Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

ऑनलाईन लॉटरी-जुगार अड्ड्यावरील कारवाईचा पुराणिक पॅटर्न राजधानी मुंबई पर्यंत पोहोचला

पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/
मटका, सोरट, ऑनलाईन लॉटरी, रमीचे क्लब हे सर्व जुगार अड्डे असून यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत असून सरकारची फसवणूक करणाऱ्या देशविघातक कारवायांचा शोध पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस अधिकारी श्री. राजेश पुराणिक यांनी लावला आहे. आता या विरूद्धचा आवाज राजधानी मुंबई पर्यंत पोहोचला असून, सर्वच प्रकारच्या जुगार अड्ड्यांवर कारवाईची मागणी होत आहे.


पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस अधिकारी श्री. राजेश पुराणिक यांनी या विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून मागील पाच/सहा महिन्यात 32 पोलीस स्टेशन हद्दीत 100 पेक्षा अधिक ठिकाणी बेकायदेशिर कृत्यांना पायबंद घालण्याचे काम केले आहे. यामध्ये बेकायदा व अवैध स्वरूपाचा धंदयामुळे शासनाचे कसे नुकसान होते व या कुप्रवृत्तीविरूद्ध कशी कारवाई करावी याचा नमुनाच त्यांनी सादर केला आहे.
आजपर्यंतच्या जुगार अड्डयावरील कारवाईमध्ये केवळ रायटर किंवा पंटर पकडून त्यांच्यावर कारवाई केली जात होती. परंतु श्री. पुराणिक यांनी कायदयाव्दारा स्थापित कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी करून, जुगारासाठी वापरात व उपयोगा आणल्या जाणाऱ्या प्रत्येक मुद्देमालावर कारवाई करण्यात आली आहे. जुगार अड्ड्यावरील रायटर, पंटर, खेळी यासह तेथील सर्व चिजवस्तुही जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच ज्या वाहनातुन जुगार खेळला गेला, त्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण पुणे शहरामध्ये राजेश पुराणिक यांच्याबाबत घबराट निर्माण झाली असून, कायदयानुसार वागणारा अधिकारी अशी प्रतिमा निर्माण झाली आहे.
मसाज पार्लर, स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर देखील मोठ्या कारवाया केल्या असून अनेक देशी विदेशी मुलींची या नरकातून सुटका केली आहे. तसेच पब, क्लब सारख्या ठिकाणी कारवाई करून, दौलतज्यादा करणाऱ्यांवर कायदयाचा बडगा उगारला आहे.
थोडक्यात कायदयाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी, नागरीकांच्या मनांत कायदयाचा धाक आणि कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने त्यांनी उचलले पाऊन भविष्यकाळात पुणे शहरासाठी वरदान ठरणारे आहे.
राजधानी मुंबईत देखील पुराणिक पॅटर्नचा धसका-
पुण्यात जुगार अड्ड्यांवर धडाधडा कारवाया होत असतांना, आता राजधानी मुबंईत देखील ऑनलाईन लॉटरी व जुगार अड्ड्याविरूद्ध मोहिम सुरू झाली आहे. स्थानिक वृत्तपत्रांनी देखील श्री. राजेश पुराणिक यांच्या कामाची दखल घेवून, मुंबईत देखील कारवाईची मागणी होत आहे.
याबाबत काही वृत्तपत्रांनी आवाज उठविला असता, मुंबईस्टाईल धमक्या सुरू झाल्या आहेत. तथापी वृत्तत्रांतून जुगार अड्ड्यांविरूद्ध व वेश्याव्यवसाया विरूद्ध रणशिंग फुंकले आहे. हे सर्व श्री. राजेश पुराणिक यांच्या कार्याची ती पोचपावती असल्याचे अनेकांचे मत आहे. (क्रमशः)