पुणे शहर पोलिसांची सराईत गुन्हेगारांसह, गुन्हेगारी टोळ्यांना हस्ते परहस्ते आर्थिक मदत…
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, तसेच नागरीकांशी वाद काढुन आपल्या टोळीचे वर्चस्व वाढावे, जनमानसात दहशत राहावी यासाठी गुन्हेगारी टोळ्या संघटीतपणे दहशतीने स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता गुन्हे करीत असल्याचे निष्कर्ष पुणे शहर पोलीसांनी काढलेले आहेत. परंतु याच दहशतीचा वापर करून पुढे जाऊन मटका जुगार अड्डे, रमीचे क्लब, पणती पाकोळी सारखे सोरट, अंमली पदार्थांची विक्री, पब, हुक्का पार्लर, मसाज पार्लर, स्पा आदिंसारखे अवैध व बेकायदेशिर धंदे करून ह्याच गुन्हेगारी टोळ्या आर्थिक संपन्न होत आहेत. त्यात पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान उभे करीत आहेत. त्यामुळे पुणे शहर पोलीसांनी पुणे शहरातील खाजगी सावकारी आणि अवैधपणे सुरू असलेले मटका जुगार अड्डे तातडीने बंद करण्याची सामाजिक संघटनाकडून मागणी होत आहे.
मागील दोन महिन्यांपासून तक्रारी, परंतु कारवाई नाही –
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत मागील दोन महिन्यांपासून पुणे महापालिकेच्या दवाखान्यामागे अवैधपणे मटका जुगार अड्डा सुरू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्ष यांच्याकडे केली होती. तथापी मागील दोन महिन्यांपासून शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मटका जुगार अड्ड्यांवर कारवाई होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
पोलीस उपआयुक्त संदीपसिंह गिल गप्प का –
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत लगतच्या पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी टोळ्यांनी एकत्र येवून राडा केला होता. वाहनांची जाळपोळ व तोडफोड केली होती. त्या टोळीविरूद्ध पोलीसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली. परंतु वरीष्ठ पोलीस निरीक्षकांवर मनमानीपणे कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. हा ताजा इतिहास असतांना, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत, लगतच्या पोलीस स्टेशनह हद्दीतील एका सराईत गुन्हेगाराने मटका जुगार अड्डा सुरू केलेला असतांना, त्यावर अद्याप पर्यंत कारवाई झाली नाही. त्यातच पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 1 चे श्री. संदीपसिंह गिल हे एवढे शांत का आहेत याबाबत प्रश्न विचारला जात आहे.
आजही धंदा सुरू ह्या घ्या चिठ्ठया –
आज गुरूवार दि. 27 जुलै 2023 रोजी देखील मटका जुगार अड्डा सुरू असून, त्याचा पुरावा म्हणून याच बातमीत जुगार अड्डे चिठ्ठी दिली आहे. दरम्यान ह्या मटका जुगार अड्ड्यात पोलीसांची भागीदारी असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस आयुक्तालय निष्कर्ष काढते की, गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व राहावे, जनमानसात दहशत राहावी यासाठी स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता गुन्हे केले जात आहेत असे एका बाजुला नमूद करायचे आणि दुसऱ्या बाजूला पुणे शहर पोलीसातील पोलीसच जर त्याच सराईत गुन्हेगारांच्या अवैध मटका जुगार अड्ड्यात भागीदार असतील तर त्यावर कारवाई का केली जात नाही हा देखील प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान ही बाब सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता ही कारवाई होते की नाही हा विषय देखील कुतूहूलाचा ठरल आहे.