Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: #punecrime

खडक पोलीसांकडून तीन दुचाकींसह, वाहनचोराला केले जेरबंद

खडक पोलीसांकडून तीन दुचाकींसह, वाहनचोराला केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून वाहन चोरी करणाऱ्या मोबीन सुलतान खान वय 27 वर्ष याला अटक केली आहे. एक वाहन चोरीचा तपास करीत असतांना, खान याच्याकडून आणखी तीन गुन्हे उघडकीस आणण्यात खडक पोलीसांना यश आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, खडक पोलीस स्टेशन हद्दीत वान चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गायकवाड व पोलीस निरीक्षक श्री. संपतराव राऊत यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या आहेत. त्यानुसार तपास पथकातील प्रभारी अधिकारी श्री. प्रल्हाद डेंगळे व तपास पथकातील स्टाफ श्री. दुडम, श्री. ठवरे, श्री. तळेकर, श्री. चव्हाण श्री. वाबळे, श्री. ढपवरे, श्री. कुडले असे कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोलीस अंमलदार श्री. किरण ठवरे व पोलीस अंमदार हर्षल दुडम यांना बातमीदारामार्फत माहिती...
पेट्रोल पंपाचा मालक पोलिसांना मामा बनवतो तेव्हा….पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या कारणावरून मारहाण …..मालकानेच केली दरोडा पडल्याची बतावणी….पोलीस आले धावून …..मालक गेला भांबावून…..

पेट्रोल पंपाचा मालक पोलिसांना मामा बनवतो तेव्हा….पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या कारणावरून मारहाण …..मालकानेच केली दरोडा पडल्याची बतावणी….पोलीस आले धावून …..मालक गेला भांबावून…..

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/ पुणे/ दि/ प्रतिनिधी/(वृत्तविश्लेषण)पोलिसांना विनाकारण फार काळ तुम्ही मामा बनवू शकत नाही. शेकडो नव्हे तर हजारो आणि लाखो सरावलेले गुन्हेगार पोलिसांच्या हाताखालून गेलेले असतात. समाज माध्यमांमध्ये एखादा व्यक्ती कितीही प्रामाणिकपणाचे ढोंग घेऊन फिरत असला, तरी त्या सोंगाड्याचे सोंग पोलीस प्रशासनाला चांगलेच ठाऊक असते. परंतु जोपर्यंत संबंधित इसम कायद्याच्या चाकोरीत येत नाही, तोपर्यंत त्याचं लबाड लांडग्यासारखं वागणं जनतेसमोर मांडता येत नाही. परंतु अशी ढोंग धतुर करणारे मानभावी मंडळी तशीही कमी नाहीत.शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची तक्रार आल्यानंतर पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 1 यांच्यासह संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली. शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी आरोपींना 4 तासात अटक केली. आरोपी अटक केल्यानंतर जे काही समोर आलं ते सर्व आश्चर्यचकित करण्यासारखे होते. म...