Wednesday, November 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पोलीस आयुक्तालयातील प्रेस रूमवर आयुक्तालयाचे नियंत्रण नाही, प्रेसरूमला पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची आवश्यकता

pune cp office press room

पुणे शहर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे वृत्त पुणे पोलीस वेबसाईट वरून प्रसारित करण्यास एका महिन्यात दहा वेळा खंड

नॅशनल फोरम/पुणे/दि/
पुणे शहरातील सर्व पोलीस ठाणे, गुन्हे शाखेच्या सर्व युनिट तसेच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी, सराईत गुन्हेगारांसह गुन्हेगारी डोळ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईची तसेच पकडण्यात आलेल्या अट्टल आरोपींची माहिती वृत्तपत्रांना पोहोचवून पुणे शहरामध्ये गुन्हेगारांवर धाक निर्माण करणे व पुणेकर नागरिकांना कायद्याच्या राज्याचा विश्वास निर्माण करण्याकरिता, गुन्हेगारावरील कारवाईची माहिती नोंदणीकृत वृत्तपत्रांसह खाजगी वृत्तवाहीया व इतर माध्यमांकडे प्रसिद्धीसाठी पाठविले जाते. तसेच सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे युनिट कडून आलेल्या प्रेसनोट वर संस्करण अर्थात एडिटिंग करून, संबंधित बातम्या वृत्तपत्रांकडे पाठवण्याचे काम पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील प्रेस विभागाचे आहे. तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ती प्रेसनोट प्रसारित करण्याची जबाबदारी प्रेसरूमची असताना देखील त्या प्रेसनोट प्रत्येक दिवशी एडिटिंग करून वृत्तपत्रांना देणे आवश्यक असताना देखील ती कार्यवाही केली जात नसल्याची बाब दिसून आली आहे.


मागील सहा महिन्यातील प्रत्येक महिन्यात दर चार-पाच दिवसांनी 8-10 दिवसांनी एकाच वेळी सर्व बातम्या पुणे शहर पोलीस यांच्या वेबसाईटवर अपलोड केल्या जात आहेत. आत्ता देखील मार्च महिन्यात सुमारे 31 दिवसांपैकी केवळ आठ वेळा बातम्या अपलोड केलेल्या असल्याचे दिसून आले आहे. 31 दिवसातील केवळ आठ वेळा बातम्या अपलोड केलेले असताना यावर कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष कसे जात नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता देखील माहे एप्रिल महिन्याची 5 तारखेचे सहा वाजत आले आहेत. तरी देखील एप्रिल महिन्यातील व मागील मार्च 29 तारखेपासून बातमी अपलोड केली नाहीये.

पुणे शहर पोलिसांचे कर्तुत्व काळ्या घोंगडीत का दडविले जात आहे-
स्थानिक सर्व पोलीस स्टेशन, सर्व गुन्हे शाखेच्या सर्व युनिट्स त्यांचे काम प्रामाणिकपणे बजावीत असताना, गुन्हेगारांना अटकाव करून पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस अहोरात्र करीत असतात. तसेच प्रसंगी जीवावर उदार होऊन कर्तव्य बजावित असतात. त्यांचे कर्तुत्व काळी घोंगडी टाकून, का दडपून टाकले जात आहे. याबाबत पोलीस आयुक्त कार्यालयाकडून उपायुक्त व प्रेस रूमला जाब विचारणे आवश्यक ठरत आहे.
चालु एप्रिल महिन्यात पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक व अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांचा धाक व कायद्याचे राज्य अबाधित राखण्यासाठी, गुन्हेगारी टोळ्यांवर मकोका, एम. पी.डी. ए. सारख्या कायद्याद्वारे गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली आहे. या बातम्या देखील स्थानिक वृत्तपत्रांना तसेच खाजगी प्रसारमाध्यमांना वेळेत दिल्या नसल्याकारणामुळे संबंधित कारवाईच्या बातम्या सर्वत्र प्रसारित झालेल्या दिसून येत नाहीत. ही अतिशय गंभीर बाब असून, यावर पोलीस आयुक्तांसह पोलीस महासंचालक कार्यालयाने तातडीने चौकशीचे आदेश देणे गरजेचे असल्याचे मत प्रसार माध्यमातून व्यक्त केले जात आहे.

प्रसार माध्यमांना बातम्या प्रसारित न करणे-
पुणे शहर व परिसरातील भारत सरकारकडे नोंदणीकृत दैनिक साप्ताहिक वृत्तपत्रे, गुन्हे विषयक बातम्या प्रसारित करणारी साप्ताहिके, खाजगी वृत्तवाहिन्या तसेच काही गुन्हे विषयक वृत्तांत देणाऱ्या युट्युब चॅनेल तसेच वेबसाईट यांना त्यांच्या ई मेलवर जाणीवपूर्वक बातम्या पाठविल्या जात नसल्याची बाब देखील दिसून आली आहे. याबाबत संबंधित प्रेसरूम यांना वारंवार कळवून देखील प्रसार माध्यमांना गुन्हे विषयक घडामोडींच्या प्रेसनोट पाठवल्या जात नाहीत, ही बाब देखील गंभीर आहे. दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील प्रसारमाध्यमांची यादी पोलीस स्टेशन व गुन्हे युनिट यांना दिली जाते. दरम्यान ही यादी अपडेट केली नसल्याने पोलीस स्टेशन व गुन्हे युनिट यांना संबंधित प्रसारमाध्यमांना देखील गुन्हे विषयक प्रेस नोट पाठविता येत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. दरम्यान या गुन्हेविषयक प्रेसनोट प्रसारमाध्यमांना दर दिवशी का पाठवल्या जात नाहीत? या मागचा हेतू नेमका काय आहे? दर दिवशी बातम्यांचे शॉर्टींग, एडिटींग केले जाते नाहीये काय… याबाबतही प्रेसरूम विभागाची झाडाझडती घेणे आवश्यक ठरत आहे.