Friday, December 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

खडक पोलीसांची तत्परता, साडेतील लाखांचा ऐवज असलेली बॅग रिक्षात विसरली… आणि….

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
सरकारी काम अन्‌‍ सहा महिने थांब अशी सरकारी कार्यालयांची थट्टा केली जाते. वास्तव काहीही असले तरी आज खडक पोलीसांची तत्परता पुनः दिसून आली आहे. आज गुरूवार दि.27 एपिल रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पल्लवी कुणाल लुंकड वय -39 रा. मानपाडा या पुणे स्टेशन वरून रिक्षा घेऊन पार्श्वनाथ जैन मंदिर पुणे येथे दर्शनासाठी आले असता, त्यांची रिक्षामध्ये मौल्यवान वस्तू व महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग विसरली होती.


या बॅगमध्ये 4 तोळ्याचे गंठण व 1 लाख 20 हजार रुपयांचे बेरर चेक व तसेच शाळेचे संस्थेचे फी रजिस्टर असा एकूण अंदाजे 3 लाख 40 हजार रुपये किमतीचा ऐवज होता. संबंधित महिला महात्मा फुले पेठेतील मीठगंज पोलीस चौकी येथे आले असता, वरील घडलेला प्रकार पोलीसांना सांगितला. खडक पोलीसांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपास सुरू केला.
खडक पोलीस स्टेशन यांच्याकडील पोलीस शिपाई 8805 पठाण, पोलीस शिपाई 9825 शेख, पोलीस शिपाई 9940 खरात यांनी मिळून हद्दी मधील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून सदर रिक्षा क्रमांक 12-8060 शोधुन काढली. तसेच रिक्षा मालकाचा शोध घेऊन बॅग प्राप्त करण्यात आली.रिक्षा मालकाकडून प्राप्त केलेली बॅग पल्लवी लुंकड यांच्या ताब्यात दिली असून सदर महिलेने खडक पोलीस स्टेशन मधील सर्वांचे आभार मानले आहेत.