नववर्षाचा पहिलाच दिवस- खून, हत्याकांड, दरोडा, घरफोड्या,लुटालूटीचा…
वर्षाच्या शेवटच्या दिवशीही संपूर्ण शहरात हिंसाचार आणि लुटालुटीच्या घटना…
पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे काय…. भाग - 2
नॅशनल फोरमची काल प्रसारित बातमी आणि चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया,पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वशिल्याने आलेल्या पोलीसांमुळेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभिर झाला. …..
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुण्यात कोयता गँगची दहशत, विधीमंडळात कोयता गँगचा मुद्दा आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी मागील दीड वर्षात 700 पेक्षा अधिक गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांविरूद्ध मोक्का व एमपीडीए ची कारवाई करून त्यांना तडीपार केल्याचा मुद्दा अधिक तापला आहे. 700 पेक्षा अधिक जणांविरूद्ध कारवाई करून देखील गुन्हेगारांमध्ये पोलीस आणि कायदयाचा धाक का राहिला नाही… पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे काय हा मुद्दा घेवून नॅशनल फोरमने काही प्रश्न उपस्थित करून त्याबाबतची बातमी प्रसारित केली आहे. त्यात राज्याचे उच्च-तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पाल...