Wednesday, March 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: #punecitypolice

बिर्याणी चांगली झाली नाही तर तुला किडनॅप करीन- धमकी देवून विनयभंगही केला, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

बिर्याणी चांगली झाली नाही तर तुला किडनॅप करीन- धमकी देवून विनयभंगही केला, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/माकेटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेल मध्ये आरोपीनी प्रवेश करून महिलेसोबत अश्लील गैरकृत्य केले. तसेच बिर्याणी चांगली झाली नाही तर किडनॅप करण्याचीही धमकी दिल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी महिलेचे मार्केटयार्ड येथे हॉटेल आहे. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास आरोपी लक्ष्मण घाडगे हॉटेलमध्ये बिर्याणी खाण्यासाठी आला होता. त्याने फिर्यादी यांच्या पतीकडे बिर्याणीची मागणी केली असता त्यांनी अर्धातास लागेल असे सांगितले. यानंतर फिर्यादी यांचे पती कंस्ट्रक्शन साईवर गेले. दरम्यान, फिर्यादी हॉटेलच्या किचनमध्ये बिर्याणी तयार करत होत्या. त्यावेळी आरोपी किचनमध्ये आला. त्याने फिर्यादी यांच्या लागावर हात फिरवून गैरवर्तन केले. तसेच बिर्याणी चांगली बनवण्यास सांगून बिर्याणी चांगली झाली नाहीतर तुला किडनॅप करेन अशी धमकी द...
विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत वेश्याव्यवसायाचा कहर झाला, सामाजिक सुरक्षा विभागाकडून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, फाईव्ह स्टार हॉटेलवर छापा

विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत वेश्याव्यवसायाचा कहर झाला, सामाजिक सुरक्षा विभागाकडून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, फाईव्ह स्टार हॉटेलवर छापा

पोलीस क्राइम
निको गार्डन रोडवरील हॉटेल इंटरनॅशनलमधील वेश्या व्यवसायावर पोलीसांची छापेमारी नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/(वृत्तविश्लेषण)विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशिर व गैरकायदयाच्या राज्याचे थैमान घातले आहे. कॉलसेंटर, मॉल्सच्या बाजारपेठांमुळे उच्चभ्रु व गर्भश्रीमंतांचा येथे राबता वाढत आहे. त्यामुळे या भागात एैशोआराम आणि चैनीच्या सुविधांचा सुकाळ झाला आहे. बेकायदेशिर व गैरकायदयाचे असले तरीही त्यांचा विकास व विस्तार वाढत चालला आहे. अनेक स्थानिक सामाजिक व राजकीय संघटनांनी विमानतळ पोलीस स्टेशनला बँकॉक व दुबई अशी नावे दिली आहेत. याच देशात सर्वाधिक एैयाशी असल्याने त्याचे नाव विमानतळ पोलीस स्टेशनला दिले आहे. तसेच अनेक निवेदने देवून अशा प्रकारचे अवैध व बेकायदेशिर धंदे बंद करण्याची मागणी केली आहे. परंतु विमानतळ पोलीस स्टेशन स्वतःहून कारवाई करीत नसल्याचे सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. दरम...
पुणे शहर पोलीसः वरीष्ठ पोलीस निरीक्षक बदली- 2024, निवडणूकीची पार्श्वभूमी आणि ललित पाटील प्रकरणानंतर शहरांतर्गत प्रथम मोठ्या बदल्या, शुक्रवारी 15 तर सोमवारी 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे शहर पोलीसः वरीष्ठ पोलीस निरीक्षक बदली- 2024, निवडणूकीची पार्श्वभूमी आणि ललित पाटील प्रकरणानंतर शहरांतर्गत प्रथम मोठ्या बदल्या, शुक्रवारी 15 तर सोमवारी 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सार्वत्रिक निवडणूका आणि ललित पाटील प्रकरणांतर पुणे शहर पोलीस आयुक्तालयात प्रथम मोठ्या बदल्या केल्या आहेत. शुक्रवार दि. 12 जानेवारी रोजी सुमारे 15 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. त्यानंतर काल मकरसंक्रातीचे दिवशी सोमवार दि.15 जानेवारी रोजी सुमारे 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. दरम्यान शुक्रवार दि. 12 जानेवारी रोजीच्या बदली आदेशात अंमली पदार्थ विरोधी पथक 1 व 2 मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची अक्षरशः बोळवण करण्यात आली असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान काही अधिकारी फिल्डवर फिट असतात तर काही अधिकारी हे दरबारी कामातच तरबेज असतात. पुण्यात ललित पाटील प्रकरण झाल्यानंतर विनायक गायकवाड यांची बदली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आता काही महिन्यानंतर पुन्हा त्यांची बदली दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक क्र. 1 येथे करण्यात आ...
समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील एमपीडीएतील सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलीसांकडून मटका, जुगार अड्डयांची खिरापत, कारवाईत क्राईम युनिटच्या पोलीसावर हात उगारला, समर्थ पोलीस हे विसरले काय…

समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील एमपीडीएतील सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलीसांकडून मटका, जुगार अड्डयांची खिरापत, कारवाईत क्राईम युनिटच्या पोलीसावर हात उगारला, समर्थ पोलीस हे विसरले काय…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/मटका जुगार अड्डयावर पोलीसांनी कारवाई केली, म्हणून पोलीसांवर हात उगारणाऱ्या मटका अड्डयाच्या मालकाला पोलीसांनी तडीपारीची का करू नये अशी नोटीस काढली… मग काय… त्याने सहायक पोलीस आयुक्त फरासखान्याला दरदिवशी 10 प्रदक्षिणा घालण्याचा उपक्रम सुरू केला. पुढे एमपीडीएची तरतुद ठेवण्यात आली. तेंव्हा तर देवाला जेवढ्या प्रदक्षिणा घातल्या नसतील तेवढ्या प्रदक्षिणा फरासखाना इमारतीला घातल्या. पुढे कारवाई नाममात्र करून, मोठी कारवाई संस्थगित ठेवण्यात आली आणि आता पुनः समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत नव्याने धुमाकुळ घालण्यास सुरूवात केली आहे. भिमनगराकडे जाणाऱ्या ऑईलच्या दुकानापासून ते पॉवर हाऊसपर्यंत त्याने रान पेटवुन ठेवले आहे. सगळीकडे गप्पाही गप्पामय वातावरण निर्माण झाले आहे. जागोजाग रायटर आणि पंटरचा धुमाकुळ सुरू आहे. एवढी मेहेरबानी समर्थ पोलीस स्टेशन आणि पुणे शहर पोलीसांनी का केली असावी...
खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील मोक्का, एमपीडीए व तडीपारीतील गुन्हेगारांना पुणे शहर पोलीसांकडून मटका, जुगार अड्डयांची खिरापत

खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील मोक्का, एमपीडीए व तडीपारीतील गुन्हेगारांना पुणे शहर पोलीसांकडून मटका, जुगार अड्डयांची खिरापत

पोलीस क्राइम
खडकी पोलीस आणि पाटील इस्टेट झोपडपट्टी म्हणजे मटका, जुगार अड्डे आणि अंमली पदार्थांची बाजारपेठ… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/(वृत्तविश्लेषण)पुणे शहरात सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्याच्या प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या उद्देशाने काल खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील अजमेर शेख वय 22 वर्ष रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी शिवाजीनगर पुणे येथील गुन्हेगारावर 78 वी एमपीडीए कायदयानुसार कारवाई करण्यात आली आहे. अजमेर शेख याच्या विरूद्ध मागील 5 वर्षात एकुण 4 गंभीर गुन्हे दाखल होते. तसेच त्याने त्याच्या साथीदारांसह खूनाचा प्रयत्न, घातक हत्याराने दुखापतीसह जबरी चोरी, गंभीर दुखापत, खंडणी, दंगा, बेकायदेशिर हत्यार बाळगणे या सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले असल्याने त्याच्यावर एमपीडीए नुसार कारवाई करून त्याची रवानगी नागपुर कारागृहात केल्याचे पुणे शहर पोलीसांकडून 2 जानेवारीच्या प्रसिद्धी प...