Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: swargetcrime

पुण्यातील स्वारगेट आणि मार्केटयार्ड पोलीसी कारभारामुळे… तुझ्या गळा, माझ्या गळा, बांधु मटक्यांच्या माळा…

पुण्यातील स्वारगेट आणि मार्केटयार्ड पोलीसी कारभारामुळे… तुझ्या गळा, माझ्या गळा, बांधु मटक्यांच्या माळा…

पोलीस क्राइम
तुझा 1 क्लब, माझे दोन क्लब…चौथा आला नटराजवर…स्वारगेट व मार्केटयार्डात कायदयापेक्षा मोठा हात नेमका कुणाचा आहे….नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/राज्याचे तत्कालिन गृहमंत्री कै. आर.आर पाटील यांनी महाराष्ट्रात डान्सबार वर बंदी आणली. केवळ घोषणा न करता, डान्सबार बंदीचा कायदा आणला. तसेच राज्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास, संपूर्ण पोलीस स्टेशनचे अधिकारी निलंबित केले जातील अशी घोषणा केली होती. नंतर अनेक वर्षानंतर, पुण्यातही तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी देखील ज्या पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व गैरकायदयाचे धंदे आढळुन येतील त्यांच्या विरूद्ध कठोर कारवाई केली जाईल अशी तंबी दिली होती. तंबी दिली खरी परंतु कारवाई कधीच केली नाही. परंतु कारवाईच्या भीतीने पोलीस स्टेशन हद्दीत नवीन अवैध धंदे सुरू होऊ दिले जात नव्हते. आता मात्र रान मोकळे झाले आहे. ना तंबी, ना कारवाईची भीती, सगळे अलबेल सुरू आहे. ...
बाई ऽऽ बाई ऽऽऽ… मनमोराचा (स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीत) कसा पिसारा फुलला…

बाई ऽऽ बाई ऽऽऽ… मनमोराचा (स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीत) कसा पिसारा फुलला…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/दिनांक 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीपासून स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील गैरकायदयाच्या कृत्यांबाबत जनजागृतीला सुरूवात केली. स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत अंडरवर्ल्डचे नाव घेवून व लाईन बॉयच्या सुरात स्वारगेट पोलीस स्टेशन लगत जुगाराचा क्लब सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावले यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. आज 13 तारीख आहे. तरी देखील जुगाराचा क्लब अजुनही बंद झालेला नाही. त्यामुळे 18/22 तास चालणारा जुगाराचा क्लब नेमका कुणाचा आहे याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन लगत असलेला क्लब -डॉनचा की लाईन बॉयचा -स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सुरू असलेला जुगाराचा क्लब हा सुमारे 18 ते 22 तास सुरू असतो. गणेशोत्सवाच्या काळात तर जुगाऱ्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. दरम्यान स्वारगेट पोलीस स्टेशन लगत सुरू असलेला जुगारा...