Sunday, November 1 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पुण्याच्या क्राईम युनिट एकने पकडला 10 लाखाचा गुटखा, पोलीस अंमलदार मंहमद हनिफ शौकत शेख यांची कामगिरी

नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/
मध्यवर्ती (सेंन्ट्रल) पुण्यातील पेठांमध्ये अंमली पदार्थांचे गैरव्यवहारांच्या अनुषंगाने क्राईम युनिट एक कडील पोलीस अधिकारी व अंमलदार तपास करीत असतांना, कादरभाई चौकातील लँडमार्क हौसिंग सोसायटीच्या तळमजल्यावरील गोडावुन मध्ये सुमारे 10 लाखाचा प्रतिबंधित गुटखा आढळुन आल्याने, आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

गुन्ह्याची हकीकत अशी की,
क्राईम युनिट एक कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत गुन्हे प्रतिबंध व अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराच्या अनुषंगाने तपास करीत असतांना, युनिट एक कडील

मा. वरिष्ठांचे आदेशान्वये दि. 29/10/2026 रोजी गुन्हे शाखा युनिट 01 चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना

पोलीस अंमलदार मंहमद हनिफ शौकत शेख यांना एक गुप्त बातमती समजली की, कादरभाई चौक शेजारील लँडमार्क हौसिंग सोसायटीचे तळातील गोडावुन मध्ये एका इसमाने गुटख्याची साठवणूक करुन ठेवली आहे. सदरची बातमी ही प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिपक लगड यांना कळवुन, लागलीच कायदेशिर कारवाई करण्याचे आदेशित केलेने पोलीस अधिकारी व अंमलदार पथक हे खाजगी वाहनाने कागदरभाई चौकात गेले असता सदर ठिकाणी इसम थांबलेला मिळुन आला.

युनिट 01 कडील  पथकाने त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारता त्यानी त्याचे नाव उबेद असिफ अंन्सारी (वय 21 वर्षे रा. कोंढवा पुणे ) असे सांगितले त्याने आपले कब्जात प्रतिबंधीत तंबाखुजन्य गुटखा हा पदार्थ एकुण 9 लाख 89 हजार 427 रुपये किंमतीचा विविध कंपन्याचा गुटखा व सुपारी हा तंबाखुजन्य पदार्थ असा माल विक्रीसाठी साठवुन ठेवलेला असताना मिळुन आला.  सबंधितांविरूद्ध विरुध्द समर्थ पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलमा सह सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियम तसेच अन्न सुरक्षा मानके अधिनियम कायदयाचे उल्लंघन केल्याने कलम 59 प्रमाणे कायदेशीर कारवाई करुन पुढील कारवाईकामी समर्थ पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती तेजस्वी सातपुते. ,पोलीस उप-आयुक्त गुन्हे शाखा श्री. गौहर हसन, सहा. पोलीस आयुक्त श्री शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट 01 गुन्हे शाखा पुणे शहर श्री दिपक लगड यांचे सुचनांप्रमाणे सहा पोलीस निरिक्षक धीरज राऊत, पोलीस अंमलदार प्रमोद जगताप, विनोद चव्हाण, बाबा दांगडे, संतोष नागरे, संतोष अनुसे, महिला पोलीस अंमलदार रेश्मा कंक पो. अंमलदार संजयकुमार अबनावे गणेश गोसावी, आशिष खरात, उमेश शेलार, अविनाश दळवी, यांनी केली आहे.