Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सामाजिक सुरक्षा विभागाची विमानतळ, हडपसरसह कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत धडक कारवाई,

sscellpune

शिवाजीनगरात कारवाईसाठी जाणिवपूर्वक दिरंगाई कोण करीत आहे….

पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा यांनी विमानतळ, हडपसर पोलीस स्टेशनसह कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व बेकायदेशिर मटका जुगार अड्डयांवर कारवाई केली आहे. तीन पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाईत एकुण 1 लाख 88 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच एकुण 36 इसमांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत दळवी हॉस्पीटलसह इंडिया बुल्स कंपनीजवळील झोपडपट्टीत सुरू असलेल्या मटका जुगार अड्डा, पत्ता क्लबवर कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच शिवाजीनगरातील कारवाई करण्यास पोलीस विभागातील काही कर्मचारी जाणिपूर्वक दिरंगाई करीत असल्याचा आरोप होत आहे.

जुगार अड्डयावर छापा टाकुन 24 जणांवर कारवाई, 63 हजार 950/- मुद्देमाल जप्त.
हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील शिवशक्ती चौक, भेकराईनगर, हडपसर, पुणे परीसरात काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमीवरून पाळत ठेवुन छापा टाकला असता, काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने 22 इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून जुगारातील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकुण 63,950/- रू किचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व दोन पाहिजे आरोपी अशा 24 इसमां विरूध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 427/2023 महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम 12 (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्डयावर छापा, 12 इसमावर कारवाई, 14,060/- रू. चा मुद्देमाल जप्त.
विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील विमाननगर वाघेश्वर पार्किंग, खांदवे, नगर रोड पुणे येथे एका पत्राच्या उघडया शेडमध्ये परीसरात काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत गोपनिय व खात्रीशीर बातमी मिळाल्याने गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आले. एकुण 12 इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून जुगारातील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकुण 14 हजार 060/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला
जुगार खेळताना मिळुन आलेले इसम अशा 12 इसमांविरूध्द विमाननगर पोलीस स्टेशन येथे गुरनं 139 / 2023 महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम 12 (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता विमाननगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, बाबा कर्पे, अजय राणे, इरफान पठाण, हणमंत कांबळे, इम्रान नदाफ, संदीप कोळगे, अमित जमदाडे, ओंकार कुंभार या पथकाने यशस्वी केली आहे

कोरेगाव पार्क परीसरात मोठया आवाजात साऊंड सिस्टीम लावुन संगीत वाजवणारे डेझर्ट वॉटर रेस्टारंट ॲण्ड वार यांचेवर कारवाई करून साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर केले जप्त.

सामाजिक सुरक्षा विभागातल पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे लेन नं. 19 कोरेगाव पार्क, पुणे परीसरात पेट्रोलिंग करीत असताना डेझर्ट वॉटर रेस्टारंट ॲण्ड वार मध्ये मोठया आवाजात सांउड सिस्टिमचा आवाज येत असल्याचे त्यांचे निदर्शनास आल्याने संबंधित हॉटेलवर कारवाई करून 1 लाख 10 हजार रू किंमतीचे साऊंड सिस्टिम जप्त केली असुन, सदर हॉटेलचे मालक व मॅनेजर यांचे विरुध्द पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण सन 2000) अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे..
ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वये ध्वनीप्रदुषण नियमावली नुसार कारवाई करणेकामी जप्त मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) कोरेगांव पार्क पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, अजय राणे, जमदाडे व कोळगे यांच्या पथकाने केलेली आहे.

शिवाजीनगरात कारवाईसाठी जाणिवपूर्वक दिरंगाई कोण करीत आहे….

 केंद्र व राज्य शासनाची व्हीआयपी व महत्त्वाची कार्यालय असलेल्या तसेच शिमला ऑफिस ते राजभवन पर्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या शिवाजीनगर हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यास पोलीस घाबरत आहेत का असा सवाल पुणे महानगरपालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये आलेले रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक विचारू लागले आहेत. दळवी हॉस्पीटल, हॉस्पीटलचा रस्ता, तेथील गाड्या, भोसले जलतरण तलाव, गार्डन, गॅरेज, इंडिया बुल्स कंपनी जवळील नदीपात्र झोपडपट्टी येथे जिथं तिथं जुगाराच्या चिठ्ठया लिहणारे ठायी ठायी बसले आहेत. लोकांची गर्दी होत आहे. सगळीकडे गुटखा खाऊन पचापच थुंकून घाण केली जात आहे. ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देखील शिवाजीनगरातील कारवाईसाठी जाणिवपूर्वक दिरंगाई का केली जात आहे असा सवाल व्यक्त होत आहे.