Wednesday, May 8 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मार्केटयार्ड व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पीएमपीएल बसच्या बॅटऱ्यांची चोरी

पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/
कोरोना महामारीनंतर कोण कुठला गुन्हा करेल आणि कोण कुठली आणि कशाची चोरी करेल याचा काही अंदाजच उरला नाही. आता तर थेट पीएमपीएलच्या बसमधील बॅटऱ्यांवर दरोडा टाकण्यात आला आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशन व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पीएमपीएलच्या बसेस रात्रौ पार्क करून ठेवल्या असता, कुण्यातरी अज्ञात चोरट्याने पीएमपीएल बसच्या बॅटऱ्या चोरून नेल्या असल्याचा गुन्हा दोन्ही पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत दि. 15/10/2022 रोजी रात्रौ साडेअकरा ते दि. 16/10/2022 रोजी सकाळी 05/00 वा.चे दरम्यान राजीव गांधी उद्यान समोरील रोडवर स्वारगेट ते कात्रज दुध डेअरी चौक कात्रज, पुणे येथे यातील फिर्यादी नंदकुमार जाधव वय - 50 रा. शुक्रवार पेठ पुणे याचे कात्रज, पुणे या विभागातील पीएमपीएमएल बस क्र. एमएच 12 एसएफ/0469 ही बस राजीव गांधी उद्यान समोरील रोडवर स्वारगेट ते कात्रज दुध डेअरी चौक कात्रज, पुणे येथे येथील जागेत पार्क करून ठेवली असताना कोणीतरी अज्ञात इसमाने बस मधील एक्साईड कंपनीच्या बॅट-या 10,000/- रू किमतीच्या चोरी करून नेल्या आहेत. पोलीस अंमलदार, डी. एस. जाधव अधिक तपास करीत आहेत. 

मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीत  दि.15/10/2022 रोजी रात्रौ 10 वाजता  ते दि. 16/10/2022 रोजी सकाळी 06 वा. चे दरम्यान गेट नं. 9 समोर सुयश बॅटरी सुभद्रा ॲटोमोबाईल गॅरेज समोर मार्केटयार्ड, पुणे येथे सार्वजनिक रोडचे कडेला त्यांचे विभागातील पीएमपीएमएल बस क्र. एमएच 12 / एचबी / 1726 ही लॉक व पार्क करून ठेवली असताना, कोणीतरी अज्ञात इसमाने सदर बस मधील एक्साईड कंपनीच्या दोन बॅट-या 6,000/-किमतीच्या चोरी करून नेल्या आहेत. यातील फिर्यादी अविनाश सोनवणे वय 52  हे पीएमपीएमएल येथे सुरक्षा विभागात बाँच ॲण्ड बॉर्ड इन्सपेक्टर म्हणुन काम पाहतात.  अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास मुजूमले करीत आहेत.