Wednesday, December 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील पोलीसांच्या क्रीडा स्पर्धा उद्घाटनाला मुख्यमंत्री गैरहजर, पोलीस दल व खेळाडूंचा हिरमोड, कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलीसांकडून स्पेशल स्कॉडची स्थापना

Eknath shinde cm

पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/
पुण्यातील रामटेकडी येथील एसआरपीएफ ग्राऊंडवर पोलीस क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 7 जानेवारी पासून करण्यात आले असून आज त्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार होते. तथापी काही कारणास्तव पोलीस क्रीडा स्पर्धा उद्घाटनास मुख्यमंत्री हजर राहिले नाहीत. त्यामुळे पोलीस दल व खेळाडूंचा हिरमोड झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान कोरोना साथीनंतर तब्बल तीन वर्षानंतर ह्या क्रीडा स्पर्धा होत आहेत. असे असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न आल्यामुळे सर्वांचा हिरमोड झाला असल्याचे पत्रकार परिषदेत दिसून आले आहे.

दरम्यान या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह पुण्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस महासंचालक रजनिश शेठ यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत महत्वाचे भाष्य केले आहे. 

ते म्हणाले की, पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोयता गँगवर कारवाई करण्यासाठी पुणे शहर पोलीसांनी स्पेशल स्कॉडची नेमणूक केली आहे. तसेच या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी कोणकोणत्या उपाय योजना कराव्यात याबाबत धोरण निश्चिती  करण्यात आली आहे. तसेच पुण्यासह राज्याची कायदा आणि सुव्यवस्था सक्षम असून 2022 या सालात राज्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभिर प्रश्न निर्माण झाला नाही. 

क्रिडा स्पर्धांविषयी रजनीश शेठ म्हणाले की, कोरोनामुळे मागील तीन वर्षात ही स्पर्धा होऊ शकली नाही. आज तीन वर्षानंतर ही स्पर्धा होत आहे. ह्या स्पर्धेस संपुर्ण राज्यातील पोलीस गटातील खेळाडू सहभागी होत असतात. यातूनच नॅशनल स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड केली जाते. पुण्यातील व राज्यातील कायदा सुव्यवस्था, क्रीडा स्पर्धांची माहिती यावेळी रजनीश शेठ यांनी दिली. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमास आले नसल्याने सगळ्यांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले.