Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

तेलंग यांच्या तिढ्यावर ….कार्यमुक्ततेचं भूत बदली मानकर्‍यांच्या मानगुटीवर बसणार….

pwd pune ex eng.

पुणे/दि/
२०१९ सालं मागे पडलं. २०२० साल आलं. हॅपी न्यू इअरच्या शुभेच्छा सातासमुद्रापार पोहचल्या. परंतु २०१९ मध्ये सा. बां. पुणे विभागातील कर्मचार्‍यांच्या बदलीच्या श्रीमंतीबरोबर कार्यमुक्ततेच्या कंगालपणाच्या खुणाचे २०२० वर ओरखडे उमटलेले पटकन नजरेस भरले.
कार्यमुक्ततेवाचून सा.बां. पुणे विभागात एक एकट्याने वाढणारी पिढी, बदली कायदयाची ढासळणारी मूल्ये, कार्यमुक्तेच्या बडग्याने घुसमटून गेलेल्या भावना हे वास्तव मान्य करावयाचं कीनाही हा ज्याा त्याचा विचार अर्थात सा.बां. पुणे विभागाच्या यथेच्छ टवाळीचं लांबवर जनतेत पसरलेल्या इफेक्टिव्हली एक्सप्रेस लोणचं अर्थात घोंगावणार्‍या चर्चेतला हा अंतर्नाद आहे.
बदलीच्या समृद्धीइतकीच कार्यमुक्ततेचीही विभागाच्या आस्थापनेला, मंडळाच्या आस्थापनेला गरज असते. मग सा.बां. पुणे विभागतल्या बदली कर्मचार्‍यांच्या कार्यमुक्ततेची समृद्धी वाढविण्यासाठी बदली कायदयातील कलमांच्या काध्यमातून कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांनी यथाशक्ती प्रयत्न करणे हे त्यांचे प्रांजल शासकीय कर्तव्य होते. पण त्यांना या बाबीचं फारस महत्व वाटलं नाही.
निस्पृह कर्तव्य हे शासकीय संस्कारातून साधले जाते. (भोवतालच्या अर्धवट दुभाष्यांकडून किंवा भालदार चोपदारांकडून संकट उभं करणारं निष्क्रिय ज्ञानच गोत्यात आणतं बरं का) वास्तवात शाकसीय संस्कार करण्याचे शासन एक प्रभावी माध्यम आहे. शासकीय संस्कसार आणि कर्तव्य हे दोन्ही शब्द इथे व्यापक अर्थाने वापरले आहेत. शासकीय संस्कार म्हणजे तोंडावर बोट, कानात बोट, डोळ्यांंवर बोट नव्हे आणि कर्तव्य म्हणजे कायद्याला डावलून कार्यमुक्तता खुजी करणे नव्हे.
बदल्यांच्या माध्यमांतून कार्यमुक्ततेची समृद्धी वाढवण्याच्या मूळ कर्तव्याला विशिष्ट उद्देशाने निरंज तेलंग पुढे आले असते. कार्यमुक्ततेची गळचेपी झाली नसती. कर्मचार्‍यांच्या हितासाठी झटणार्‍यणा संघटनांच्या आक्षेपांचा रेटा आजतागायत उरलाही नसता, तर कार्यमुक्तता हा प्रश्‍न केवळ संकुचित भावनिक अभिनिवेशाचा नुसन बदली कायदयाच्या अस्तित्वाचा आहे. हे तेलंग यांनी आजपर्यंत मान्य केलेले नाही. विभागाची गरज आणि आर्थिक बाबींना सर्व स्तरावर दिली जाणारी प्राथमिकता या चौकटींना जखडून घेणारी भ्रष्टाचाराची वाढत प्रवृत्ती यांचा त्यांनी सोयीन अर्थ लावून वास्तव खूप गुंतागुंतीचं बनवलं आहे. आस्थापनेच्या विद्वतेचा आभास निर्माण करणारी दुर्बोधता आणि पुरेशा चिंतनाअभावी आलेली क्लिष्टता ही सा.बां. पुणे विभागाच्या अंगवळणी पडलेली बाब म्हणावी लागेल.
विभाग ओरबाडून खायला सोकावलेल्यांच्या सिलेक्टिव्ह ऑटिझमवर जाब विचारला तर नेमकं काय चाललं ते नीटस माहिती होत नाही. याचा अर्थ होईल की, खरी माहिती लपविली जात आहे. कार्यमुक्तता न होणे किंवा न करणे हे सा.बां. खात्याच्या दृष्टीने भिषण संकट आहे.
दरवर्षी बदलीपात्र कर्मचार्‍यांची नियतकालिक बदल्यांसाठी माहिती नागरी सेवा मंडळात जाणारी बदली प्रक्रिया पार पाडली जाणार. बदली आदेशाचे कागदही लगबगीनं येणार परंतु कर्मचार्‍यांना कार्यमुक्त केले जाणारच नाही हे नाविन्यपूर्ण प्रथेचं सातत्य राहिलं तर बदली कायदा हा ऍक्झायटी होणारच आहे. याचा शासनाने अर्थात खातेप्रमुखाने लक्ष केंद्रीत करून विचार करण्याची वेळ येवून ठेपली आहे.
कार्यमुक्ततेला थोपवून ठेवणारी अनेक कारणे –
सा.बां पुणे विभागातून उदयाला आली. कधी आपातकालिन स्थितीत कर्मचारी गुंतले आहेत, कधी कामाचा उरक अधिक आहे, कधी पुरेसा कर्मचारी वर्ग नाही, कधी ३० टक्क्याएैवजी १०० टक्केच बदल्या करण्यात आलेल्या आहेत. आणि आता तर कार्यमुक्त केले तर विभागाकडे कर्मचारी बळच नाही. अशा असंख्य कारणांच्या भिंतीआड लपून कार्यमुक्ततेची प्रतारणा करणार्‍या श्री. तेलंग यांच्या २०१८ च्या सेवाकाळात झालेल्या बदल्यांच्या यादीत छाननी केली तर ध्यानात येईल की,
इमारती, उत्तर विभागाकडून बदलीने येणारा कर्मचारी वर्ग का थबकला, त्या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी या कर्मचार्‍यांना कार्यमुक्त केले नव्हते, की, बदली आदेशित आगमनस्थ कर्मचार्‍यांना रोक लावण्यात आला होता की या इमारत व उत्तर विभागाच्या कर्मचार्‍यांनी अंशतः बदल करून घेतला होता. असे नानाविध प्रश्‍न कर्मचार्‍यांच्या बळांचे उत्तर शोधतील. मग मक्तेदारी कुणाची….. हा प्रश्‍न उत्तरीत राहण्यासाठी मागे राहणार नाही. यावर फार विस्ताराने लिहण्याची गरज आहे. परंतु सर्व ज्ञात आहे की, कुठल्याही कार्यकारी अभियंत्यांच्या बदलीचा काळ, देयकांचा काळ, मोह आणखी मोहाचा काळ जुन्या कार्यमुक्ततेच्या माध्यमातून डावलुन नव्या कर्मचार्‍यांच्या कौशल्य स्विकारण्याची अनिच्छा. रिकाम्या हाताने जाण्याचे धाडस नको असते. हे सार्‍या खात्यालाच ठाऊक आहे. टक्केवारीत गुंतलेलं तनमन निस्पृह कर्तव्य करण्याचा विसरत भान.
सा.बां. पुणे विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने येणार्‍या कार्यमुक्तता वादाच्या विशिष्ठ कुटील नितीमुळे कोण कोणाचे फावले. कोणा कोणाला कोणाकडून काय घावले… कुणाला पैसे घावले, कुणाला हाडकं, हाडका सोबत पैसा घावला, कंझ्मशन डेटा हुडकला तर एकाच गुळाच्या खांडाखाली मुंगळ्यांचा कळपच आढळेल. गुळ झिरपतोय.
कावळ्याला एकच डोळा असतो हे प्रचलित आहे. तरी सुद्धा तो स्थलांतरित करीत फांद्या बदलतो. पण इथ तर प्रत्येकाला दोन डोळे आहेत, तरी सुद्धा…… कार्यमुक्ततेचा पताका घेवून वारी करीत नाहीत. उलट तेलंग यांनाच राहत नाही काबुत ते सांगतात का… वहीवाटीचा हक्क तुमचा हले नका, डुलला तर डुला, पण ठोका इथ विभागातच तंबु.
बदलीची अंतिम रुप म्हणजे कार्यमुक्तता. या कार्यमुक्ततेच दिवसेन दिवस या ना त्या कारणाने भय आणखी परिपक्व होत जाणर आहे. ते याच कारणाने की, कार्यमुक्ततेचं भुत बदली बहाद्दर शंभर रूपयांच्या लालसेन कागद रंगविणार्‍या या कार्यमुक्ततेच्या मानकर्‍यांच्या मानगुटीवर ठाण मांडून आहे. आपण बदली कायदयाला कार्यकारी अभियंता श्री. निरंजन तेलंग यांचे कृपाशिर्वादाने पलायन करावयास लावले. लबाडपणे का होईल, परंतु आपण शर्यतीत जिंकलो. असा जो या मानकर्‍यांना खोटा साक्षात्कार झाला आहे, फार काही वाटून घ्यायचे नाही. आपलं खुप काही बिघडणार नाही. अस्सं ठरवुन, थैयथयाट मांडला आहे.
त्यातुन हीच परिणिती गतिमान होत आहे की, या मानकर्‍यांतील काही निवडणकांनी तर विभागातच चार चौघांना ऐकु जाईल अशा आवाजात झालेल्या बदलीच्या कार्यमुक्ततेवर अर्थकारणाचा उपख्याप कसा केला आहे याची जाहीरपणे पारायणं सुरू केली आहेत. मग या टेबलावर कोण बसायचं, त्या टेबलावर कुणी बसायचं, ह्याच सुद्धा मनसुबे बोलू लागले आहेत. दुसरं तिसरं काही नाही. कार्यमुक्ततेच भय किती कणखर असते, याचीही प्रचिती म्हणावी लागेल. वास्तवात हळुहळु कुलप उधळली जातील तेंव्हा अर्थकारणाचा गोप्यस्फोट होईल तेंव्हा होईल. पण या अर्थकारणात कुणा कुणाला घबाड आपसूक मिळालं. किंवा कार्यमुक्ततेतून निदान पुढचा काळ उगवेपर्यंत या मानकर्‍यांना शंभराला शंभर, शंभरला शंभर जोडत खिसा तरी गरम ठेवायचं, करून धाडस तरी मिळविता आले. अर्थकारण किती प्रभावी असते. यासाठी या कर्मचार्‍याा कंडमशन डेटा हुडकावा लागणार आहे.
सा.बां. विभागातील मानकर्‍यांनी बदलीचा देखावा ते थेट कार्यमुक्ततेची मुस्कटदाबी करण्यासाठी वरून येणार्‍या आदेशाला आणि आदेशाला प्रत्युत्तर देण्यासाठी जो अप्रत्यक्ष- प्रत्यक्ष,थयथयाट मांडून स्वतःच खर्च केल्याचे आक्रस्ताळेपणा सुरू केला आहे. आता हे झाकायचे आहे म्हणून, झाकुन चालणार नाही. आणि झाकलं तरी यातील वास्तव बदलणार नाही. सारी काही छान छान अशा कल्पना रम्यतेत दंग आहेत. बाकीच्या तमाम कर्मचार्‍यांनी त्यातच दंग रहावं, असं यांना वाटत. व इतरांनी दुर्लक्ष करावे म्हणून कार्यमुक्तता खोक्यात बंद करावी. यात बदली कायदयाचं अवमूल्यन करीत उल्लंघन करण्याचं एकजुटीनं धाडस केलं आहे. त्याच वास्तव कसं बदलेल.
बदली प्रक्रियेत कार्यमुक्ततेपासून आपण आज तरी चाललो असं आत्मसमाधान मानणारे दुसर्‍याच्या उष्ट्या शिकारीवर शंभर रुपयांची शिकार साधल्याचा भ्रम असणारे कोल्हे लबाडपणे शर्यतीत आपणच जिंकु शकतो. म्हटले तरी, जे सा.बां. विभागाचे आम्ही सन्माननिय कर्मचारी आहोत. आम्हालाही डोळे आणि कान असल्याचा दावा करणारे मात्र हीच चर्चा करतायेत की, बदल्यांच्या शर्यतीत पलायन करणारे हे केंव्हाच हरले आहेत. आणखी कार्यमुक्तता, प्रलंबित होत गेली तरी आमच्या बदल्याच करण्यात आल्या नव्हत्या असे म्हणण्यास मागे पुढे पाहणार नाहीत.
बदली झालेले पण युक्त्या प्रयुक्त्या करून, १०/१० वर्षे एकाच टेबलावर, एकाच विभागात, ठाण मांडून कार्यमुक्ततेला दुसर्‍याच्या आश्रयाच्या बळावर उसने अवसान आणून हुलकावणी देणारे आणि बदली वाचुन खितपत पडलेले यांच्या अर्ंतविरोधात शिरण्याचं प्रयोजन नाही. तर सा.बां. पुणे विभागातील कर्मचार्‍यांच्या झालेल्या बदल्यातील कार्यमुक्ततेच घोड कुठे पेंड खातय, कुठच्या बळाचा वापर करून, या प्रश्‍नाची उकल केली जात नाही.
पण या दडपशाहीचे तीव्र पडसाद आख्या सा.बां. खात्यात पडले आहेत. या सर्व स्थितीला जबाबदार असणारा मात्र आज उद्या कारवाईला सामोरा येईल तेंव्हा येईल,पण कार्यमुक्ततेला खेळवत ठेवून बदली प्रक्रियेत आमच्या विभागातील तीस टक्के एैवजी शंभर टक्के बदल्या करण्यात आलेल्या आहेत, अशी आवई आठवत मानकर्‍यांना कार्यमुक्त करण्यास चालढकल नानाविध करणे पुढे करणार्‍यांने मात्र या बदलीच्या मानकर्‍यांपैकी किती जणांना कार्यमुक्त केले आहे, याचा लवलेश नाहीच.
आणि समजा केले असेल तर किती टक्के केले आहे, हे स्पष्ट करता येईल का… मुळीच नाही. मुळात बदली कायदयाच्या अधिन राहून नागरी सेवा मंडळाने नियतकालिक बदलीपात्र माहिती आधारे ज्या ज्या कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत, तो आज तरी नागरी सेवा मंडळाचा फार्सच ठरला आहे. कारण कागदोपत्री बदल्या झाल्याचे निश्‍चित स्पष्ट होत असेल तरी बदलीच्या मानकर्‍यांची लुडबुड आहे, त्याच विभागात चेहर्‍यांने स्पष्ट जाणवते म्हणजे ते कार्यमुक्त झालेच नाही.