हाय प्रोफाईल मॉल मध्ये चोरी करणाऱ्या अनु वेदप्रकाश शर्मा राहणार दिल्ली या महिलेस केले जेरबंद
Phoenix Market City, Vimannagar
विमानतळ पोलीस स्टेशन व गुन्हे युनिट 4 चा समांतर तपास…
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पोटासाठी चोरी करणारे अनेकांनी पाहिले आहेत. एवढच कशाला पारधी समाजासह अनेक इतर जमातीमधील इसमांनी पोटासाठी चोरी केल्याने त्यांना जीव जाईपर्यंत जबरी मारहाण केली आहे. मक्याचे कणीस, कुठ वडापाव, कुठ शेताच्या बांधावरील ऊस चोरून खाल्ला म्हणून जबर मारहाण करून जीव गेल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. परंतु स्वतःच्या चैनीकरीता हायप्रोफाईल चोरी करणारे मात्र शोधूनही सापडत नाहीत. दरम्यान विमानतळ पोलीस व गुन्हे युनिट क्र. 4 यांनी समांतर तपास करून एका हाय प्रोफाईल महिला अनु वेदप्रकाश शर्मा हीला अटक करण्यात आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,
दि. 5 मार्च 2023 रोजी सायंकाळी एका अनोळखी महिलेने ब्ल्यु स्टोन शॉप नंबर जी-29. लोअर ग्राउन्ड फ्लोअर, फिनिक्स मार्केटसिटी, विमाननगर, पुणे या दुकाना...