30 हजाराच्या कर्जावर 73 हजाराचे मुद्दल व्याज, तर 45 हजार रुपयांच्या कर्जावर 1 लाख 9 हजार रुपयांची पठाणी वसुली,
पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी
पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पुणे शहरात कोयता गँगचा उच्छाद… कोयता गँग रस्त्यावर उतरली.. पोलीसांसहित सर्व मिडीया कोयता .. कोयता म्हणून ओरडत असतांना, आम्हीच प्रथम कोयता गँगचा बोलविता धनी खाजगी सावकार असून, त्यांच्या जो पर्यंत मुसक्या आवळल्या जात नाहीत, तो पर्यंत कोयता माफीया शांत बसणार नाही. शेवटी माथाडी आणि खाजगी सावकारांचा प्रश्न पुन्हा एैरणीवर आला आहे. फायनांशिअल कंपन्यांची वसुली करणारे देखील कोयतामाफीयाच असून, त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. विश्रामबाग पोलीसांनी एका खाजगी सावकारावर गुन्हा दाखल केला असून त्याच्या पठाणी वसुलीची हकीकत खालील प्रमाणे आहे.
कोंढवे धावडे येथे राहणाऱ्या एका 28 वर्षीय इसमाने आरोपी कैलास कडू वय 354 रा. हिंगणे खुर्द याच्याकडून ऑगस्ट 2021 मध्ये ते आजपर्यंत कैलास कडू याच्याकडे मोटारसायकल व त्याचे आरसी बुक, कॅनरा बँकेचा चेक असे देवुन त्याच्याकडून सुमारे 30 हजार रुपयांचे कर्ज 10 टक्के व्याजदाराने घेतले होते. ॲडव्हान्स स्वरूपात व्याज व प्रोसेसिंग फी असे एकुण 3 हजार 500 रुपये कट मारून फिर्यादीस सुमारे 26 हजार 500 रुपये देण्यात आले होते. आता एकुण मुद्दल व व्याजापोटी सुमारे 72 हजार 900 रुपये दे असा तगादा लावला आहे. दरम्यान फिर्यादी याच्या चुलत भावाने देखील कैलास कडू याच्याकडून स्वतःचे ब्रेसलेट गहाण ठेवून 10 टक्के व्याजाने 45 हजार रुपये कर्ज घेतले होते. यासाठी मित्राच्या नावावर असलेली मोपेड गाडीचे मुळ आर.सी बुक, सारस्वत बँकेचे सही असलेला कोरा चेक सिक्युरिटी पोटी घेवून 10 टक्के व्याजदाराने आता 1 लाख 9 हजार रुपयांची मागणी करीत आहे.
मुद्दल व व्याज घेण्यासाठी फिर्यादी यांच्या भावाच्या मोबाईलवर फोन करून शिवीगाळ करून पैशांची मागणी करीत आहे. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत आहे. आरोपी कैलास कडू वय 35 याला अटक केली असून विश्रामबाग पोलीस स्टेशन कडील सहा. पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर अधिक तपास करीत आहेत.