Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: #Pune Municipality Ganesh Visarjan

पुण्यात गणेशोत्सवाची धामधुम- महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांची लुटालुट- टेंडरसाठी ठेकेदारांची दण्णादण्णी

पुण्यात गणेशोत्सवाची धामधुम- महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांची लुटालुट- टेंडरसाठी ठेकेदारांची दण्णादण्णी

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. घरोघरचे गणपती बसविण्यासाठी बच्चे कंपनीसह कुटूंबातील सर्व सदस्य झाडुन कामाला लागले आहेत. सार्वजनिक मंडळातील कार्यकर्ते देखील झटून काम करीत आहेत. कुणालाही मान वर करून पाहण्यासाठी वेळ नाही अशी पुण्यातील परिस्थिती असतांना, दुसरीकडे मात्र पुणे महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयात टेंडर कामावरून रणकंदन पेटले आहे. गणपती बसण्याच्या आधीच गणपती विसर्जनासाठी टेंडर काढण्याची लगबग सुरू आहे. फिरते वाहन, शाळा, मोकळ्या जागेतील विसर्जन हौद, त्यावरील विद्युत सुविधा याचे टेंडर मिळावे म्हणून ठेकेदारांची पळापळ सुरू आहे. आज शनिवार आहे. क्षेत्रिय कार्यालयात नागरीकांना येण्यास सुट्टी असली तरी अधिकारी व ठेकेदार हजर आहेत. कोणते टेंडर कुणाला दयावे यासाठी बैठका झडत असतांना, काही ठेकेदार तर हमरीतुमरीवर आले असल्याचे पाहण्यात ...