वंचितच्या जाहीरनाम्यात तृतीयपंथीय-समलैंगिक व्यक्तीस मोफत उच्च शिक्षणासह, परदेशात शिक्षणासाठी स्कॉलरशिप, घरकुल योजनेतही तरतुद
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/तृतीयपंथी समाज, जोगती, आराधी या समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन दुषित आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारच्या संधी मिळत नाहीत. शासनस्तरावरून देखील कोणत्याही तरतुदी केल्या जात नाहीत. तत्कालिन काँग्रेस राजवटीत तर ट्रान्सजेंड अर्थात तृतीयपंथीयांना दिल्लीत जबरी मारहाणीच्या घटना अनेकदा घडल्या होत्या. आज भाजप देखील काँग्रेसचाच कित्ता गिरवित आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडी मात्र कायम तृतीयपंथी, जोगती, आराधी या समाज घटनांना, मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करीत होता. लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या कार्यकाळात त्यांनी किमान समान कार्यक्रम तयार करून महाविकास आघाडीकडे पाठविला आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीने तयार केलेल्या 39 कलमी किमान समान कार्यक्रमात मुद्दा क्र. 31 वर तृतीयपंथी समाज घटकांना, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तरतुद केली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्...