Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

जयवंत पवारांचा बांधकाम खात्यात पुनःचंचु प्रवेश, गंगेचा प्रसाद -दंडीमे बोक्याचा बालेवाडीत धुडगूस, तर स.प्रसादाचा बाणेरातील गाव मौजे ठकवाडीतील सामना

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महानगरपालिकेला विनाकारण भुर्दंड पाडून, ३५ वेळा दंड आकारण्यात आलेले बांधकाम खात्यातील जे.बी.पवार यांची उचलबांगडी उदयान विभागात करण्यात आली होती. एखादया खात्याने नको त्या ठिकाणी लाथ मारून बाहेर काढल्यानंतर, पुनः त्या खात्यात प्रवेश करू नये असा सर्वसाधारण मानवी स्वभाव आहे. नियम नसला तरी आपल्या स्वाभिमानाला ते पटत नसते अशी एक पारंपारीकता असते. परंतु सगळे गुंडाळून मुंडासे बांधलेल्या जयवंत पवारांनी आता पुन्हा बांधकाम विकास विभागाच्या झोन क्र. ३ मध्ये उपअभियंता पदावर पुनः नियुक्ती मिळविली आहे. जयवंत पवारांना बांधकाम खात्यात आणण्याचे मौल्यवान काम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीमंत वायदंडे यांनी केले असल्याने पुन्हा एकदा, शोले स्टाईल जय-विरूची जोडी नवीन काय धमाल करते याकडे आता संपूर्ण महापालिकेचे लक्ष लागले आहे.


अमिताभ बच्चन आणि धमेंद्र यांच्या शोले चित्रपटाची आजही चलती आहे. ये दोसती हमी नही छोडेंगे हे गाण आजही युवकांच्या मुखात असते. एवढ्या लोकप्रिय चित्रपटातील जय आणि विरूची जोडी कशी धमाल करते अगदी त्याच तोडीचा अभिनय म्हणा किंवा अभिनिवेश म्हणा, जेबी आणि वायदंडेच्या रुपाने पुनः एकदा पहायला मिळणार आहे. बाणेर आणि बालेवाडीतील टोलेजंग बेकायदा बांधकामे, विनाचौकशी विनापाहणीचे देण्यात आलेल्या प्लींक चेक सर्टीफिकेटस्, बांधकाम सातव्या मजल्यावर आल्यानंतर देण्यात आलेले प्लींथ चेक सर्टीफिकेटस हा अगदी चर्चेचा विषय आहे. मनमानीपणे देण्यात आलेल्या बांधकाम परवानगी ही तर वेगळीच समस्या आहे.
ह्या सर्व समस्या आहेतच. परंतु जयवंत पवार यांच्या आगमनामुळे पुढचे, मागचे आणि चालुच्या सर्व चित्रपटांचे रिळ नव्याने प्रसारित करण्याचा आमचा मानस आहे. थोडक्यात दस साल पहले… आणि दस साल बाद… अशा सदाबहार क्लासिकल चित्रपटांचा नजराना प्रकाशित होणे आवश्यक आहे. जुन्या नव्या कसदार चित्रपटांना रसिक प्रक्षेक दाद देतात अस
ा अनुभव आहे. त्यामुळे ये दोस्ती हम नही छोडेंगे.

गंगेचा प्रसाद -दंडीमे बोक्याचा बालेवाडीत धुडगूस, तर स.प्रसादाचा बाणेरातील गाव मौजे ठकवाडीतील सामना
दंडीमेंची दंडेली बालेवाडीत येवून कशी वाढली आहे, त्यांच्या एक एक कहाण्या बाहेर येत आहेत. गावाला सोडलेला वळू म्हणा किंवा रान बोका. सगळीकडे धुडगुस आणि धुडगूस याशिवाय दुसरे काहीच नाही. बाणेरातही सगळेच काही अलबेल नाही. तिथही गाव मौजे ठकवाडीतील सामना सुरू आहे. संग्राम पाटील हे नाव काढल्यानंतर, ठकवाडी चित्रपटातील अभिनय सम्राट निळू फुले यांचा वाड्यावरच्या पाटलासारखा करारी मुद्रा समोर आणू नये ही प्रेक्षकांना नम्र विनंती. (क्रमशः)