नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे रेल्वे स्टेशनवर चोरीच्या सातत्याने घटना घडत असून नोकरीच्या शोधात पुण्यात आलेल्या अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची बॅग चोराने लांबवली आहे. दरम्यान बॅगेची चोरी झालेली असताना देखील बॅग कुठेतरी गहाळ झाली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याची माहिती श्री. सचिन नागरे यांनी दिली आहे.
गुन्ह्याची हकीकत अशी की, सचिन गजानन नागरे वय- 31 वर्ष रा. लहान उमरी, उत्तरा कॉलनी, जिल्हा- अकोला हे पुणे रेल्वे स्टेशन येथे सेकंड क्लास वेटिंग ग्रुप मध्ये थांबलेले असताना, त्यांची एक लाल रंगाची सफारी कंपनीची बॅग चोराने लांबविली आहे. ठाणे अमलदार पुणे लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे नोंदवलेल्या तपशिलामध्ये या बॅगेमध्ये दहावी बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट व मार्कशीट, ग्रॅज्युएशन मार्कशीट, पोस्ट ग्रॅज्युएशन मार्कशीट, दहावी व बारावीचे टीसी, बर्थ सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट, पासपोर्ट, अकरावी मार्कशीट, ग्रॅज्युएशन टीसी, पोस्ट ग्रॅज्युएशन टीसी, आठवी, दहावी सर्टिफिकेट, प्लस सीड प्रायव्हेट लिमिटेड सर्टिफिकेट, सेल्स एक्झिक्युटिव्ह सर्टिफिकेट, ए. यु. स्मॉल फायनान्स बँक लिविंग सर्टिफिकेट, कन्स्ट्रक्शन बिजनेस लिव्हिंग सर्टिफिकेट, ब्लड डोनेशन सर्टिफिकेट, फायनान्शियल प्लॅन कॉम्पिटिशन सर्टिफिकेट, बरसा कॅम्प सर्टिफिकेट यासह चार्जर, वॉटर बॉटल, दोन फॉर्मल पॅन्ट, नॉर्मल टी-शर्ट, जीन्स पॅन्ट, पाऊच त्यामध्ये गरजेच्या वस्तू अशा वस्तू असलेले बॅग चोराने लांबवलेली आहे.
याबाबत अकोला येथे राहणारे सचिन गजानन नागरे यांनी ठाणे अंमलदार पुणे लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तथापि बॅगेची चोरी झालेली असताना देखील ती बॅग गर्दीत कुठेतरी गहाळ झाली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान बॅग चोरीची तक्रार दाखल करतांना, तु चोराला पाहिले आहे काय, मग चोरी झाली असे तु कसे म्हणू शकतो म्हणून त्या विद्यार्थ्याला पाठवुन देण्यात आले असल्याची माहिती श्री. नागरे यांनी नॅशनल फोरमला कळविले आहे.
श्री. नागरे हे दोन दिवस आहे त्याच कपड्यांवर सर्वत्र फिरून बॅग व चोरचा तपास करीत होते. परंतु पोलीसांनी कुठलीही दखल घेतली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान पुणे रेल्वे स्टेशन वरील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले नाहीत. तसेच लोहमार्ग पोलिसांकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य करण्यात आलेले नाही. या बॅगेमध्ये संपूर्ण शालेय व महाविद्यालयीन कागदपत्रे आहेत.