Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Stop nepotism in Madhya

माढ्यातील घराणेशाही थांबवा, आता ओबीसी उमेदवार हवा- फोंडशिरस येथील मुस्लिम समाजाच्या बैठकीत मागणी

माढ्यातील घराणेशाही थांबवा, आता ओबीसी उमेदवार हवा- फोंडशिरस येथील मुस्लिम समाजाच्या बैठकीत मागणी

राजकीय
नॅशनल फोरम/सोलापुर (माळशिरस)/ दि/ प्रतिनिधी/माढा लोकसभा मतदारसंघात कायमस्वरूपी घराणेशाहीचे राज्य आहे. प्रस्थापित शक्तींच्या हातात कायमस्वरूपी सत्ता असल्याने त्यांना जनतेचा आणि त्यांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. त्यामुळे माढ्यातून कायमस्वरूपी घराणेशाही संपवुन आता लोकशाहीतील मूल्यांनुसार, जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी साझेदारी ह्या सुत्रानुसार माढ्यात आता ओबीसी नेतृत्वाला संधी देण्याच्या मागणीने जोर धरत आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. परंतु स्थानिक कार्यकर्ते व नागरीकांचा देखील मोठा असंतोष पहायला मिळत असून, माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसी बांधवानी यावेळी, माढ्यातून जर ओबीसी उमेदवार मिळाला तरच मतदान करणार अन्यथा मतदान करणार नसल्याचीही भूमिका जाहीर केली आहे. यावेळी प्रस्थापित राजकीय पक्ष पारंपारीक घराणेशाहीला...