Wednesday, December 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: punemuncipalcorportion

पुणे महापालिकेच्या आरआरचा प्रशासकीय राजवटीत खुला बाजार, बदली, पदोन्नती, अतिरिक्त पदभार, प्रभारी पदभारासाठी पात्रता नसली तरी, पैसे घेवून या आणि ऑर्डर घेवून जा… आरआरचा धंदा मांडलाय काय…

पुणे महापालिकेच्या आरआरचा प्रशासकीय राजवटीत खुला बाजार, बदली, पदोन्नती, अतिरिक्त पदभार, प्रभारी पदभारासाठी पात्रता नसली तरी, पैसे घेवून या आणि ऑर्डर घेवून जा… आरआरचा धंदा मांडलाय काय…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील नागरीकांना रस्ते, पाणी, ड्रेनेज, रस्त्यांवरील दिवे यासह वाहतुक नियोजन, अनाधिकृत बांधकामे, अतिक्रमण रोखणे, व्यापारी संकुल, पथारी व्यावसायिक या सारख्या मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व भारतीय संविधानातील नागरी हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येते. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देखील महानगरपालिकेची आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची भरती करणे, भरतीसाठी त्याचे नियमन करणे ही देखील महत्वाची बाब आहे. उच्च शैक्षणिक गुणवत्ता, कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांची निवड करून पुणेकरांचे नागरी जीवन सुकर बनविणे हाच मुख्य उद्देश आहे. त्यासाठीच पुणे महानगरपालिकेसाठी राज्य शासनाने, पुणे महापालिकेमध्ये अंमलात असलेले सर्व सेवा प्रवेश नियम तसेच यापूर्वी करण्यात आलेले ठराव व आद...
पुणे मनपातील नोकर भरती, पदोन्नतीतील निकष बदल प्रकरणी विक्रम कुमार आणि रविंद्र बिनवडे यांची सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशी करा

पुणे मनपातील नोकर भरती, पदोन्नतीतील निकष बदल प्रकरणी विक्रम कुमार आणि रविंद्र बिनवडे यांची सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशी करा

सर्व साधारण
पुणे महापालिकेतील नोकर भरती आणि पदोन्नती…. आयुक्त विक्रम कुमार आणि अति. आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्याकडून…पुणे मनपा आकृतीबंधातील बदल, लाखोंची बोली आणि कोट्यवधी रुपयांचे व्यवहार….नोकर भरती आणि पदोन्नतीचे निकष का बदलत आहेत, जो पैसे देईल त्याची भरती आणि त्यालाच पदोन्नती, जो पैसे देणार नाही, त्याच्या भरती आणि पदोन्नतीमध्ये बदल केले… पुणे महापालिकेतील नोकर भरती आणि पदोन्नतीतील खाबुगिरी… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेच्या मागील 25 वर्षाच्या कालावधीत आजपर्यंत कधीच मेगा नोकर भरती झाली नाही किंवा 2014 रोजी पुणे महापालिकेचा आकृतीबंध मंजुर झाल्यानंतर देखील त्यात फारसा बदल केला गेला नाही. परंतु पुणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाल्यापासून, धडाधड नोकर भरती सुरू आहे, पैसे मिळवुन देणाऱ्या अर्थातच महसुली खात्यातील आकृतीबंधामध्ये कमालिच्या दुरूस्त्या केल्या जात आहेत. पदोन्...
पुणे महापालिकेतील बदली,पदोन्नती आणि टेंडर राज मधील भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी, आयुक्त विक्रम कुमार वा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची सीबीआय व ईडीमार्फत चौकशीची मागणी

पुणे महापालिकेतील बदली,पदोन्नती आणि टेंडर राज मधील भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी, आयुक्त विक्रम कुमार वा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची सीबीआय व ईडीमार्फत चौकशीची मागणी

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री. अरविंद शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेतील बदली, पदोन्नतीतील पदस्थापनेसाठी वर्ग 1 ते वर्ग 4 पर्यंत सुमारे 10 लाख, 20 लाख, व 30 लाख अशा रकमा घेतल्याखेरीज बदली आणि पदोन्नतीतील पदस्थापना दिली नसल्याचा तक्रार अर्ज राज्याच्या नगरविकास मंत्रालयांना पाठवून तो अर्ज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे. अरविंद शिंदे यांच्या खळबळजनक आरोपानंतर, पुणे महापालिकेत सार्वत्रिक बदल्यांचे सत्र सुरू झाले. 15 हजार कर्मचाऱ्यांपैकी केवळ 900 सेवकांच्या बदल्या करण्यात आल्या. दरम्यान सार्वत्रिक बदल्यांच्या अवघ्या चारच महिन्यात सामान्य प्रशासन मधील बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची पुनः आहे त्याच खात्यात मागच्या दाराने नियुक्ती करण्यात आली आहे. स्वतःच्या खात्याचे कामकाज पाहून अतिरिक्त पदभार दिल्याचे 26 जुन रोजीच्या का...
पैशांसाठी प्रशासकांचा नंगानाच, पुणे महापालिकेतील सनदी अधिकारी विक्रम कुमार आणि रविंद्र बिनवडे यांच्या भ्रष्ट कारभारावर राज्य शासनाचे ताशेरे

पैशांसाठी प्रशासकांचा नंगानाच, पुणे महापालिकेतील सनदी अधिकारी विक्रम कुमार आणि रविंद्र बिनवडे यांच्या भ्रष्ट कारभारावर राज्य शासनाचे ताशेरे

सर्व साधारण
शासनाच्या खांदयावर बंदूक ठेवून महापालिका कर्मचाऱ्यांना शुट आऊट करणाऱ्या प्रशासकांना शासनाची चपराक तीन वर्षात 30 वेळा आकृतीबंधातील बदल कशासाठी पाहिजे,बदली,पदोन्नती आणि पदस्थापनेत भ्रष्टाचार आणि पैसे खाण्यासाठीच आरआरमध्ये बदल केले आहेत काय, ईडी आणि सीबीआय वाले झोपले आहेत काय, त्यांना पुणे मनपातील भ्रष्टाचार दिसत नाही काय… आयुक्त, अति. आयुक्त, उपआयुक्तांसह खातेप्रमुखांची 100 कोटीपेक्षा अधिक मालमत्ता असण्याची शक्यता, संघटनांची चौकशीची मागणी…. पुणे महापालिकेत किती रामोड आहेत… नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महापालिकेचा आकृतीबंध 2014 साली लागु झाल्यानंतर लगतच्या काही वर्षांमध्ये त्यात सातत्याने बदल केले जात आहेत. काही कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता व अनुभवाची वर्षे समोर ठेवून, आकृतीबंधामध्ये त्याच पद्धतीने बदल केले जात आहेत. केवळ काही विशिष्ठ कर्मचाऱ्यांना त्या पदा...
पुणे महापालिकेत 25 लाखात उपकामगार अधिकारी पदाच्या मुलाखती संपन्न झाल्या…

पुणे महापालिकेत 25 लाखात उपकामगार अधिकारी पदाच्या मुलाखती संपन्न झाल्या…

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगपालिकेचे माजी नगरसेवक व पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. अरविंद शिंदे यांनी पुणे महापालिकेतील बदली आणि पदोन्नतीमध्ये 10 लाखांपासून ते 30 लाख रुपयांपर्यंत रक्कम मागितले जाते. रक्कम देणाऱ्या सेवकांना बदली आणि पदोन्नती दिली जात आहे, त्यामुळे पुणे महापालिकेत असंतोष निर्माण झाला असल्याचा तक्रार अर्ज नगरविकास मंत्रालय मुंबई सह पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांच्याकडे सादर केला होता. आता देखील त्याचीच प्रचिती आली असून, पुणे महापालिकेच्या कामगार विभागातील त्याच भ्रष्ट 8 उपकामगार अधिकाऱ्यांना पदोन्नती देणार असल्याबाबत नॅशनल फोरमने मागील आठवड्यात सांगितले होते. मात्र चालुच्या आठवड्यात सामान्य प्रशासन विभागाने पत्रक काढुन त्याच भ्रष्ट उपकामगार अधिकाऱ्यांना पदोन्नतीने पदस्थापना देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच भ्रष्ट आठ प्रभारी उपका...
पुणे महापालिकेत आवडीच्या खात्यांसाठी पुन्हा सुरू झाला घोडेबाजार

पुणे महापालिकेत आवडीच्या खात्यांसाठी पुन्हा सुरू झाला घोडेबाजार

सर्व साधारण
नॅशनल फोरम/ पुणे/ दि/प्रतिनिधी/पुणे महानगर पालिकेच्या बांधकाम विभाग, टॅक्स, अतिक्रमण, आकाश चिन्ह व परवाना विभाग याच्यासह एकूण 15 महसुली खात्यामध्ये नियुक्ती मिळावी तसेच नियुक्ती मिळाल्यानंतर, पदोन्नती मिळावी परंतु त्याच खात्यात परंतु नियुक्ती मिळाल्यानंतर, पुन्हा कधीच बदली होऊ नये याच्यासाठी पुणे महानगरपालिकेतील तांत्रिक व अतांत्रिक सेवकांची नेहमी धडपड सुरू असते. दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या बाहेर अनेक संस्था, संघटना व राजकीय पक्षाने बदलीच्या घोडेबाजाराविरुद्ध तीव्र आंदोलने केली असल्याने पुणे महानगरपालिकेवे प्रशासक श्री. विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये सार्वत्रिक बदल्यांचा धडाका सुरू केला. यामध्ये तांत्रिक व अतांत्रिक विभागात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या सेवकांच्या बदल्या करण्यात आल्या. दरम्यान सार्वत्रिक बदल्यांमध्ये नको असलेल्या खात्या...
पुणे महापालिकेत प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांचे शेकडो गुन्हे, तरी पदोन्नतीसाठी मुख्य कामगार अधिकारी आग्रही का? आठवा ती पुणे महापालिकेबाहेरील आंदोलने, आठवा तो कंत्राटी कामगार आणि खाजगी सुरक्षा रक्षकांचा टाहो…

पुणे महापालिकेत प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांचे शेकडो गुन्हे, तरी पदोन्नतीसाठी मुख्य कामगार अधिकारी आग्रही का? आठवा ती पुणे महापालिकेबाहेरील आंदोलने, आठवा तो कंत्राटी कामगार आणि खाजगी सुरक्षा रक्षकांचा टाहो…

सर्व साधारण
प्रभारी उपकामगार अधिकारी पदवाटप करतांना सेवाज्येष्ठता पहिली नाही, तांत्रिकांना अतांत्रिक पदांवर नियुक्ती, उच्चशैक्षणिक पात्रता धारक सेवकांना पदस्थापना नाही… प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांनी शिस्तभंग करण्याची फटाक्यांची माळ लावली तरी कारवाई ऐवजी पदोन्नतीच खिरापत…. नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांमार्फत बाह्यस्त्रोताव्दारे निगा, दुरूस्ती, सुरक्षा व स्वच्छता इत्यादी कामे कंत्राटी कामगारांकडून करून घेण्यात येतात. या कामांकरीता नेमण्यात येणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या किमान वेतन, ईएसआय, ईपीएफ याबाबत अनेक तक्रारी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना तसेच कामगार संघटना यांच्याकडून प्राप्त झाले आहेत. त्यामुळे ठेकेदारामार्फत करण्यात येत असलेल्या कंत्राटी कामगारांसाठी धोरण ठरविण्यासाठी 2015 साली समिती स्थापन करण्यात आली. त्यासाठी पुणे महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमात दुरूस्ती...
पुणे महापालिकेतील कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी उदया 1 मे रोजी मोर्चा व सभा !

पुणे महापालिकेतील कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी उदया 1 मे रोजी मोर्चा व सभा !

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भारतात 1 मे 1923 पासून जागतिक कामगार दिन साजरा करण्यात येतो, यंदाचा कामगार दिवस शतकपूर्ती साजरा करणार आहे. तरीदेखील नागरिकांच्या सेवेत 12 महीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. गेली अनेक वर्षे या प्रश्नांकारिता आपण वेळोवेळी आवाज उठवत आलेलो आहोत. मात्र आता या ढिम्म प्रशासनाच्या कारभारामुळे कामगार दिनीच कामगारांना त्यांच्या न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे. आपल्या सर्व कामगारांचे प्रतीक असलेल्या कामगार पुतळ्यासमोर आपण 1 मे ,सोमवार रोजी आपल्या न्याय व हक्कांसाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. 1 मे 2023 ला सकाळी 10 वाजता श्रमिक भवनपासून मोर्चाला सुरुवात करून आपण सगळे कामगार पुतळ्यापर्यंत जाणार आहोत. तरी सर्व कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कामगार युनियनने केले आहे. मोर्च्यातील प्रमुख मागण्या :1.कायम सफाई कर्मचाऱ्...
प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांना छुप्या मार्गाने पदोन्नत करण्याच्या हालचाली, सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न…

प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांना छुप्या मार्गाने पदोन्नत करण्याच्या हालचाली, सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न…

सर्व साधारण
25 लाखात उपकामगार अधिकारी पदाचा सौदाकोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आंदोलनकर्त्यांचे आरोपनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिका सेवा नियम 2014 नुसार पुणे महापालिकेत अंशकालिक, कंत्राटी, रोजंदारी, मानसेवा किंवा प्रभारी व अतिरिक्त पदभार- पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना केलेल्या कामांचा अनुभव पुणे महापालिकेतील नोकरी किंवा पदोन्नती देतांना करू नये तसेच तांत्रिक पदावरील कर्मचाऱ्यांना अतांत्रिक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये असे शासनाने मंजुर केलेल्या सेवा प्रवेश नियम अर्थात आकृतीबंधामध्ये नमूद आहे. तथापी प्रभारी उपकामगार अधिकारी या अतांत्रिक पदावर तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कोणतीही सेवाज्येष्ठता न पाहता, प्रभारी उपकामगार अधिकारी पदावर एकुण 8 कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच या प्रभारी उपकामगार अधिकारी यांनी केलेल्या कामाचा पदोन्नतीसाठी अनुभव म्हणून वापर करण्यात आला आहे. प...
पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत 10 ते 15 वर्षांपासून घुटमळणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा…

पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत 10 ते 15 वर्षांपासून घुटमळणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा…

सर्व साधारण
एकाच खात्याने सोईसाठी बनविलेल्या विभागात बदली म्हणजे, बदलीचा सौदा 5 लाख ते 25 लाख रुपयात मान्य झाल्याचे समजावे… नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारावर संविधान परिषदेच्या वतीने 91 दिवसांचे हलगी बजाव धरणे आंदोलनाच्या माध्यमातून पुणे महापालिकेच्या महत्वाच्या खात्यात ठाण मांडून बसलेल्यांची पोलखोल अनिरूद्ध चव्हाण यांनी केली होती. तसेच बदलीचा दर 10 लाखापासून ते 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचला असल्याचे उघडपणे जाहीर सभेत माहिती दिली होती. त्यामुळेच शिवाजीनगर पोलीसांकरवी आमची हलगी वाजविणे बंद करण्यात आले तसेच सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी बेकादेशिरपणे आमचा सभेचा साऊंड उचलुन नेला होता. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला परंतु पुढे दोन महिन्यानंतर, आम आदमी पार्टीसह, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुणे महापालिकेतील बदली व पदोन्नतीतील लाखोंची बोली आणि को...