Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाकडून तळजाई वसाहत येथे मतदार जागृती अभियान

नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/
पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने परिमंडळातील क्रमांक 3 मधील पर्वती विधानसभा मतदारसंघातील तळजाई वसाहती मधील गल्ल्या मधून मतदान जनजागृती करण्यात आली. धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक समाज विकास अधिकारी संदीप कोळपे, समूह संघटिका सोनाली जगताप, ललिता सूर्यवंशी, सीमा सोनार, वर्षा मांढरे, अंगणवाडी सेविका व मदतनीस,अतिक्रमण निरीक्षक श्री अमोल लावंड यांच्या उपस्थितीत तळजाई वसाहत येथील परिसरात मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली
.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये जनजागृती करणे, नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी विशेष मोहीम अंतर्गत खडकवासला मतदार संघामध्ये नागरिकांना सविस्तर माहिती दिली. एकूण 73 महिला  व 11 पुरुष एकूण मतदार 84 उपस्थित होते. नागरिकांनी मतदान जनजागृती मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.