Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: #PMCtax

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील बदल्यांचा तिढा

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील बदल्यांचा तिढा

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील कनिष्ठ व वरिष्ठ लिपिकांसह अधीक्षक संवर्गातील बदल्यांचे सुप 23 ऑगस्ट रोजी वाजले तरी, बहुतांश सेवक त्यांच्या बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी तयार नाहीत. पुणे महापालिकेतील बांधकाम, टॅक्स, ऑडीट, अतिक्रमण, आरोग्य, विधी व कामगार ही महत्वाची खाती म्हणून ओळखली जातात. महत्वाची खाती म्हणजे काय तर… क्रिमी खाती म्हणून ओळखली जातात. बक्कळ वरकड पैसा मिळतो. पुणेकर नागरीकांना भीती आणि दम देवून पैसे काढता येतात म्हणून त्याला क्रिमी किंवा महत्वाची खाती म्हटले जाते. पुणे महापालिकेतील प्रत्येक सेवकाला या खात्यात येण्याची ओढ असते. परंतु ह्या बदल्या सहज होत नाहीत, त्यासाठी प्रत्येकाला आयुक्तांचे नाही तर माननियांचे पाय धरावे लागतात. त्यांची सेवा करावी लागते. आता सेवा म्हणजे काय तर… ते सांगतील ती कामे स्वतःचा पदाचा अधिकार वापरून करणे, मग ते कायदेशिर असो की बेकायदेशिर… ती ...
PMC PUNE- टॅक्स मध्ये दडलय काय ? खुर्चीसाठी दहा लाखाचा टोल, नव्यांना संधी मिळणार कशी?

PMC PUNE- टॅक्स मध्ये दडलय काय ? खुर्चीसाठी दहा लाखाचा टोल, नव्यांना संधी मिळणार कशी?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात सार्वत्रिक बदली आणि पदोन्नतीचे सनई चौघडा वाजत असतात. यावर्षी देखील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत बदली आणि पदोन्नतीचा सनई चौघडा वाजला. तसं म्हणायला गेल्यास सेवकांच्या पसंती क्रमानुसार व समुपदेशाने बदली केल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात काही क्रिमी खात्यात वर्णी लागावी, म्हणून अनेकांनी माननीयांचे पाय अजून सोडलेले नाहीत. बदल्यांचे आदेश निघाले आहेत, परंतु क्रिमी खात्यातील काही सेवक खुर्ची सोडायला तयार नाहीत. हवं तर पाच लाखावरून दहा लाखाचा टोल घ्या पण मला इथेच राहू द्या, अशी गळ माननीय घातली जात आहे. नको परकेपणा मला तुमची म्हणा, घरच्यावाणी मला वागवा, रात धुंदीत ही जागवा, असं सर्वत्र सुरू आहे. दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभाग प्रमुख पदावर माधव जगताप ...