Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: nauthorized constructionspune

पुणे मनपा मधील बोगस इंजिअरच लचांड, पुणेकरांच्या माथी का मारताय… काय ते रस्ते, काय ते फुटपाथ, काय त्ये अनाधिकृत बांधकामे… ना मोजमाप, ना फुटपट्टी… करा आता ह्यांची हाकालपट्टी..

पुणे मनपा मधील बोगस इंजिअरच लचांड, पुणेकरांच्या माथी का मारताय… काय ते रस्ते, काय ते फुटपाथ, काय त्ये अनाधिकृत बांधकामे… ना मोजमाप, ना फुटपट्टी… करा आता ह्यांची हाकालपट्टी..

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यातील नरपतगिर चौक असो की, रामोशी गेट चौक असो, स्वारगेट चौक असो की पानमळा, लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी असो की, पौड रोड, कोथरूड… 2010 पूर्वीच्या पावसाळ्यात कधीही रस्ते किंवा पदपथ पाण्याखाली गेले नव्हते. परंतु पुणे महापालिकेत राजस्थान, आसाम, मणिपूर सह धाराशीव (उस्मानाबाद), बीड, लातुर सारख्या ठिकाणाहून ज्यांनी सिव्हील इंजिनिअरचे प्रमाणपत्र आणून पदोन्नती मिळविली, त्यांच्या हातातच पुणे शहराचा कारभार देण्यात आला. ह्याच तथाकथित बोगस इंजिनिअरमुळे पावसाळ्यात पुणे शहर बुडून गेले आहे. बोगस इंजिअरांनी ठेकेदार कल्याण विभाग सुरू केल्यामुळे पुणे शहराची वाट लागली आहे. त्यातच पुणे शहरातील संपूर्ण पेठा आणि उपनगरात मोठ मोठे अनाधिकृत बांधकामे झाली आहेत. अनाधिकृत बांधकामांना नोटीसा दयायचा आणि मागच्या दाराने जावून बांधकाम पूर्ण होईपर्यंत एवढच नव्हे तर लोक राहण्यास येण्यापर्यंत ...