Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील सार्वजनिक बांधकाम खात्यावर पंचरंगी टोळधाडीचा कब्जा

पुण्याच कौन्सिल हॉल शाखा ही एम-२ दौलतिचे जहॉंगिरदारांना बहाल केली आहे. उठ सुट मुखेकर,मुळे. मागील २० वर्षात कौन्सिल हॉल शाखेला तिसरा अभियंता मिळणार आहे की नाही….


पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्याचे माजी खासदार कै. विठ्ठलराव गाडगीळ हे केंद्रात नभोवाणीमंत्री आणि नंतर दूरसंचार दळणवळण मंत्री झाले. दुरदर्शन हा त्याचाच एक भाग होता. रेडीओ आणि दुरदर्शन हेच त्याकाळात मनोरंजनाचे साधन होते. त्या काळात दुरदर्शनवर हम पॉंच ही अतिशय लोकप्रिय मालिका गाजली होती. त्याचीच आठवण आता पुण्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभार आणि आस्थापनेकडे पाहिले तर जाणवते. शाखा अभियंता इथच, उपअभियंता आणि नंतर कार्यकारी पदावर देखील पुण्यातच पदस्थापना करून घेण्याचा बहुमान ह्या पाच मंडळींनी करून दाखविला आहे. राज्यात सत्ता कुणाचीही असो ही पॉंच मंडळी स्वतःकडील कुकर्तूत्वाचा ठसा उमटवून आहे त्याच जागेवर कायम राहण्याचा मनसुबा पूर्ण करीत आहेत. त्यामुळे राज्यातील सा.बां. खात्यापैकी पुण्यात पाचच अभियंता मंडळी कर्तृत्वान असून बाकी सर्व अभियंते हे कुचकामी असल्याचा दाखलाच राज्याच्या सा.बां. मंत्रालयाने दिला आहे. ह्या पाच मंडळींचे प्रताप देखील हम पॉंच या मालिकेतील पात्रापेक्षा काही कमी दर्जाचे नाहीत हे देखील लक्षात घेण्यासारखी बाब आहे.


पुण्यातील सा.बां. चे अधिक्षक अभियंता श्री. अतुल चव्हाण ह्यांना तर पुणे सोडून बाहेर कुठे जायच म्हटलं तर नको नकोस वाटत. कार्यकारी पदावर असतांना, पुणे सा.बां., पुणे उत्तर त्यानंतर पुण्यातच प्रधानमंत्री आणि आता अधीक्षक सा.बां. मंडळी पुणे ह्या पदावर विराजमान झाले आहेत. कोणतं मेरिट आहे, ज्याच्या बळावर ते पुण्यात अधीक्षक पदावर अवघ्या दिडवर्षात पदस्थापित झाले आहेत हा एक संशोधनाचा विषय आहे.
अजय भोसले हे दक्षिणेकडील एका प्रांताचे सुभेदार होते. आता त्याच दक्षिणेचे राजे म्हणून पदस्थापित झाले आहेत. प्रशांत पाटील हे देखील पुण्याच्या उत्तरप्रांताचे सुभेदार होते. आता तेच इमारती प्रांताचे राजे म्हणून पदस्थापित झाले आहेत. बहिर हे सुभेदार देखील उत्तर प्रांताचे राजे म्हणून पदस्थापित झाले आहेत. राजेशाही युनियन ऑफ इंडियाच्या कायदयाने नोव्हेंबर १९४९ साली संपुष्टात आली आहे. परंतु आता देखील काहींना राजेशाहीचे उमाळे भरून येतात. वरील पदस्थापना ह्या राजेशाहीच्याच प्रतिक आहेत.


कौन्सिल हॉल शाखेला तिसरा वालीच नाही –


पुण्यातील कौन्सिलहॉल शाखा ही प्रोटोकॉल शाखा म्हणून गणली जाते. सर्व आमदार, खासदार, मंत्री, आणि राज्या राज्यातील बडी आसामी पुण्यात आल्यानंतर, त्यांचा पाहुणचार करण्याचा पहिला मान हा कौन्सिल हॉल शाखेचा आहे. त्यामुळे मंत्र्याच्या पुढे मागे लुटपूटु पळणे, उठबस करणे ह्याबाबी ओघाने आल्याच. त्यामुळे कौन्सिल हॉल शाखा ही पदरात पाडून घेण्यासाठी अनेक अभियंता मंडळी देव पाण्यात घालुन बसलेली असतात. मंत्रालयाच्या पायर्‍या झिजवुन, झिजवुन पायताण घासून गेली, पण कौन्सिल हॉल शाखा काही कुणाला मिळाली नाही. सध्या कौन्सिल हॉल शाखा ही दोन एम ची जहॉगिरी झाली आहे. थोडक्यात मुखेकर नावाचे अभियंता हे वर्षानुवर्षे याच खुर्चीवर पदस्थापित आहेत. पुणे मुंबई पुणे आणि पुणे. मध्यतंरी दोन एम एकाच वेळी पुण्यात आल्यामुळे, दोन एम.धार्‍यांना एकाच खुर्चीवर कसं बसवाचे हा गहन प्रश्‍न पडला होता. त्यामुळे तत्कालिन अधीक्षक अभियंता यांनी कौन्सिल हॉल शाखेचे विभाजन केले.
एकाच बारसं केलं सेन्ट्रल बिल्डींग शाखा आणि दुसर्‍याच कौन्सिल हॉल हेच नाव ठेवण्यात आलं. कालांतराने एकाची बदली काही दिवसांसाठी पुणे प्रांतातील एका भागात झाल्यानंतर, मोठ्या मनांन पदस्थापना स्विकारल्यामुळे, कौन्सिल हॉल शाखेचे विभाजन रद्द करून, पुन्हा ती एकच शाखा करण्यात आली. ह्या दोन एमसाठी पुण्याची सर्व यंत्रणा कामाला लागत आहे. दोन एम साठी अधीक्षक अभियंता देखील हळवे का होतात हा एक प्रश्‍नच आहे.


ठेकेदारांचे मसिहा आणि बदल्यांचे कारागिर –


शासनात बदल्या हा एक जिवंत आणि गहन विषय आहे. राजकारणा आणि सत्ताकारणा जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी साझेदारी हा नियम काही पक्षांनी ठेवला आहे. अगदी तीच यंत्रणा पुण्याच्या सा.बां.त कार्यरत आहे. जिसकी जितनी थैली भारी, उतना उसका पलडा भारी कार्यरत आहे. थोडक्यात दाम करी काम. बदल्या ह्या मेरिटवर नाही, जातीवर तर नाहीतच. इथल्या बदल्या ह्या दामरावांच्या बळावर होतात.
ठेकेदारांचेही तसेच आहे. मध्यंतरी डझनावारी ठेकेदारांनी बोगस पीएसडी सादर करून, शासनाची दिशाभूल केली. बोगस आहे, हे सर्वांना माहिती होते, परंतु तेरी भी चूप और मेरी भी चूप. या चुप्पाचूप्पीमुळं शासनाची फसवणूक तर झालीच, परंतु भरन न येणारे नुकसान देखील झालं आहे. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकलं तरी, तो ठेकेदार दुसर्‍याच्या नावाने नोंदणी करून, पुन्हा निविदा कामं घेण्यासाठी लाईनित उभा असतो. ह्या सर्व ठेकेदारांना कामे देण्यापासून ते बील काढण्यापर्यंत अनेकांचे हात लागलेले असतात.
ठेकेदारांचा दाम आणि बदल्यातील कामातून अधीक्षक व कार्यकारी पदांवरील क्लासवन अधिकार्‍यांना पगाराच्या दोनहजार पट रक्कम मिळत असल्यामुळे, ते पुण्यासाठी आग्रही असतात. कौन्सिल हॉल शाखेचा अभियंता म्हणजे मुख्यमंत्र्याच्या पी.ए. पेक्षा काही कमी नाही इतकी त्याची ताकद असते. इतरांच्या बदल्यांत सावकारपेक्षाही जास्त आवाज कौन्सिल हॉल शाखेचा असतो. (क्रमशः)