Friday, December 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

फुटपाथवर बसून दारू पिणाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या काळात महाभकास आघाडीच्या उमेदवारांना पुरोगामी उमेदवार म्हणून प्रमोशन करू नये

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/ aniruddha shlan chavan-
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे. आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरत असताना प्रत्येक उमेदवाराला त्याच्याकडील सर्व संपत्तीसह त्याच्यावरील गुन्हे, कोर्ट खटले याची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे कोणाकडे किती अधिकृत संपत्ती आहे त्याची आकडेवारी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून पाहायला मिळत आहे. प्रत्येक प्रस्थापित पक्षाचा उमेदवार हा कोट्याधीश, अब्जाधीश असल्याचे दिसून आले आहे. कुणाची 100 कोटीची प्रॉपर्टी, कोणाची 500 कोटीची प्रॉपर्टी, कोणाचे 800 कोटीची प्रॉपर्टी…. ही झाली अधिकृत संपत्तीची आकडेवारी…दरम्यान बेनामी संपत्ती किती असेल याचा अंदाज न केलेलाच बरा. राज्यातील काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना उद्धव ठाकरे, शिवसेना एकनाथ शिंदे या प्रस्थापित पक्षातील उमेदवार कोट्याधीश आहेत. दरम्यान पुणे शहरात व महाराष्ट्रामध्ये पुरोगामी….. पुरोगामी…. म्हणून गळ्यात निळी उपरणी घालुन प्रस्थापित पक्षाच्या कोट्याधीश असलेल्या उमेदवारांचा प्रचार हीच पुरोगामी म्हणवणारी मंडळी करीत असल्याचे सोशल मीडियावरील बातम्यांवरून दिसून येत आहे.

सध्याचा निवडणूक प्रचार म्हणजे काळु-बाळु व दादू इंदूरीकरांचे वगनाट्य-
मागील दहा वर्षात केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीचा बोलबाला असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे, शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षातील बहुतांश पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार हे भाजपामध्ये सत्ता भोगत होते तसेच भाजपा बरोबर उघड किंवा छुप्या पद्धतीने युती करून सत्ता राबवत होते. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हीच मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून महाराष्ट्रातील मतदारांचे चांगले मनोरंजन करीत सुटले आहेत. महाराष्ट्रामध्ये एकेकाळी काळूबाळू व दादू इंदोरीकर यांचा तमाशाचा फड अतिशय गाजलेला होता. त्यांच्या तमाशाला प्रचंड गर्दी व्हायची. त्यांच्या तमाशातील बतावणी, वगनाटय हे फार गाजत असत. आज ते हयात नाहीत. परंतु आजच्या निवडणूकीतील उमेदवारांचा प्रचार, त्यांच्या त्यांच्या पक्षांच्या नेत्यांचा प्रचार, एकमेकांवरील आरोप- प्रत्यारोप पाहिले तर काळु – बाळु आणि दादू इंदोरीकर यांची आठवण होते. विकासाच्या मुद्यावर कुणी बोलतच नाही.

आमदारकी घरपरिवारातच राहणार आहे-
तसं पहायला गेले तर काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना उद्धव ठाकरे, शिवसेना एकनाथ शिंदे या प्रस्थापित पक्षातील उमेदवार एकमेकांचे सगेसोयरे आहेत. एकमेकांचे नातेवाईक आहेत. कुणीही निवडणूकीत पडले आणि कुणीही निवडणूकीत जिंकुण आले तरी सत्ता ही त्यांच्याच घर परिवारात राहणार आहे. उदाहरण दयायचे तर, बारामती मध्ये अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार अशी लढत होत आहे. दोघांपैकी एक जिंकला तरी आमदारकी पवारांच्याच घरात राहणार आहे. दुसरे उदाहरण तर मजेशिर आहे. जळगावचे एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आहेत. त्यांच्या सुनबाई भाजपाच्या खासदार आहेत. मुलगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आमदार आहे. सध्या खडसे शिवसेनेचा प्रचार करीत आहेत. काहीही झाले तरी आमदारकी व खासदारकी एकाच घरात राहत आहे.

तिसरे उदाहरण सोलापूरचे आहे. माहिते पाटील, माने पाटील हे एकमेकांचे सगे सोयरे आहेत. दोघांपैकी एक निवडूण आला तरी सत्ता, आमदारकी त्यांच्याच घर परिवारात राहणार आहे. काँग्रेस मधुन भाजपा मध्ये... भाजपा मधुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये... शिवसेनेतून काँग्रेस मध्ये... शिवसेनेतून भाजपा मध्ये हा प्रवास सुरूच आहे. त्यांना प्रस्थापित पक्षात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता राजकारणातून घरचा स्टॉप दाखविणे हीच खरी लोकशाही आहे. त्यामुळे बहुजन समाजासाठी लढणाऱ्या आंबेडकरांसोबत जाणेच दलित,मुस्लिम ओबीसी, आदिवासींचे हित आहे. 

पुरोगामी- फुले शाहू आंबेडकर म्हणून मतदान घ्यायचे आणि भाजपा शिवसेनेला पाठींबा दयायचा-
पुण्यामध्ये पुरोगामी… पुरोगामी… म्हणून महाभकास आघाडीला मतदान करा असा टाहो पुण्यातील काही तथाकथित विचारवंत मांडत असल्याचे सोशल मीडिया वरून दिसून येत आहे. परंतु महाभकास आघाडीतील बहुतांश उमेदवार, बहुतांश आमदारांनी यापूर्वी प्रत्यक्षपणे भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होऊन सत्तेचा आस्वाद घेतला आहे. तसेच आज महाभकास आघाडीतील बहुतांश घटक पक्ष भाजपशी आतून व बाहेरून पाठिंबा देऊन त्यांच सरकार पूर्ण पाच वर्ष चालवण्याची कसरत केली आहे. याच पोरगामी म्हणून घेणाऱ्या महाभकास आघाडीतील उमेदवारांनी भाजपा टिकविण्याचे कर्तव्य पार पाडले आहे. थोडक्यात तुम्ही निवडणूकीत ज्यांना प्रतिगामी म्हटलं जातं, त्या भाजप शिवसेनेमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी होऊन प्रतिगाम्यांच सरकार पाच वर्ष चालवता आणि ऐन निवडणुकीच्या काळामध्ये स्वतःला पुरोगामी म्हणून महाराष्ट्राला आणि त्यांच्या मतदारांना, पुरोगमी उमेदवाराला मतदान करा सांगितलं जातं. मागच्या 25 वर्षांमध्ये स्वतःला फुले, शाहू, आंबेडकरी म्हणवणारे ….स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे …. प्रत्यक्षपणे भारतीय जनता पार्टीला मदत करत होते. त्यांचे सरकार चालवत होते. सरकारमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बसून सत्तेचा उन्माद ते करीत होते. म्हणून आज पुरोगामी म्हणायचं… फुले, शाहू ,आंबेडकरी जनतेची मते घ्यायची आणि निवडणुकीनंतर भाजपा शिवसेना सारख्या पक्षाला आतून किंवा बाहेरून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देऊन सरकार चालवले जात आहे.

 त्यामुळे महाराष्ट्रातील स्वतःला पुरोगामी बनवणाऱ्या व फुले शाहू आंबेडकरी मतदाराने तसेच महाराष्ट्रातील दलित आदिवासी मुस्लिम व ओबीसी समाज घटकांनी आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची सवय ठेवली पाहिजे. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी वगळता कुणीही पुरोगामी नाही, वंचित बहुजन आघाडी वगळता महाराष्ट्रात कुणीही फुले शाहू आंबेडकरवादी नाही. त्यामुळे स्वतःला पोरगामी म्हणवणाऱ्या तथाकथित दलित संघटना, रिपब्लिकनवाल्यांनी कोणालाही पुरोगामी किंवा फुले शाहू आंबेडकरी उमेदवार म्हणून त्याचा उदो उदो करू नये, त्याचे पुरोगामी म्हणून लाँन्चीग करू नये.  

मतदारसंघ नसलेले दलित नेतृत्व आणि संघटना-
तुमच्या निळ्या-हिरव्या टोप्या, पगडी आणि गळ्यातील उपरण्यांना ते भिक घालणार नाहीत-
आज तथाकथित रिपब्लिकन संघटना किंवा ज्या दलित संघटना कार्यरत आहेत त्यातील संघटनेच्या अध्यक्षांपासून, कोणत्याही कार्यकर्त्याला त्यांचा स्वतःचा मतदार संघ नाही, महापालिका जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील एक साधा मतदारसंघ नाही. विधानसभा किंवा लोकसभेचा देखील यांच्याकडे स्वतःचा मतदार संघ नाही. कुणाला तरी पाठींबा दयायचा, त्याचा प्रचार करायचा एवढेच त्याचे काम असते. त्यासाठी यांची संघटना कार्यरत असते.

असे मतदारसंघ नसलेल्या दलित संघटनांच्या पुढाऱ्यांनी  स्वतःला पुरोगामी म्हणून घेण्याचा अधिकार नाही.  तसेच इतर प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना पुरोगामी किंवा फुले शाहू आंबेडकरी उमेदवार असा पुरस्कार देण्याचा त्यांना अधिकार नाही. मतदारसंघ नसलेल्या दलित पुढाऱ्यांनी प्रस्थापित पक्षाच्या वळचणीला थांबण्यापेक्षा, वंचित बहुजन आघाडी व बाळासाहेब आंबेडकर यांच्याच पाठीशी उभे राहावे. त्यांना जर पाठीशी उभे राहता येत नसेल तर पुण्यातील सेंट्रल हॉटेल गप्पा मारण्यासाठी त्यांच्यासाठी मोकळी जागा आहे. कॅम्प, पुणे स्टेशन, विश्रांतवाडी इथल्या फुटपाथवर बसून दारू पिणाऱ्यांनी प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना पुरोगामी म्हणून त्यांची बाजू मांडण्याचा केविलवांना प्रयत्न करू नये. प्रस्थापित पक्षांचा उमेदवार कोट्यधीश आहे. पुरोगामी म्हटले तरी तो भाजपा शिवसेनेसोबत जाणार आहे. ईडी आणि सीबीआयला तोंड दयावे लागणार आहे. एवढे पैसे आले कुठून... याचा जाब दयावा लागणार आहे... दरम्यान प्रस्थापित पक्षातील उमेदवार हे एकमेकांचे सगेसायरे, नातेवाईक आहेत. त्यामुळे सत्ता त्यांच्याच हातात राहणार आहे. त्यामुळे तुमची फुटकळ भाषणबाजी बंद करा, दलित-मुस्लिम मतदार आता शहाणे झाले आहेत. तुमच्या निळ्या-हिरव्या टोप्या, पगडी आणि गळ्यातील उपरण्यांना ते भिक घालणार नाहीत एवढे मात्र निश्चित....

मत वाया जात नाही, आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना मतदान करायला शिकले पाहिजे –
ह्याला पाडण्यासाठी तो उभा आहे, त्याला पाडण्यासाठी हा उभा आहे. हा त्याची मते खाणार, तो त्याची मते खाणार अशी गल्लोगल्ली, केशकर्तनालयासह, चहाच्या टपऱ्यांवर चर्चा झडत आहेत. परंतु प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांबाबत अशी चर्चा केली जात नाही. बहुजन समाजातील पक्षांबाबतच अशी चर्चा केली जाते. राजु शेट्टी, खोत, राज ठाकरे यांच्याबाबतही चर्चा केली जात नाही. परंतु आंबेडकरी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी काँग्रेस व भाजपा या मोठ्या पक्षांसह शिवसेना उद्धव ठाकरे गट व शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून चर्चा केली जाते. कारण याच पक्षात एकमेकांचे सगे सोयरे व नातेवाईक आहेत. तेच एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. कुणीही निवडूण आले तरी सत्ता आमदारकी त्यांच्याच घरात जाणार आहे. त्यांनी केलेले भ्रष्टाचार व गैरव्यवहार कधीच बाहेर येणार नाही. सहकारी साखर कारखान्यापासून ते सुतगिरणी पर्यंत सहकारी बँकांपासून ते राज्य शिखर बँकेपर्यंत कुणीच चौकशी करणार नाही. त्यामुळे आमदारकी त्यांच्याच घरात राहणार आहे. परंतु जर बहुजन समाजातील उमेदवार निवडूण आला तर त्यांची चौकशी करणार… म्हणूच नको तसल्या चर्चा घडवुन आणल्या जात आहेत. मराठा व ब्राह्मणांचे मत कधीच फुटत नाही. मग दलित, मुस्लिम, ओबीसी, आदिवासी समाजाचे मतदान दुसऱ्या पक्षाला जाते तरी कसे… त्यांच्याच मतांमध्ये फुट का पडते… मत वाया जाणार अशी खोटी भुलथाप का पसरविली जाते याच्याकडेही बहुजन समाजाने लक्ष देणे गरजेचे आहे.