Thursday, November 14 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: #Pune Municipal Corporation

वारजे येथील मुंबई बेंगलोर हायवे येथे अनाधिकृत फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई

वारजे येथील मुंबई बेंगलोर हायवे येथे अनाधिकृत फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील मुंबई बेंगलोर महामार्गावर गेले अनेक दिवस नागरिकांना पथारी व्यावसायिकांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत होत्या. परंतु संबंधित व्यवसाय धारक हे खाजगी जागेत असल्याचे भासऊन अनधिकृतरित्या महामार्गावर व्यवसाय करीत असल्याचे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग यांनी निदर्शनास आणून दिल्याने त्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईत साधारण 06 बिगर टप हातगाडी, 1 लोखंडी काउंटर, 14 मोठे टायर, 2 टेंथ, 1 वजन काटा, 6 कॅरेट फळ पथारी, 1 गॉगल स्टॅन्ड, 25 टेडी, 20 चादरी, 5 गाद्या व 40 रजया जप्त करण्यात आल्या व 5 कच्चे शेड पाडून टाकण्यात आले. सदर ठिकाणी व्यावसायिकांनी कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात विरोध केला, परंतु विरोधाला न जुमानता ही करावाई चालू ठेवली. वा...
पुणे महापालिकेच्या आयुक्त आणि अति. आयुक्तांच्या आदेशांना ठेंगा दाखविण्याची माधव जगतापांची खोड सवय आहे

पुणे महापालिकेच्या आयुक्त आणि अति. आयुक्तांच्या आदेशांना ठेंगा दाखविण्याची माधव जगतापांची खोड सवय आहे

सर्व साधारण
माधव जगताप- लाखोंची बोली, कोट्यवधींचे व्यवहार? माधव जगतापांची खाबुगिरी भाग- 1 नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाणपुणे महानगरपालिकेतील सुरक्षा विभाग, सुरक्षा विभाग सनियंत्रक, अतिक्रमण, आकाशचिन्ह विभाग, घनकचरा विभाग या सारखे अतिमहत्वाची खाती अनेक वर्ष स्वतःच्या कब्जात ठेवण्याची माधव जगतापांची एक प्रशासकीय कला होती व आहे. उपआयुक्त या पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर, पुणे महापालिकेतील सर्वाधिक क्रिमी पोस्टवर त्यांनी कब्जा केला व निरंतर कोणत्याही अडथळ्याविना स्वतःकडे ठेवण्यात त्यांना यश आले आहे. त्यांनी या पदावर पायउतार झाल्यानंतर, हळुहळु त्यांच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारांची प्रकरणे बाहेर येऊ लागली आहेत. सध्या माधव जगताप यांनी ह्या सर्व पदांचा त्याग करून, आता पुणे महापालिकेचे हृदय असलेले टॅक्स अर्थात कर संकलन व कर आकरणी विभागाचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासूनच त...
पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील बदल्यांचा तिढा

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील बदल्यांचा तिढा

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील कनिष्ठ व वरिष्ठ लिपिकांसह अधीक्षक संवर्गातील बदल्यांचे सुप 23 ऑगस्ट रोजी वाजले तरी, बहुतांश सेवक त्यांच्या बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी तयार नाहीत. पुणे महापालिकेतील बांधकाम, टॅक्स, ऑडीट, अतिक्रमण, आरोग्य, विधी व कामगार ही महत्वाची खाती म्हणून ओळखली जातात. महत्वाची खाती म्हणजे काय तर… क्रिमी खाती म्हणून ओळखली जातात. बक्कळ वरकड पैसा मिळतो. पुणेकर नागरीकांना भीती आणि दम देवून पैसे काढता येतात म्हणून त्याला क्रिमी किंवा महत्वाची खाती म्हटले जाते. पुणे महापालिकेतील प्रत्येक सेवकाला या खात्यात येण्याची ओढ असते. परंतु ह्या बदल्या सहज होत नाहीत, त्यासाठी प्रत्येकाला आयुक्तांचे नाही तर माननियांचे पाय धरावे लागतात. त्यांची सेवा करावी लागते. आता सेवा म्हणजे काय तर… ते सांगतील ती कामे स्वतःचा पदाचा अधिकार वापरून करणे, मग ते कायदेशिर असो की बेकायदेशिर...
PMC PUNE- टॅक्स मध्ये दडलय काय ? खुर्चीसाठी दहा लाखाचा टोल, नव्यांना संधी मिळणार कशी?

PMC PUNE- टॅक्स मध्ये दडलय काय ? खुर्चीसाठी दहा लाखाचा टोल, नव्यांना संधी मिळणार कशी?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात सार्वत्रिक बदली आणि पदोन्नतीचे सनई चौघडा वाजत असतात. यावर्षी देखील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत बदली आणि पदोन्नतीचा सनई चौघडा वाजला. तसं म्हणायला गेल्यास सेवकांच्या पसंती क्रमानुसार व समुपदेशाने बदली केल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात काही क्रिमी खात्यात वर्णी लागावी, म्हणून अनेकांनी माननीयांचे पाय अजून सोडलेले नाहीत. बदल्यांचे आदेश निघाले आहेत, परंतु क्रिमी खात्यातील काही सेवक खुर्ची सोडायला तयार नाहीत. हवं तर पाच लाखावरून दहा लाखाचा टोल घ्या पण मला इथेच राहू द्या, अशी गळ माननीय घातली जात आहे. नको परकेपणा मला तुमची म्हणा, घरच्यावाणी मला वागवा, रात धुंदीत ही जागवा, असं सर्वत्र सुरू आहे. दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभाग प्रमुख पदावर माधव ज...
पुणे महापालिकेत पदांसाठी पैशांचा बाजार भरलाय?

पुणे महापालिकेत पदांसाठी पैशांचा बाजार भरलाय?

शासन यंत्रणा
जो जास्त भ्रष्टाचार करणार, त्यालाच मोठ्या पदावर पदस्थापना मिळणार,मेरिट/गुणवत्तेच्या निव्वळ बाताच मारणार, प्रत्यक्षात थैली किती वजनदार आहे, त्यावरच सर्व अवलंबुन असते. नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाणपुणे महापालिकेत पैशांचा बाजार भरलाय… जो उठतो तो प्रभारी पदभार घेवून त्याच्या सध्याच्या पदापेक्षा मोठ्या पदांवर पदस्थापना घेतल्याचे दिसते. पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात तर ज्या अभियंत्याला पहिल्या टप्प्यातील पदोन्नती देखील मिळाली नाही, त्याला थेटच प्रभारी उपअभियंता म्हणून पदस्थापना दिली, कालपर्यंत अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका सेवकाला थेटच प्रशासन अधिकारी या पदाचा अनुभव डिलिट मारून त्याला थेट सहायक आयुक्त पदावर बसविले. मागील आठवड्यात उपआयुक्त पदांचा तपशील जाहीर केला, त्यात संदीप कदम, सोमनाथ बनकर, चेतना केरूरे,आशा राऊत यांना थेट महत्वाच्या व मोठ्या पदांवर नियुक्ती दिल्या...