Sunday, November 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: vba

गायरान जमीनधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक, 20 जुलैला विधानभवनावर मोर्चा

गायरान जमीनधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक, 20 जुलैला विधानभवनावर मोर्चा

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumराज्यातील गायरान जमीनधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसदर्भात येत्या 20 जुलैला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी राज्यभरातील वंचितनं मोठी तयारी सुरु केली आहे. याच मोर्चाच्या तयारीसाठी वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर मोठी मेहनत घेत आहेत. गुरूवार दि.20 जुलैच्या विधानभवनावरील मोर्चाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळेल. या मोर्चाची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती सुजात आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. राज्यभरातील गायरानधारकांशी या मोर्चाच्या अनुषंगाने बोलणं सुरू असल्याचे आंबेडकर म्हणाले. गायरानधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी बाळासाहेब आंबेडक यांचे भावनिक नातं आहे. हा प्रश्न गायरानधारकांसाठी जीवन-मरणाचा असल्याचे सुजात आंबेडकर म्हणाले. हंगाम सुरु...
उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा सल्ला, ते आमदार अपात्र होण्यासाठी काय करावं लागणार?

उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा सल्ला, ते आमदार अपात्र होण्यासाठी काय करावं लागणार?

राजकीय
अकोला/दि/ प्रतिनिधी/सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निकाल दिला. यावेळी त्यांनी काही निरीक्षणं नोंदवली. या निरीक्षणांवरून आमच्या बाजूने निकाल लागल्याच्या प्रतिक्रिया दोन्ही गटांकडून व्यक्त केल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेतले. काल त्यांनी निकालानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावर आता वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे. आक्रमक भूमिका घ्या -न्यायालयाच्या निर्णयातून आज उद्धव ठाकरे यांना मोठं हत्यार मिळालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. तरचं ते आमदार अपात्र होतील असा जाहीर सल्ला वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. ते अकोल्यात पत्रकार परिषद बोलत होते. हा जाहीर सल्ला देतोय. कारण ज्यावेळी गोंधळला माणूस असतो, त्यावेळी खरी सल्ल्याची गरज असत...
अकोल्यात दंगल व्हावी असे अनेकांचे प्रयत्न होते – बाळासाहेब आंबेडकर

अकोल्यात दंगल व्हावी असे अनेकांचे प्रयत्न होते – बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
दोन्ही समाजांना शांतता राखण्याचे आवाहनसोशल मीडियाचा वापर करत दंगल भडकवण्याचा काम सुरू अकोला/दि/ प्रतिनिधी/अकोल्यात दंगल व्हावी असे अनेकांचे प्रयत्न होते असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे.आज झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, मी स्वतः दोन्ही समाज घटकांशी बोलण्याचा मी दिवसभर प्रयत्न करीत होतो. शहरात शांतता राहिली पाहिजे. दरम्यान अकोला शहरात शांतता आली आहे असे दिसत असले तरीही वातावरण तापते आहे असे मला दिसत आहे.हिंदू व मुस्लिम या दोन्ही समुदयांना मी शांततेचे आवाहन करीत आहे. शेवटी या दंगलीतून काहीही निष्पन्न होत नाही, नुकसान हेोते. त्याच्यामुळे यापुढे दंगल होणार नाही याचे दक्षता दोन्ही समाजाने घ्यावी असे आवाहन ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. ...
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा फॅक्टर, आता सुजात आंबेडकर यांची एन्ट्री

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा फॅक्टर, आता सुजात आंबेडकर यांची एन्ट्री

राजकीय
मुंबई/दि/ प्रतिनिधी/national forum/पर्यायी राजकारण देण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगाला आता नवा चेहरा मिळणार आहे. परदेशात शिक्षण घेऊन परत आलेल्या सुजात आंबेडकर यांनी पुन्हा सक्रीय होत बहुजन कार्यकर्त्यांवर असलेल्या राजकीय गुन्ह्यांचा प्रश्न हातात घेऊन सर्वपक्षीय युवकांना साद घातली आहे. सुजात आंबेडकर यांनी ‘सतरंजी उचल्या' अशी भूमिका असलेल्या सामान्य कार्यकर्त्यांवर असलेल्या केसेस चा मुद्दा हातात घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात दमदार एन्ट्री घेतली आहे. राजकीय आंदोलनं असोत, सण असोत किंवा रस्स्त्यावरचा संघर्ष, सामान्य कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होत असतात. नवरात्र मंडळ, गणपती मंडळ, दहीहंडी मंडळ असो नाही तर मोर्चे आंदोलनं, गुन्हे दाखल होणाऱ्यांमध्ये बहुजन युवक, युवतींचा भरणा जास्त असतो. राजकीय पक्ष ही अशा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून देतात. कोर्टकचेऱ्या आणि पोलिस...
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोटनिवडणूकीत निळ्या झेंड्याचा वापर, कुणाला विचारून निवडणूकीत वापरले जात आहेत…निळे झेंडे

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोटनिवडणूकीत निळ्या झेंड्याचा वापर, कुणाला विचारून निवडणूकीत वापरले जात आहेत…निळे झेंडे

राजकीय
काँग्रेसची अवस्था आजही जुन्या जमिनदारासारखी आहे पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/स्वातंत्र्याच्या 75 वर्षात काँग्रेसनेच अधिक काळ देशात व महाराष्ट्रात सत्ता उपभोगली आहे. देशातील व राज्यातील बहुजन समाजाला सत्तेत येऊ दिले नाही. यांनीच राज्य केलं. त्यामुळेच राज्यात 3/4 वेळेस काँग्रेसला जनतेने सत्तेतून बाहेर फेकले आहे. सत्तेतून बाहेर फेकले गेलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आता देखील बहुजन समाजाला सत्तेपर्यंत पोहोचू देत नाहीत. आंबेडकरी समुह व बहुजन समाजाची या पक्षांना मते हवीत परंतु या समाजांना सत्तेत वाटा दयायचा नाहीये. पुण्यातील कसबा व पिंपरी चिंचवड येथे पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गळयात आणि गाडीवर निळे झेंडे लावुन फिरत आहेत. दोन्ही काँग्रेसवाले कुणाला विचारून निळे झेंडे वापरत आहेत असा सवाल आंबेडकरी जनता विचारत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ...
कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत वंचित आघाडीची भूमिका काय? बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं,

कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत वंचित आघाडीची भूमिका काय? बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं,

राजकीय
नाशिक/दि/पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेवार जाहीर करण्यात आले आहेत. तर लवकरच महाविकास आघाडीकडूनही उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची नेमकी काय भूमिका आहे, याबाबत बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, आमची शिवसेनेची युती आहे. आम्ही शिवसेनेला विनंती केली होती की, त्यांनी या दोन्ही जागा लढवाव्या. कारण कसब्याच्या जागेवर काँग्रेसचा पराभव झाला आहे आणि राष्ट्रवादीने इथे उमेदवारच जाहीर केला नव्हता, अशी परिस्थिती आहे. ...
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपासहित प्रस्थापित पक्षांनी, प्रत्येक निवडणूकीत आंबेडकरी चळवळ आणि बाळासाहेब आंबेडकर यांना ब्लॅकमेल केले

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपासहित प्रस्थापित पक्षांनी, प्रत्येक निवडणूकीत आंबेडकरी चळवळ आणि बाळासाहेब आंबेडकर यांना ब्लॅकमेल केले

सर्व साधारण
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाणवंचित बहुजन आघाडी व शिवसेना यांची युती झाल्यानंतर, सर्वाधिक मळमळ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उफाळुन आली असल्याचे खाजगी वृत्तवाहिनीवरील अनेक बातम्यांमधुन दिसून येत आहे. वृत्तपत्र व टिव्ही चॅनेल्सच्या काही पत्रकारांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री. नाना पटोले यांना मविआ युतीबाबत विचारले असता, बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागण्या काय आहेत हे माहिती नसल्याचे सांगितले आहे. प्रसारमाध्यमांसमोर रागजळफाट व्यक्त केला असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने देखील बुडाला आग लागल्यासारखे सगळीकडे आरोळ्या ठोकत सुटले असल्याचे वृत्तवाहिनीवरून दिसत आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते राष्ट्रवादीची बाजु सावरतांना दिसत आहेत. दरम्यान मागील 40/50 वर्षात सत्ताधारी व विरोधी पक्षातील प्रस्थापित राजकीय पक्षांनी आंबेडकरी चळवळ व बाळासाहेब आंबेडकर यांना ...