Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Punecrimenews

सहकारनगर पोलीस स्टेशन, कारभारी बदलला तरी कारभार सुधारण्याचे नावही नाही

सहकारनगर पोलीस स्टेशन, कारभारी बदलला तरी कारभार सुधारण्याचे नावही नाही

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सर्वाधिक शांत असलेले पोलीस स्टेशन म्हणून सहकारनगर पोलीस स्टेशनची ओळख होती. मोठ्या झोपडपट्टया असल्यातरी गुन्हेगारी किरकोळ स्वरूपाची होती. परंतु काळाच्या ओघात शांत असणारे पोलीस स्टेशन गुन्हेगारी कारवायांनी पुरते बदलुन गेले आहे. चार आत आणि 40 बाहेर अशी ख्याती सध्या सहकारनगर पोलीस स्टेशनची झाली आहे. तळजाई वसाहत, अरण्येश्वर, शंकर महाराज मठ, पद्मावती वसाहत सह सिद्धार्थ नगर दातेस्टॉप सारख्या मोठ्या झोपडपट्टया सहकारनगरकडे आहेत. परंतु लोकसंख्येची अधिक घनता असलेले धनकवडी, आंबेगाव सारख्या गावांसह पूर्वीच्या मिळकतींवर आता मोठी लोकसंख्या वाढली आहे. त्यात लगतच्या पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांसाठी लपण्यासाठी जागा असल्याने देखील हद्दीत गुन्हेगारी वाढली. गुन्हेगारांची आर्थिक ठिकाण देखील सहकारनगर भागात वाढली आहेत, मटका जुगार अड्डे, हातभट्टी ही मोठी ओळख निर्माण झाली आहे.वाहन...
शिवाजीनगर-खडकी -विश्रांतवाडी पोलिसांच्या त्रिकुटाचा संघटित गुन्हेगारांच्या जुगार अड्ड्यात भागीदारी, सासु ड्रग माफिया तर जावई गॅम्बलर

शिवाजीनगर-खडकी -विश्रांतवाडी पोलिसांच्या त्रिकुटाचा संघटित गुन्हेगारांच्या जुगार अड्ड्यात भागीदारी, सासु ड्रग माफिया तर जावई गॅम्बलर

सर्व साधारण
पुणे पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनला गुन्हेगारी टोळ्यांनी केले ऑल आउट नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार यांनी ज्या गुन्हेगारी टोळ्यांना मोक्का व एमपीडीए कायदयाने कारागृहात डांबले त्याच संघटित गुन्हेगारांच्या टोळीतील सदस्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीरपणे अवैध धंदा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मागील सात दिवसात पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला कळवून देखील मागील सात दिवसांपैकी एक दिवसही कारवाई झालेले नाही. अशीच अवस्था खडकी पोलीस स्टेशन व विश्रांतवाडी पोलीस स्टेशन यांची असून या तीनही लगतच्या पोलीस स्टेशनची संघटित गुन्हेगारांनी अक्षरशः चाळणी केली असून जागोजाग सर्वसामान्यांना बक्षीस आणि पैशाचे आमिष दाखवून मटका जुगार अड्डे, पत्त्याचे क्लब, पणती पाकोळी सारखे सोरट आदि सर्व प्रकारचे जुगार अड्डे सुरू करून तीनही पोलीस स्टेशन हद...
पुणे पोलिसांकडून दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थाची बाजारपेठ होत आहे काय….

पुणे पोलिसांकडून दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थाची बाजारपेठ होत आहे काय….

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 व 2 यांनी मागील आठवड्यात टाकलेल्या छाप्यात सुमारे दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान गुन्हे शाखा युनिट यांनी देखील मोठी कारवाई करून सुमारे 5 लाख 19 हजार रुपयांचे चरस अंमली पदार्थासह 3 तलवार, 2 कुकरी, 1 सत्तुर, 1 कु-हाड, 1 चाकु, 1 रापी अशी बेकायदेशिररित्या हत्यारांसह सुमारे 5 लाख 72 हजार 50 रु चा माल जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ पथकाचे विनायक गायकवाड यांनी तर अंमली पदार्थाविरूद्ध मोहिम उघडली आहे. मागील सहा महिन्यात सुमारे 10 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. थोडक्यात मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थांची बाजारपेठ होत चालली आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात काही घटनांचा आढावा घेतला आहे. उनजो ऑनलाईन डिलीव्हरी ॲपचा वापर करून एल.एस.ड...
पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे ….आता वाजले की बारा

पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे ….आता वाजले की बारा

पोलीस क्राइम
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील खून, हत्याकांड, दरोडा, घातपात, फसवणूक, देहव्यावारासह अमली पदार्थांचा खुलेआम बाजार…कोरेगाव पार्क मध्ये खुलेआम वेश्याव्यवसाय नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/ब्रिटिश काळापासून ते आज पर्यंत पुण्यातील कोरेगाव पार्क हा परिसर जिल्हाधिकारी पुणे यांच्या निरीक्षणाखाली असलेला भूभाग आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालय व जिल्हाधिकारी पुणे यांच्या स्वतंत्र निरीक्षणाखाली असलेल्या कोरेगाव पार्क, कल्याणी नगर परिसरात शेकडोंच्या आसपास स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असताना. त्याच्यावर कारवाई केली जात नाही. सेक्स टुरिझम च्या नावाखाली संपूर्ण कोरेगाव पार्क हद्दीत दिवस-रात्र 24 तास देश विदेशातील मुली व महिलांचा बाजार भरविला जात असताना, त्याच्यावर कायद्यातील कठोर तरतुदींचा वापर केला जात नाही. दरम्यान मागील एक दीड वर्षात संपूर्ण कोरे...
महिला-मुलींचा अपव्यापार करणाऱ्यांविरूद्ध पुण्याच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पुढचे पाऊल, पुणे पोलीसांच्या सासुचा कलम 370 बडगा

महिला-मुलींचा अपव्यापार करणाऱ्यांविरूद्ध पुण्याच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पुढचे पाऊल, पुणे पोलीसांच्या सासुचा कलम 370 बडगा

पोलीस क्राइम
वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांविरूद्ध आजीवन कारावासाची शिक्षा नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/गुन्हे करणारा आणि गुन्हे करवुन घेणाऱ्याविरूद्ध कठोर कारवाई करणारे कायदे अस्तित्वात आहेत. परंतु कायदयांच्या परिणामकारक अंमलबजावणी अभावी गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. यामुळेच संपूर्ण देशातील न्यायालयात कोट्यवधीचे कोर्ट केसेस आजही प्रलंबित आहेत. दरम्यान पोलीसांनी कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी केली तर गुन्हे करणारा आणि गुन्हे करवुन घेणाऱ्यांची गुन्हे करण्याची हिंमत होणार नाही. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील सामाजिक सुरक्षा विभागाने महिला व मुलींच्या देहव्यापाराविरूद्ध मागील सप्ताहात जबरी कारवाया केल्यामुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महिला व मुलींच्या देहव्यापाराविरूद्ध अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध अधिनियम अतिशय सक्षम असा कायदा आहे. त्याच बरोबर फौजदारी कायदे व भादविमधील परस्पर पुरक का...
पुण्यात आज गुन्हेगारीचा पाढा चढला…फरासखान्यात तुफान राडा, तर समर्थ मध्ये खंडणी,सिंहगड मध्ये खुनी हल्ला, खडकमध्ये पुर्ववैमनस्यातून दण्णादण्णी तर दत्तवाडी महिलेचा विनयभंग…

पुण्यात आज गुन्हेगारीचा पाढा चढला…फरासखान्यात तुफान राडा, तर समर्थ मध्ये खंडणी,सिंहगड मध्ये खुनी हल्ला, खडकमध्ये पुर्ववैमनस्यातून दण्णादण्णी तर दत्तवाडी महिलेचा विनयभंग…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात शनिवार, रविवार आणि आज सोमवारी देखील गुन्ह्याचा पारा चढलेला होता. फरासखान्यात तुफान राडा, तर समर्थ मध्ये खंडणी,सिंहगड मध्ये खुनी हल्ला, खडकमध्ये पुर्ववैमनस्यातून दण्णादण्णी तर दत्तवाडी मध्ये महिलेच्या विनयभंगाचे प्रकार घडले आहेत. पोलीस आणि कायदयाची भिती कुठच्या कुठे पळून गेली असुन सराईत गुन्हेगारासारखी हाणामारी सुरू होती. पोलीसांनी गुन्हे दाखल केले असले तरी, नागरीकांच्या मनांत पोलीस आणि कायदयाविषयी काही भिती का उरली नाही, यावर विचार मंथन होणे गरजेचे झाले आहे. ऐऽऽ पुढं बघुन जा अस्सं म्हणाला अन्‌‍ कुंभारवाड्यात तुफानी राडा -फरासखाना पोलीस स्टेशन पुणे/फरासखाना पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील व कसबा पेठेतील कुंभारवेस परिसरात एकमेकांचे सख्या शेजाऱ्यात अगदी किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यवासन तुफान हाणामारीत झाले. या प्रकरणी फरासखाना पो...
पुणे शहराला व्हॉटसॲप चॅटींग आणि हनीट्रॅपचा विळखा

पुणे शहराला व्हॉटसॲप चॅटींग आणि हनीट्रॅपचा विळखा

पोलीस क्राइम
लैंगिक उत्तेजना होणारा दाखविला व्हिडीओ, नग्न होण्यास पडले भाग… मग काय… झाले स्क्रीन रेकॉर्डिंग आणि गमाविले साडेचार लाख… वकीलाकडून बलात्काराची केस करण्याची धमकी, व्यावसायिकाला 17.50 लाखाला गंडा,ॲड. विक्रम भाटे व निधी दिक्षित यांच्याविरूद्ध हडपासर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/व्हॉटसॲप वरून फोन चॅटींग करून ओळख वाढवायची, चॅटींग करायचे, मग अश्लिल व्हिडीओ पाठवायचा, लैंगितक उत्तेजना वाढवायची पुढे नग्न होण्यास भाग पाडायचे, त्याच्याही पुढे स्वतःच्या फ्लॅटवर बोलावून घ्यायचे, फोटोंसह अश्लिलतेचा बाजार मांडायचा पुढे मग ब्लॅकमेलिंगला सुरूवात… घाबरून लाखो रुपयांना चुना… पुढचा रस्ता पोलीस स्टेशनचा… बस्सा बोंबलत…पुणे शहरात सध्या हनी ट्रॅपचे प्रकार सर्रास वाढले आहेत. दरम्यान सायबर क्राईम करणाऱ्यांचा धंदा अगदी तेजित आला आहे. पोलीसांकडून वारंवार सुचना देऊन देखील नागरीक...
गुन्हे युनिट 1 च्या शब्बीर सय्यदांची जब्बर कारवाई,<br>समर्थ हद्दीत 47 लाखांचा दरोडा घालणाऱ्यांना केले जेरबंद

गुन्हे युनिट 1 च्या शब्बीर सय्यदांची जब्बर कारवाई,
समर्थ हद्दीत 47 लाखांचा दरोडा घालणाऱ्यांना केले जेरबंद

पोलीस क्राइम
crime unite1 गाडीच्या नंबरप्लेटला चिखल फासला, तोंडावर मास्क, डोक्यावर टोपी आणि डोळ्यांना गॉगल सांगा आता तपास तरी कसा करायचा… नॅशनल फोरम/पुणे/दि/समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील सुमा पन्ना या नाना पेठेतील सिगारेट- बडीशेपच्या डिलरशिप असलेल्या दुकानातून मालाच्या विक्रीचे पैसे बँकेत भरण्यासाठी जात असतांना, सरावलेल्या दोन गुन्हेगारांनी त्यांच्या गाडीस मागून धक्का देवून, तुला गाडी निट चालवीता येत नाही का? असे म्हणुन त्यांचा रस्ता अडवून दोघांपैकी मागे बसलेल्या इसमाने त्यांना कोयत्याचा धाक दाखवून हाताने मारहाण करून त्यांच्याकडील रोख 47 लाख 26 हजार रुपये व एकुण 14 चेक असलेली बॅग जबरीने चोरून नेली होती. दरम्यान आरोपींनी वापरलेल्या काळ्या रंगाचे मोपेडचा नंबर आरोपींनी दोन्ही बाजुचे नंबरप्लेटवर चिखल लावल्याने नंबर प्राप्त झाला नव्हता व तोंडास मास्क, डोक्यावर टोपी, डोळ्यास गॉगल लावल्याने त्यांची ओळख पट...
चंदननगर पोलीसांची दमदार कारवाई, दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना केले जेरबंद

चंदननगर पोलीसांची दमदार कारवाई, दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना केले जेरबंद

पोलीस क्राइम
chandannagar police पुणे/दि/ नॅशनल फोरम/पोलीस स्टेशन हद्दीत घडलेले गुन्हे आणि त्यांचा तपास ही एक किचकट बाब ठरत आहे. त्यातच स्थानिक पोलिसांना वेगवेगळ्या कामगिरी व बंदोबस्तावर नेमणूक केल्यानंतर, गुन्ह्याच्या तपासासाठी वेळेचे नियोजन करावे लागते. पोलीस स्टेशनकडून कामगिरी करण्यात दिरंगाई झाल्यास, इतर गुन्हे शाखांकडे त्यांचा तपास दयावा लागतो ही एक नित्याची प्रशासकीय प्रक्रिया असली तरी चंदननगर पोलीसांनी देखील हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा कसुन तपास करुन, दोन्ही प्रकरणांतील आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. एका गुन्ह्यात दोन वर्षापासुन पोक्सो व बलात्काराच्या गुन्हयामध्ये ओडीसा येथे फरार असलेल्या आरोपीस बेड्या ठोकल्या असून, दुसऱ्या गुन्ह्यात चंदनाची चोरी करून फरार आरोपीस अटक करून त्याने केलेल्या चार गुन्ह्यांची उकल करण्यात चंदननगर पोलीसांना यश आले आहे. दोन वर्षापासुन पोक्सो व बलात्काराच्या गुन्ह...
गुन्ह्यांचा धावता आढावा,आजचे पोलीस स्टेशन कोंढवा पोलीस स्टेशन,वानवडी पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशन, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1, पोलीस उपआयुक्त मुख्यालय, पोलीस भरती

गुन्ह्यांचा धावता आढावा,आजचे पोलीस स्टेशन कोंढवा पोलीस स्टेशन,वानवडी पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशन, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1, पोलीस उपआयुक्त मुख्यालय, पोलीस भरती

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/आज दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजीपर्यंत पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा देण्यात आला आहे. आजचे पोलीस स्टेशन कोंढवा पोलीस स्टेशन,वानवडी पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशन, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1, पोलीस उपआयुक्त मुख्यालय, पोलीस भरती यांचा समोवश आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने वाँटेड आरोपीस पकडले23 लाख 26 हजाराचा “कोकेन“ ड्रग्ज हस्तगत पुणे/दि/ नॅशनल फोरम/पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार व पोलीस सह आयुक्त, पुणे शहर. श्री. संदिप कर्णिक यांनी पुणे शहरामध्ये फेब्रुवारी मध्ये साजरा होणा-या महाशिवरात्री शिवजयंती. संभाव्य व्हि.व्हि.आय.पी. व्यक्तींचे दौरे तसेच कसबा विधानसभा पोट निवडणुकीच्या अनुषंगाने दि. 15/02/2023 रोजी 21/00 वा ते दि. 16/02/2023 रोजी 02/00 वा पर्यंत ऑलआऊट / कोंबिंग ऑपरेशन राबविणे बाबत आदेश दिलेले होते. त्याअनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक 1...