Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शासनाच्या ७ मे च्या जीआर नंतर देखील पदोन्नती देण्यासाठी आता पुणे महापालिकेला पंचांग बघायचे आहे काय

शाखा अभियंता ते उपअभियंता पदावरील पदोन्नतीचे आदेश देण्यात एवढा विलंब कशासाठी…


पुणे/दि/ प्रतिनिधी/
शासनाच्या नगरविकास मंत्रालय नावि कार्यासन क्र. २२ यांनी १४ जानेवारी २०२० रोजी पुणे महापालिकेतील शाखा अभियंता यांना उपअभियंता पदी पदोन्नती देत असतांना, कनिष्ठ अभियंता पदाचा अनुभव विचारात घेऊन पदोन्नती देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. दरम्यान २०१८ रोजीच्या शासन पत्रव्यवहारानुसार ९/१०/२०१८ रोजी अनेकांना पदोन्नती देण्यात आली होती. परंतु शासनाच्या २०२० रोजीच्या पत्रानुसार पुणे महापालिकेतील शाखा अभियंता यांना उपअभियंता पदावर पदोन्नती देणे अपेक्षित असतांना देखील त्यांना अद्याप पर्यंत पदोन्नती देण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे. पुणे महापालिकेतील कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात नेहमीच अडचणी निर्माण केल्या जात असून, ७ मे २०२० रोजीचा शासन निर्णय आलेला असतांना देखील पदोन्नतीचे आदेश दिले जात नसल्याने, आता पुणे महाालिकेतील सामान्य प्रशासन विभाग शासनाच्या जीआर पेक्षा वेगळ्या प्रकारचे पंचांग बघुन पदोन्नतीचा आदेश जारी करणार आहे काय अशी विचारणा आता कर्मचारी वर्गातून होत आहे.


माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिका यांनी ५/३/२०२१ रोजी अतिरिक्त आयुक्त जनरल यांनी कार्यालयीन परिपत्रक काढुन शासनाच्या नियमानुसार सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली आहे. या प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार शाखा अभियंता (स्थापत्य) या पदावरील अंतिम सेवा ज्येष्ठता यादी देण्यात आली आहे. यानुसार ज्येष्ठता क्र. १ ते ७ व १२ ते १६ यांना ९/१०/२०२१ रोजी शाखा अभियंता ते उपअभियंता अशी तदर्थ पदोन्नती देण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. तथापी जेष्ठता क्रमांक ८ ते ११ यांना पदोन्नती देण्यात आली नसल्याचे रिक्त कॉलमवरून दिसून येत आहे.
दरम्यान जेष्ठता क्र. ८ ते ११ हे मागास संवर्गातील कर्मचारी असल्याचे त्यांचे गटावरून दिसून येत आहे. शासनाने ७ मे २०२१ रोजीच्या जीआर मध्ये सेवाज्येष्ठतेने पदोन्नती देण्याबाबत आदेश जारी करण्यात आलेला आहे. जेष्ठता क्र. ८ ते ११ हे कर्मचारी शासनाच्या २००४ चे सेवाज्येष्ठता आदेशानुसार, पदोन्नतीस पात्र ठरत आहेत. तरी देखील शासन आदेशांची अंमलबजावणी केली जात नसल्याने कर्मचारी वर्गात असंतोष असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या ७ मे रोजीच्या जीआर नुसार तातडीने शाखा अभियंता ते उपअभियंता पदावर पदोन्नतीचे आदेश जारी करण्याची मागणी होत आहे.


पदोन्नती प्रकरणी पुणे महापालिका व राज्य शासनाचे पत्रव्यवहार –
माहितीचे अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिका यांनी ९/१२/२०१९ रोजी नगरविकास मंत्रालय यांना पत्रव्यवहार करण्यात आल्याचे दिसून येते. त्यानुसार नगरविकास मंत्रालयाचे कक्ष अधिकारी श्री. दिलीप वाणिरे यांनी पुणे महापालिकेस १४ जानेवारी २०२० रोजी पत्रव्यवहार केला असून, त्या पत्रामध्ये नमूद केले आहे की, कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंता या पदाचे कामाचे स्वरूप एक असल्याने कनिष्ठ अभियंता या पदावरून शाखा अभियंता या पदावर तदर्थ पदोन्नती दिलेल्या कर्मचर्‍यांना त्यांच्या अनुभवानुसार उपअभियंता या पदावर तदर्थ पदोन्नती देण्यास कोणतीही हरकत नसल्याचे कळविण्यात आले आहे.
तसेच पुणे महापालिकेने ९/१०/२०१८ रोजी शासनाचे कोणताही पत्रव्यवहार नसतांना देखील शाखा अभियंता ते उपअभियंता पदावर अनेकांना पदोन्नती दिली आहे. आता ७ मे रोजीचा शासन आदेश/ जीआर, शासनाचे २०२० रोजीचे पत्र असतांना देखील पदोन्नती देण्यात कसुरी होत असल्याचे दिसून येत आहे.