बिहार (पाटणा)/दि/
मागासवर्गीय अधिकार्यांना प्रमोशन मिळू नये म्हणून काही श्रीमंत मराठे प्रयत्नशील असून अशा लोकांचा आम्ही निषेध करतो. राज्यातील मागासवर्गीय अधिकार्यांची आरक्षणांतर्गत किती पद भरण्यात आले असून किती पद राहिली आहेत शिवाय किती मागासवर्गीय अधिकार्यांना आरक्षणाच्या आधारे प्रमोशन देण्यात आले आहे, याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडे मागितली आहे. मात्र ही माहिती उपलब्ध असूनही महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात द्यायला तयार नाही, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळसाहेब आंबेडकर यांनी केला आहे.
निवडणुकीसंदर्भात बाळासाहेब आंबेडकर हे सध्या बिहार (पान ४ पहा)
(पान १ वरून)मध्ये आहेत मागासवर्गीय बाबत बाळासाहेब आंबेडकर यांनी सरकारवर गंभीर आरोप करताना त्याचा जाहीर निषेध केला आहे. दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने एका समितीचे गठन केले असून ही समिती मागासवर्गीयांच्या आरक्षण संदर्भात माहिती घेणार आहे. असे असले तरी हा सर्व प्रकार फसवा असून मागासवर्गीय अधिकार्यांना प्रमोशन मिळू नये म्हणून काही श्रीमंत मराठे प्रयत्नशील असल्याचा गंभीर आरोप बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे.
राज्यातील सर्व मागासवर्गीय अधिकारी जे सध्या प्रमोशनच्या यादी मध्ये आहेत, त्या सर्वांना बाळासाहेब आंबेडकर यांनी विनंती केली आहे की आपण आपल्या कुटुंबासह सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन उभे करा, अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.