मुंढवा पोलीस स्टेशनवर प्रशासक नेमावा काय… सामाजिक सुरक्षा विभागाचा मुंढव्यातील जुगार अड्डयांवर पुनः छापा- 1 लाख रूपयांच्या मुद्देमालांसह 26 आरोपी अटक
पुणे/दि/ प्रतिनिधी/नॅशनल फोरम/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाने मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्डयांवर पुन्हा कारवाई केली आहे. एक लाख रुपयांचा मुद्देमाल व 26 जणांविरूद्ध कारवाई केली आहे. मागील वर्षात तीन/चार वेळेस कारवाई केली होती आता पुनः नव्यावर्षाच्या तिसऱ्या दिवशी मटका जुगार अड्डयांवर कारवाई झाल्याने, मुंढवा पोलीस स्टेशनवर थेट प्रशासकाची नियुक्ती करावी काय असा सवाल सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
सध्या महापालिका व नगरपालिकांच्या निवडणूका वर्षभर लांबणीवर पडलेल्या आहेत. त्यामुळे तिथे प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंढवा पोलीस स्टेशन बाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मुंढवा पोलीस स्टेशन मधील अधिकारी कर्मचारी कारवाई करण्यास कसुरी करीत असतील तर, पुणे शहर पोलीस आयुक्तांनी मुंढवा पोलीस स्टेशनवर ...