Saturday, November 16 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

गत सात वर्षात १५ कोटी लोकांचा रोजगार गेला

नवी दिल्ली /दि/
. मागील सात वर्षांमध्ये तब्बल १५ कोटी लोकांनी रोजगार गमावला असून यामध्ये ७.३ टक्के पुरुष मजूर आणि ३.३ टक्के महिलांचा समावेश आहे. ही धक्कादायक माहिती पीरिओडिक लेबर फोर्स सर्वेमध्ये (पीएलएफएस) समोर आली आहे. विशेष म्हणजे, याची नुकसान भरपाई करण्यासाठी शहरांमध्येही रोजगार वाढला नसल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कामगार क्षेत्रातील रोजगाराच्या संधीसंदर्भात २०१७-१८ चा पीएलएफएस सर्वे नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार घरकाम व शेतमजुरीतून मिळणार्‍या रोजगाराच्या संख्येत कमालीची घट नोंदवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील लोकांना मोठया प्रमाणात शेतीतून रोजगार मिळत असून त्याचे उत्पन्नही चांगले आहेत. पण, ग्रामीण भागातील अशा उत्पन्नामध्येही १० टक्क्याने घट झाली आहे.
२०११-१२ मध्ये शेतमजुरीतून उत्पन्न मिळवणार्या कामगारांचे प्रमाण २१ टक्के होते. आता ते प्रमाण १२.१ टक्क्यांवर आले आहे. पूर्वी ३ कोटी ६० लाख लोकांना यातून उत्पन्न मिळत होते. आता ते २ कोटी १० लाखांवर आले आहे. रोजगारासंदर्भात एनएसएसओचा अहवाल राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाकडून (एनएससी) डिसेंबर २०१८ मध्ये मंजूर करण्यात आला आहे. पण, अद्यापही तो प्रसिद्ध झाला नाही. हा अहवाल रोखून धरल्याचा आरोप झाल्यानंतर एनएससीचे प्रभारी अध्यक्ष पी.एन. मोहनन आणि दोन सदस्यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर पीएलएफएसचा २०१७-१८ चा अहवाल प्रसिद्ध झाला असून २०११-१२ पासून आतापर्यंत देशात ३०.४ टक्के पुरुषांनी रोजगार गमावला आहे