Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पोलीस पत्नीचा दुर्देवी मृत्यू आणि पुणे शहरातील पोलीसांच्या प्रशासकीय सोईच्या वजनदार बदल्या

नॅशनल फोरम/ पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
मुंबई पोलीस दलात कर्तव्यावार असतांना अपघाती मृत्यू झालेल्या झालेल्या पोलीसाच्या मृत्यूची चौकशी करावी यासाठी पोलीस पत्नीने सरकारकडे दाद मागितली परंतु, सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. शेवटी पोलीस पतीला न्याय मिळावा म्हणून त्या माऊलीने मंत्रालया समोर विष प्राशन करून मायबाप शासनाचे लक्ष वेधले. परंतु उपचारादरम्यान पोलीस पत्नीचा मृत्यू झाला. महिलांचा कैवार घेणाऱ्या एकाही राजकीय पक्षाने किंवा त्यांच्या महिला आघाड्या किंवा महिला आयोगाने देखील याची दखल घेतली नाही. सामाजिक राजकीय संघटनांनी साधे निवेदनही दिले नाही. इतकी अस्पृश्यता इथे पाळली गेली आहे. न्यायासाठी पोलीस आणि पोलीस पत्नीला जीव गमवावा लागला. यात सरकार पर्यंत आवाज पोहोचला नाहीच. आणि राजकीय पक्ष, संघटना यांच्या सह माध्यमांनी देखील याकडे साफ दुर्लक्ष करावे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. याच ठिकाणी पोलीसाखेरीज दुसरी महिला असती तर सगळ्यांनी सरकारला धारेवर धरले असते. आंदोलने झाली असती. परंतु केवळ पोलीस आहे म्हणून संवदेना हरपलेल्यांमुळे न्याय मिळाला नाही असे अतिदुर्देवाने नमूद करावे लागत आहे.

पोलीस कर्तव्यावर असतांना मृत्यू झालेला असतांना त्यांना न्याय मिळाला नाही. परंतु दुसरीकडे मात्र पुणे शहरात बदल्यांचे सत्र सुरू आहे. शासकीय कार्यालयातील बदल्या हा नवीन विषय नाही. परंतु पुण्यातही एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय अशी स्थिती पहावयाला मिळाली आहे. वर्षानुवर्ष अकार्यकारी पदांवर सडवून ठेवलेल्यांना न्याय कधी मिळतच नाही. अकार्यकारी व टेबलहीन पोलीसांचे खिसे रिकामे असल्यामुळे त्यांना प्रशासकीय सोईच्या कागदावर वजन ठेवता येत नाही. त्यामुळे त्यांच्या न्यायाचे कागद हवेत उडत जातात. ज्यांच्या कागदांवर वजन ठेवले जाते, ते कागद मात्र हवेत उडत नाही. त्यांना त्यांच्या वजनाप्रमाणे वजनदार विभाग व टेबल दिला जातो असा अनुभव आहे. पोलीस पत्नीचा मृत्यू झाला तो पोलीस पतीला न्याय मिळावा म्हणूनच झाला. या खात्यात मात्र अकार्यकारी पदावर पोलीस मात्र रोज मरत असता. त्याचे मरण मात्र कधीच कुणाला दिसत नाहीये. डीजी पासून सीपी पर्यंत  अनेक कागदपत्र बंद पाकीटातून पाठविले, मात्र या कागदांवर वजन ठेवले नसल्यामुळे ती कुठल्या डसबीन मध्ये जातात याचे उत्तर मात्र मला आजही गवसले नाहीये. 

एकाच ठिकाणी सारे एकवटले –
समर्थ पो. स्टे. ते वि.शा. व पुढे पुणे मुंबई रस्ता असा प्रवास झालेल्या एका पो.नि.यांनी मात्र काही काळ थांबलेल्या ठिकाणचे तीन पो.उप.नि. यांना त्यांच्या ठिकाणी ओढुन नेले आहे. असे अधिकारी विराळेच असतात. परंतु त्या जागेसाठी इतरही इच्छुक होते. परंतु त्या इच्छुकांना न्याय मिळाला नसल्याचे समजते. पुढे ज्या बदल्या केल्या आहेत, त्या देखील अनपेक्षित असल्या तरी कर्तव्याचा भाग म्हणून त्या स्वीकारणे अपरिहार्य आहे.

असाही एक चमत्कार –
पुण्याच्या पेठेतील एका पो.नि. यांना रातोरात लष्करात पदस्थापना दिली आहे. इन्चार्ज ही मोठी बाब आहे. या पदासाठी देखील अकार्यकारी कार्यासनासह इतरही इच्छुक होते. परंतु त्यांच्या इच्छेवर व सचोटीवर पाणी सोडत, पुण्याच्या पेठेतून उचलुन त्यांना लष्करात पाठविले आहे. हा सगळा प्रशासकीय सोईचा भाग म्हणून शासकीय कागदावर लिहावे लागते. बाकी सगळे ज्याच्या त्याच्या मनासारखे असते यात काहीच वाद नाहीये. असा चमत्कार पोलीस खात्यातच होऊ शकतो. यातही नवल नाहीये.

  1. अजय सुधीर कुलकर्णी (मुंबई शहर ते आर्थिक व सायबर)
  2. अशोक आनंदराव कदम (वपोनि. लष्कर पो. स्टे. ते आर्थिक गुन्हे शाखा)
  3. राजेश रामचंद्र तटकरे (पो.नि.गुन्हे, खडक पोस्टे ते पोलीस निरीक्षक लष्कर पोलीस स्टेशन) पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश प्रस्तृत झाले आहेत. तर
    बदली करण्यात आलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे
  4. विजय मालन चंदन (विशेष शाखा ते खडकी पोलीस स्टेशन )
  5. प्रमोद दादासाहेब दोरकर (विशेष शाखा ते खडकी पोलीस स्टेशन)
  6. राजेश व्यंकटराव माळेगावे (विशेष शाखा ते खडकी पोलीस स्टेशन)
  7. कुलदीप सुभाषचंद्र व्हटकर (नियंत्रण कक्ष ते खडकी पोलीस स्टेशन)
  8. सचिन हणमंत शिंदे (विशेष शाखा ते खडक पोलीस स्टेशन)
  9. शिवाजी सोमाजी गायकवाड (विशेष शाखा ते लष्कर पोलीस स्टेशन)
  10. किशोर हणमंत पवार (विशेष शाखा ते कोंढवा पोलीस स्टेशन)
  11. जितेंद्र लक्ष्मण खैरनार (विशेष शाखा ते कोंढवा पोलीस स्टेशन)
  12. अर्जुन रामभाऊ कुदळे (नियंत्रण कक्ष ते कोंढवा पोलीस स्टेशन)

बदली करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे

  1. स्वाती दादासाहेब फडतरे-मोरे (विशेष शाखा ते खडक पोलीस स्टेशन)
  2. अक्षय दिगंबर सोनवणे (नियंत्रण कक्ष ते खडकी पोलीस स्टेशन)
  3. सुनिल हिरामण काकडे (विशेष शाखा ते फरासखाना पोलीस स्टेशन)
  4. सिंधुबाई किसन गव्हाणे (विशेष शाखा ते समर्थ पोलीस स्टेशन- )
  5. माधवी सयाजी शेवाळे (विशेष शाखा ते वानवडी पोलीस स्टेशन- )
  6. प्रशांत कोंडीराम किर्वे (विशेष शाखा ते येरवडा पोलीस स्टेशन- )
  7. भिमराव दिगंबर पुरी (विशेष शाखा ते कोंढवा पोलीस स्टेशन)
  8. सचिन प्रल्हाद निंबाळकर (विशेष शाखा ते कोंढवा पोलीस स्टेशन)
  9. कृष्णा कुंडलिक कांबळे (नियंत्रण कक्ष ते कोंढवा पोलीस स्टेशन)
  10. किरण मुधकर लिटे (नियंत्रण कक्ष ते कोंढवा पोलीस स्टेशन)
  11. संतोष केशनव सोनवणे (नियंत्रण कक्ष ते वानवडी पोलीस स्टेशन)
    ज्यांच्याबाबत ओरड त्यांनाही अभय –
    कोरेगाव पार्क, भारती, खडकी व इतर ठिकाणच्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कामकाजाबाबत माध्यमामध्ये ओरत होत आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये सतत ओरड होत आहे. त्यांच्या बदल्या मात्र केल्या गेलेल्या नाहीत. उलट त्यांच्या त्यांच्या मर्जीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदस्थापना प्रशासकीय सोईसाठी करवून घेतली आहे. बाकी जे इच्छुक आहेत, ते आजही जागेवरच आहेत, त्यांना कुणीच वालीवारस नाही हेच दिसून आले आहे.
    थोडक्यात प्रशासकीय सोईच्या सेवाकागदपत्रांवर जोपर्यंत जबरी वजन ठेवले जात नाही, तो पर्यंत कार्यकारी पदस्थापना शक्य नाही हेच दिसून आले आहे. पोलीस पत्नीला देखील जीव गमवावा लागला आहे. आता हेच पोलीस स्वतःचे मृत्यूला स्वतःच जबाबदार असल्याने त्या पोलीस पत्नीविरोधात भादवीची कलमे नियमात बसविणार….केवढ हे दुर्देव… मग न्याय कुठे आहे हे तरी सांगा.