेकडून समर्थ, बंडगार्डन, येरवडा, विश्रांतवाडी, खडकी ही तर कुख्यात पोलीस स्टेशन आहेत. पोलीसांची भागीदारी कमी असली तरी गुन्हेगारांचा मोठा भरणा या धंदयामध्ये आहेत. चतुश्रृंगी, कोरेगाव पार्क, विमानतळ, मुंढवा, हडपसर, कोंढवा ही महाविख्यात पोलीस ठाणी असल्याचे एव्हाना जगजाहीर झाले आहे. सगळीकडे जुगारअड्डे आणि अंमली पदार्थांची मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. या बातमीत नमूद न केलेली काही पोलीस ठाण्यांवर तर थेटच गुन्हेगारांचे नियंत्रण आहे. गुन्हे शाखेतील युनिट 1 ते 5 यांच्या कारवाय ह्या तर हास्यास्पद ठरत आहेत. कारवाई कुणीच करीत नाहीत, केवळ धमकावित असल्याचे दिसून येत आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक हे वरीष्ठ व समकक्ष अधिकाऱ्यांचा रोष ओढवुन, मोठ्या हिकमतीने अवैध धंद्यावर कारवाई करीत असल्याचे दिसून येत आहे. आज फरासखाना, खडक, स्वारगेट, मार्केटयार्ड, बिबवेवाडी, हे एकाच रस्त्यावर असलेल्या पोलस स्टेशन हद्दीत मुंबई बाजार, कल्याण मटका, सोरट, पंती पाकोळी, व्हिडीओ गेम, जुगार, गुडगुडी, 3 पत्ती, अंदर- बाहर, लाल – काला सारखे अवैध धंदे सुरू आहेत. एकट्या फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे 23 ते 28 धंदे बेकायेशिररित्या सुरू असल्याचे दिसून येते.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी मागील 15 दिवसांपासून पुणे शहरातील अनेक जुगार अड्डयांवर कारवाई करून, खेळणारे व खेळविणारे अशा सर्वांना अटक केली आहे. तथापी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने कारवाई केली तरी स्थानिक पोलीस पोलीस स्टेशन कारवाई करण्यास कसुरी करीत असल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा यांनी कारवाई केली, त्याच ठिकाणी पुनः दोन तासात अवैध बेकायदेशिर धंदे पुनः सुरू झाले आहेत.
काही उदाहरणेच दयायची तर परिमंडळ एक मधील फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील बुधवार पेठेतील पीडीसीसी बँकेजवळ सुरू असलेल्या या धंदयावर कारवाई केल्यानंतर, आता हा बेकायदेशिर धंदा ढमढेरे गल्लीत एकुण सहा पार्टनरसह सुरू करण्यात आलेला आहे. दगडी नागोबा, तांबट आळीत जुगाराचा फड जमत आहे. लॉटरीची 15/20 दुकाने दिवस- रात्र ढाणढाण वाजत असतात. एकाच हद्दीत 25 ते 30 बेकायदा जुगार अड्डे सुरू असल्याचे सांगितले जाते. खडक हद्दीतही अमुल बटर, नंदू पराठा आणि बडे का गोश जोरात आहे.
समर्थ मध्ये अप्पाच्या गप्पा बाराके बाद सुरू होत आहेत, अपोलो अड्डा तेजित आहेच शिवाय 20/30 विश्रामशयनयान गृहांतून इतर उद्योग सुरू आहेत ते वेगळेच. तिकडं डेक्कनही 360 डिग्रीत धावत आहे, सगळा बाजार भरला आहे. परिमंडळ 1 ते 5 मोठा बाजार भरला आहे. सगळीकडे अंमली पदार्थांसह जुगार खेळण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. पोलीस आयुक्तालय व सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडून कितीही कारवाई झाली तरी स्थानिक पोलीसांचे पाठबळ मिळत असल्याने धंदयाच्या जागेत बदल केला जात आहे. परंतु धंदे आजही सुरू ठेवण्यात आले असल्याचे दिसून येते. त्यामुळे सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईत स्थानिक पोलीसांसह गुन्हे शाखेने योगदान देणे आवश्यक असल्याचे मत काहींनी व्यक्त केलं आहे.