नाना पेठेत कोयता-पालघन सारखी हत्यारे हवेत फिरवुन दहशत माजविणाऱ्यांची,समर्थ व क्राईम ब्रँचच्या पोलीसांच्या समांतर तपासाचा पुणेरी हिस्का… समर्थचे प्रसाद लोणारे-सौरभ माने व क्राईम ब्रँचचे निलेश साबळे-अजय थोरात यांची दिमाखदार कामगिरी
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumआमदार, खासदार किंवा नगरसेवकाने वा राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याने पाठीवर शाब्बासकीची थाप मारल्यानंतर, गल्लीबोळातील नवशिक्या दादा आणि भाईंना पोलीस आणि कायदयाचा धाक नेमका काय असतो याचे भान राहिलेले नसते. त्यामुळे हम करे सो कायदा असे त्यांचे वर्तन सुरू असते. थर्ड फर्स्ट च्या मध्यरात्रौ आणि नववर्षाच्या पहाटेच आपसात झालेल्या भांडणाचा राग मनाशी धरून काही नेत्यांच्या लाडक्यांनी पुण्यातील नाना पेठेत कोयता, पालघन सारखी हत्यारे हवेत फिरवुन, दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. परंतु समर्थचे प्रसाद लोणारे-सौरभ माने व क्राईम ब्रँचचे निलेश साबळे-अजय थोरात यांनी कायदा मोडणाऱ्यांना जेरबंद केले असून, पुणे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांना पुणेरी हिसका दाखविण्यात आला आहे. पळुन गेला तरी कानुन के हाथ बहोत लंबे होते है हा साक्षात्कार नाना आणि भवानी पेठेतील दादा-भाईं...