![राज्य उत्पादन शुल्क आणि भारती विद्यापीठ पोलीसांनी राज्य शासनाला दाखविला कात्रजचा घाट, देशी विदेशी दारूचे वाहतात पाट, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची लावली वाट](https://nationalforum.co.in/wp-content/uploads/2023/08/bhrati_v_police-779x440.webp)
राज्य उत्पादन शुल्क आणि भारती विद्यापीठ पोलीसांनी राज्य शासनाला दाखविला कात्रजचा घाट, देशी विदेशी दारूचे वाहतात पाट, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची लावली वाट
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कात्रजचा घाट म्हटलं की राजकारणातील सापशिडीचा खेळ समोर येतो. कात्रजचा घाट म्हटलं की, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या दगा फटक्याची तीव्र आठवण होते. कात्रजचा घाट म्हटलं की भंबेरी कशी उडते याचे अनुभव व आठवणी डोळ्यासमोर तर्रर्रपणे उभे राहतात. परंतु त्याच कात्रजच्या घाटाचा हिस्का जर शासनातील सरकारीबाबु लावत असतील तर जाब विचारायचा तरी कुणाला. सर्पउद्यानापासून ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि तिथून पुढे कात्रजच्या बोगद्यापर्यंत आणि व्हाया मांगडेवाडी,जांभूळवाडी, नऱ्हे यासारख्या एकूण 40 ते 45 हॉटेल कम ढाबा मध्ये दिवस रात्र बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारूची विक्री केले जात असल्याची बाब समोर आलेली आहे. यातून राज्य शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविला जात असताना, राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे तसेच पुणे शहर पोलीसातील स्थान...