Friday, October 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: #prakashambedkar

भाजपने 10 वर्षात काय केले याचा जाब काँग्रेसने विचारण्यापेक्षा उलट काँग्रेसच वंचित वर तुटून का पडत आहे…? काँग्रेस,भाजपाची दिग्गज नेते अकोला-अमरावतीमध्ये ठाण मांडून का बसले आहेत…

भाजपने 10 वर्षात काय केले याचा जाब काँग्रेसने विचारण्यापेक्षा उलट काँग्रेसच वंचित वर तुटून का पडत आहे…? काँग्रेस,भाजपाची दिग्गज नेते अकोला-अमरावतीमध्ये ठाण मांडून का बसले आहेत…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/अमरावती-अकोला/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 41 जागांवर भाजप-शिवसेना युतीने विजय मिळवला होता. राज्यात 48 पैकी 41 खासदार भाजप-शिवसेना युतीचे होते. या खासदारांनी केंद्रातून त्यांच्या मतदारसंघाकरता किती विकास निधी आणला? खासदारांना मिळणाऱ्या दरवर्षीचा पाच कोटी रुपयांचा निधी कोणत्या कामांवर खर्च केला? किती टक्के खर्च केला? जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तो निधी कसा खर्च केला? त्यांच्या मतदारसंघांमध्ये निवडून आलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये किती नवीन शाळा, कॉलेज उभे केले? किती नवीन हॉस्पिटल उभे केले? किती शासकीय जुन्या हॉस्पिटलला आरोग्य सुविधा पुरवल्या? किती प्राथमिक आणि माध्यमिक जुन्या शाळांच्या नूतनीकरणावर भर दिला? सर्वसामान्य नागरिकांना शिक्षण व आरोग्याच्या कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या? बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळवून देण...
अमरावतीत काँग्रेस-भाजपाचा जातीय-धार्मिक थयथयाट

अमरावतीत काँग्रेस-भाजपाचा जातीय-धार्मिक थयथयाट

सर्व साधारण
राहुल गांधी दिल्लीत राहतात, निवडणूक उत्तर प्रदेशातील अमेठीत व आता देशाचे शेवटचे टोक असलेल्या केरळ मधील वायनाड मध्ये निवडणूक लढवित आहेत, हे काँग्रेसवाल्यांना चालते मग आंबेडकर अमरावतीत का चालत नाहीत…काँग्रेस भाजपाचा कपटी डाव ओळखा नॅशनल फोरम/अमरावती/दि/राहूल गांधी दिल्लीत राहतात आणि उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा निवडणूकीत उभे राहतात. आता तर अमेठी सोडून ते केरळ मधील वायनाड मध्ये निवडणूकीला उभे राहत आहेत, हे सर्व काँग्रेसवाल्यांना चालते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर हे अमरावती मध्ये उभे राहिल्यानंतर कॉंग्रेसवाल्यांनी थयथयाट सुरू केला आहे. दरम्यान संपूर्ण विदर्भात आंबेडकरी जनतेची प्रत्येक मतदारसंघात मोठी संख्या आहे. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील भंडारा लोकसभा निवडणूकीत उभे होते. आंबेडकरी घराण्याची व विदर्भाची जवळची नाळ आहे. त्यामुळे आनंदराज आंबेडकर अमराव...
अमरावतीत आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसने बळबळ उभा केलेला बळवंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भंडाऱ्याच्या निवडणूकीत पाडणाऱ्या काँग्रेसचा बदला घेण्याची अमरावतीकरांना सुवर्ण संधी…

अमरावतीत आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसने बळबळ उभा केलेला बळवंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भंडाऱ्याच्या निवडणूकीत पाडणाऱ्या काँग्रेसचा बदला घेण्याची अमरावतीकरांना सुवर्ण संधी…

राजकीय
NATIONAL FORUM/ PUNE/ काँग्रेसने 25 वर्षात अमरावती लोकसभेची निवडणूक लढविली नाही. रिपब्लिकन सेनानी आनंदराज आंबेडकर अमरावतीमध्ये राखीवज जागेवर उमेदवार असल्याने काँग्रेस-भाजपाने ठरवुन काँग्रेसी आमदार बळवंत वानखेडे यांना उभे केले आहे. अमरावतीतत सर्वांना ठाऊक आहे की, बळवंत वानखेडे हे मंत्री यशोमती ठाकुर यांच्या चपला उचलतात, एवढच नाही तर यशोमती ठाकुर यांना विचारल्याशिवाय तोंडही उघडत नाहीत. त्यामुळेच अमरावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान पाडली तरी वानखेडे तिकडे फिरकले देखील नाहीत. त्यामुळे काँग्रेस-भाजपा यांनी गुप्त समझोता केला असून केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना लोकसभा निवडणूकीत पाडण्यासाठीच 48 पैकी 1 जागेवर बौद्ध उमेदवार उभा केला आहे. काँग्रेस आघाडीने 48 पैकी एकही जागेवर मुस्लिम उमेदवार दिला नाही. एकही बौद्ध उमेदवार दिला नाही. केवळ आनंदराज आंबेडकर...
महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही- आंबेडकर

महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही- आंबेडकर

सामाजिक
नॅशनल फोरम/अकोला/दि/ वृत्त/डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत समूहांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याबाबत व्यापक भूमिका मांडली. भेदाभेद संपवून सर्वांना समतेची वागणूक मिळावी असे अपेक्षित होते. पण आजही प्रस्थापितांच्या डोक्यातील बहिष्काराची भावना संपलेली नाही, असेच दिसते. महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही आणि यावर प्रसार माध्यमे देखील गप्प का आहेत, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीने अद्याप एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. महाविकास आघाडीला भाजपप्रमाणे मुस्लिमांना वगळायचे असेल, तर दोघांमध्ये काय फरक आहे? प्रस्थापित राजकीय पक्ष मुस्लिमांना निवडणुकीच्या राजकारणात प्रतिनिधित्व देत नाहीत, त्यांच्यावर बहिष्कार घालतात याबाबत प्रसार माध्यमे गप्प का? असा सवाल आंबेडकर ...
प्रस्थापित घराणेशाहीवाल्यांना सत्ता आपल्याकडेच रहावी असे का वाटते…? काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी व भाजपा प्रणित महायुतीची वृत्ती,

प्रस्थापित घराणेशाहीवाल्यांना सत्ता आपल्याकडेच रहावी असे का वाटते…? काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी व भाजपा प्रणित महायुतीची वृत्ती,

राजकीय, सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/राज्यात काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी व भाजपा प्रणित महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी उठली आहे. देशात 10 वर्ष सत्तेत असलेल्या पक्षाची उणीदुणी काढण्यापेक्षा, हे सर्व पक्ष वंचित बहुजन आघाडी विरूद्ध गरळ ओकत आहेत. वंचित बहुजन आघाडीचा एकही खासदार नाही, एकही आमदार नाही. त्यांची देशात व राज्यात कुठेही सत्ता नव्हती, तरी देखील वंचित बहुजन आघाडीविरूद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा हे चार पक्ष का तुटून पडले आहेत याचा विचार होणे गरजेचे ठरत आहेत. महायुती व महाविकास आघाडीने राज्यात एकाही मुस्लिम समाजातील नेतृत्वाला उमेदवारी दिली नाही. आंबेडकरी समुहातील नेतृत्वाला उमेदवारी दिली नाही. भटके, विमुक्त, आलुतेदार- बलुतेदारांना उमेदवारी दिली नाही. या समाजाने केवळ महायुती व महाविकास आघाडीला मतदान करायचे, परंतु सत्तेत वाटा मागायचा नाही असेच धोरण आजपर्...
वंचितच्या मसुदयावर 12 दिवस उलटले तरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष दुभंगलेली काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (उबाठा) गप्प का…

वंचितच्या मसुदयावर 12 दिवस उलटले तरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष दुभंगलेली काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (उबाठा) गप्प का…

राजकीय
प्रस्थापित पक्षांना वंचित समाजाची मते हवीत… मग त्यांचा सत्तेत सहभाग नको का…. नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/कायम सत्तेत राहिलेल्या पक्षांना, विरोधी पक्षात बसल्यानंतर, सत्तेत कधी पोहोचेल असे वाटू लागते. काँग्रस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेला चिटकलेले मुंगळे आहेत. सत्तेसाठी वाट्टेल ते करायला पुढे मागे पाहत नाहीत. हेच या दोन्ही पक्षांबाबत बोलले जाते. परंतु देशातचे संविधान वाचवायचे आहे, त्यासाठी वंचितने मागील दोन ते अडीज वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्व पक्षांना एका विचारपीठावर आणून, 39 कलमी समान कार्यक्रमावर बांधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु प्रस्थापित राजकीय पक्ष त्या 39 कलमी मुद्यांबाबत काहीच बोलत नाहीत. आज 12 दिवस उलटून गेले तरी काही बोलत नाहीत. देशातचे पहिले पंतप्रधन जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर व पुढे 1977 पर्यंत देशात काँग्रेसच्या भांडवलदारधार्जिण...