पुणे महापालिकेच्या आयुक्त आणि अति. आयुक्तांच्या आदेशांना ठेंगा दाखविण्याची माधव जगतापांची खोड सवय आहे
माधव जगताप- लाखोंची बोली, कोट्यवधींचे व्यवहार? माधव जगतापांची खाबुगिरी भाग- 1
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाणपुणे महानगरपालिकेतील सुरक्षा विभाग, सुरक्षा विभाग सनियंत्रक, अतिक्रमण, आकाशचिन्ह विभाग, घनकचरा विभाग या सारखे अतिमहत्वाची खाती अनेक वर्ष स्वतःच्या कब्जात ठेवण्याची माधव जगतापांची एक प्रशासकीय कला होती व आहे. उपआयुक्त या पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर, पुणे महापालिकेतील सर्वाधिक क्रिमी पोस्टवर त्यांनी कब्जा केला व निरंतर कोणत्याही अडथळ्याविना स्वतःकडे ठेवण्यात त्यांना यश आले आहे. त्यांनी या पदावर पायउतार झाल्यानंतर, हळुहळु त्यांच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारांची प्रकरणे बाहेर येऊ लागली आहेत. सध्या माधव जगताप यांनी ह्या सर्व पदांचा त्याग करून, आता पुणे महापालिकेचे हृदय असलेले टॅक्स अर्थात कर संकलन व कर आकरणी विभागाचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासूनच त्यांन...